कोरोनाच्या काळापासून अनेकजण बिटकॉईन / क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत. अने विकसित देशांमधील सरकारी बँका अशाप्रकारच्या चलनावर काम करत आहेत. भारतातही सरकारने क्रिप्टोकरन्सीवर टॅक्स लावण्याची घोषणा केली. याचाच अर्थ क्रिप्टोकरन्सीत पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारने याबाबत अद्याप नियम केलेले नाहीत. त्यामुळे अशा करन्सीच्या व्यवहारामधून फसवणूक होण्याची शक्यता आहे. म्हणून क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे फार महत्वाचे आहे.
What is bitcoin? बिटकॉईन म्हणजे काय
बिटकॉईन किंवा क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची रचना कशी आहे. त्यात प्रवेश कसा करायचा त्याची प्रचलित पॉलिसी काय आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. क्रिप्टो करन्सीचे एक रूप म्हणजे बिटकॉईन. बिटकॉईन हे आभासी चलन असून, ते ऑनलाइन उपलब्ध असते. बॅंका किंवा सरकार हे चलन छापत नाही. मायनिंग या अत्यंत क्लिष्ट प्रक्रियेतून बिटकॉईन बनवली जातात.
What is cryptocurrency? क्रिप्टो करन्सी म्हणजे काय
क्रिप्टो करन्सी म्हणजे चलनी नोटांना पर्याय असणारी एक डिजीटल वा व्हर्च्युअल करन्सी . बिटकॉईन, इथेरियम नावाच्या काही क्रिप्टोकरन्सी प्रसिद्ध आहेत. यातली बिटकॉईन क्रिप्टोकरन्सी 10 वर्षांपूर्वी लाँच करण्यात आली होती. जगभरात जसे रुपया, डॉलर, युरो आणि पाऊंड अशी विविधं चलने आहेत, तशाच जगभरात म्हणजेच इंटरनेट मायाजालावर वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सी आहेत.
बिटकॉईनचे फायदे काय?
- बिटकॉईनचे व्यवहार करण्यास कोणत्याही वेळेचे बंधन नाही. इंटरनेटच्या माध्यमातून अत्यंत कमी वेळेत आणि कधीही म्हणजेच 24 X 7 याचे व्यवहार करू शकतो.
- बिटकॉईनचा व्यवहार हा त्या फक्त दोन खात्यांमध्ये होत असतो. त्यामुळे याच्या व्यवहारात कोणत्याही मध्यस्थाची गरज नसते. इतर कुठल्याही ऑनलाईन व्यवहारात ही सुलभता नाही.
- पेमेंट सर्व्हिस गेटवे प्रोव्हायडर म्हणून याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे ऑनलाईन पैशाची देवाणघेवाण होऊ शकते.
- बिटकॉईनच्या व्यवहारासाठी डेबिट, क्रेडिट किंवा कुठलंही कार्ड लागत नाही. पण सुरूवातीला वॉलेट बनवायला एक ऑनलाईन व्यवहार करावा लागतो.
बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात घ्या
- बिटकॉईन हे सर्वसामान्य चलन नाही. म्हणजे यातून तुम्हाला तुमचा टॅक्स किंवा इतर गोष्टींचे मूल्य भरता येणार नाही.
- हे एक आभासी आणि गोपनीय चलन आहे. याचे 27 ते 34 कॅरेक्टर्सच्या अॅड्रेसमार्फत व्यवहार होतात. यात कोणत्याही पत्त्याची नोंद नसते. त्यामुळे हा व्यवहार गुप्त राहतो.
- बिटकॉईनच्या व्यवहारांवर कोणत्याही सरकारचे नियंत्रण नाही. या व्यवहारांसाठी कोणत्याही सरकारचे नियम नाहीत. म्हणूनच याचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त असते.
- सध्या इंटरनेटवरून व्यवसाय करणाऱ्या अनेक कंपन्यांनी बिटकॉईन्स स्वीकारायला सुरुवात केली. त्यामुळे बिटकॉईन्स मुख्य प्रवाहात हळुहळू यायला लागली आहेत.