अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंड (Ultra short term duration fund) हे डेब्ट फंड (debt fund) आहेत. हे फंड 3 ते 6 महिन्यांच्या कालावधीसाठी कंपन्यांना कर्ज देतात. यांचा कर्जाचा कालावधी कमी असल्यामुळे याच्यातील जोखीम कमी असते. तरीही जोखमीच्या पंक्तीत याचा क्रमांक लिक्विड फंडापेक्षा थोडाफार वरच आहे. पण, तरीही गुंतवणूक करण्यासाठी हा इतर स्कीमपेक्षा सर्वात कमी जोखीम असलेला प्रकार मानला जातो. चांगले अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड हे अल्प मुदतीचे म्युच्युअल फंड आहेत जे ट्रेझरी बिले, ठेवींचे प्रमाणपत्र, व्यावसायिक कागदपत्रे आणि कॉर्पोरेट बाँडसह कर्ज साधनांच्या संयोजनात गुंतवणूक करतात. साधारणपणे, या फंडांची अवशिष्ट परिपक्वता 6 महिने ते 1 वर्षापर्यंत असते.
अल्ट्रा शॉर्ट फंड (Ultra short term fund) हे साधारणत: कमी अस्थिरतेसह (Volatility) चांगला परतावा देतात. जे गुंतवणूकदार 1 किंवा 2 महिन्यांसाठी पैसे गुंतवणूक करू इच्छित आहेत; त्यांच्यासाठी हे फंड चांगले आहेत. आणि ज्या गुंतवणूकदारांना लिक्विड फंडापेक्षा चांगला परतावा हवा आहे, त्यांनीही अल्ट्रा शॉर्ट टर्म फंडमध्ये गुंतवणूक करण्यास हरकत नाही.
अल्ट्रा शॉर्ट म्युच्युअल फंडचे फायदे
- बँक ठेवीपेक्षा अधिक परतावा मिळवण्याची क्षमता
- अतिरिक्त निधी ठेवण्यासाठी अल्ट्रा शॉर्ट फंड उत्कृष्ट पर्याय
- एक वर्षापेक्षा कमी गुंतवणुकीचे लक्ष्य असलेल्यांसाठी चांगला पर्याय
- यात जोखीम पातळी अत्यंत कमी असते
बचत खात्यापेक्षा अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड चांगले आहेत का?
बाजारातील जोखमींमुळे पारंपरिक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे टाळतात. त्याऐवजी ते बचत खात्यामध्ये (Saving Account) पैसे ठेवण्याला प्राधान्य देतात. कारण त्यांच्यामते कोणत्याही जोखमीशिवाय (Risk) आणि अस्थिरतेशिवाय (Volatility) बचत खात्यातून चांगला परतावा मिळतो. बचत खाते आणि अल्ट्रा शॉर्ट फंड या दोन्हींमधून मिळणारा परतावा आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ. एक गुंतवणूकदार अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड आणि बचत खाते अशा दोन्ही स्कीममध्ये 40 लाख रूपयांची गुंतवणूक करतो. या दोन्हीवर त्याला अनुक्रमे 8 टक्के आणि 3.5 टक्के व्याज मिळते. हा व्याजदर उपलब्ध असलेल्या प्रचलित दरानुसार घेण्यात आला आहे. आता त्याला त्यातून मिळणारा परतावा आपण पाहू. अल्ट्रा शॉर्ट टर्म फंडमधून त्याला 32 हजार रूपयांचा परतावा मिळेल तर बचत खात्यातून त्याला 14 हजार रूपयांचा परतावा मिळेल.
2022-2023 या आर्थिक वर्षासाठी सर्वोत्तम ठरू शकतील अशा काही अल्ट्रा शॉर्ट टर्म फंडवर एक नजर टाकुया. कोणत्याही फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराची मदत घेऊनच गुंतवणूक करा.
हे टॉप 5 अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंड आहेत, ज्यात तुम्ही 2022 मध्ये गुंतवणूक करू शकता.
Fund Name | Fund Category | Rating | Launch | 1 Year Return (Annualized) |
---|---|---|---|---|
Debt | 5 Star | Sep-18 | 4.17 % p.a. | |
Debt | 4 Star | Jan-19 | 4.06 % p.a. | |
Debt | 4 Star | Jan-13 | 3.90 % p.a. | |
Debt | 5 Star | May-11 | 3.89 % p.a. | |
Debt | 4 Star | Sep-18 | 3.63 % p.a. |