Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सरकारच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक, जास्त परताव्यासह करातही पूर्ण सूट

PPF Rule

Image Source : https://www.freepik.com/

पीपीएफ खाते उघडण्याचा विचार करत असाल तर त्यासंबंधित नियम जाणून घेणे गरजेचे आहे. या खात्यात जमा केलेल्या रक्कमेवर कर आकारला जात नाही.

निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आधीपासूनच बचत करणे ही चांगली सवय आहे. सरकारद्वारे अशा अनेक योजना राबविल्या जातात, ज्यात सुरक्षित गुंतवणूक करून जास्त परतावा मिळतो. अशाच प्रकारची एक चांगली योजना म्हणजे Public Provident Fund (सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना). पीपीएफ खाते हे पूर्णपणे सुरक्षित असते व यात कोणतीही जोखीम न स्विकारता पैसे जमा करू शकता. या बचतीचा तुम्हाला भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. तुम्ही देखील पीपीएफ खाते उघडण्याचा विचार करत असाल तर त्याआधी याच्याशी संबंधित नियम जाणून घेणे फायद्याचे ठरेल.

पीपीएफ खात्याशी संबंधित महत्त्वाचे नियम 

पीपीएफ खातेएक व्यक्ती स्वतःच्या नावानेच केवळ एकच पीपीएफ खाते उघडू शकते. तसेच, हे खाते उघडण्यासाठी व्यक्तीकडे भारतीय नागरिकत्व असणे गरजेचे आहे. मुलगा अथवा मुलगी अल्पवयीन असल्यास पालक त्यांच्यावतीन खाते उघडू शकतात. तसेच, हे खाते ट्रान्सफर करता येत नाही.
जमा रक्कमतुम्ही पीपीएफ खात्यामध्ये वर्षाला दीड लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकता. तुम्ही ही रक्कम 12 हफ्त्यामध्ये जमा करू शकता. दरमहिन्याला 500 रुपये देखील जमा करणे शक्य आहे. या खात्याचा वापर न केल्यास अथवा पैसे जमा केले नाही, खाते पुन्हा जमा करण्यासाठी शुल्क आकारले जाते. पीपीएफ खात्यामध्ये जमा केलेल्या रक्कमेचा कालावधी हा 15 वर्ष असतो. 15 वर्षांच्या मुदतीनंतर तुम्हाला हवे असल्यास हा कालावधी 5 वर्षांसाठी वाढवू शकता.
व्याजदरपीपीएफ खात्यात जमा केलेली रक्कम ही पूर्णपणे सुरक्षित असते. यावर चांगला परतावा देखील मिळतो. सध्या पीपीएफ खात्यात जमा केलेल्या रक्कमेवर 7.1 टक्के दराने व्याज मिळते. समजा, तुम्ही 25 वर्षांच्या कालावधीसाठी दरवर्षी 1.50 लाख रुपये पीपीएफ खात्यात जमा केले तर मॅच्युरिटीनंतर तुम्हाला व्याजासह 1 कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळेल.
कर्ज व पैसे काढणेतुम्ही पीपीएफ खात्याला 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर यातून पैसे काढू शकता. आर्थिक वर्षात एकदाच पैसे काढणे शक्य आहे. यासाठी तुम्हाला फॉर्म-सी भरून द्यावा लागेल. या खात्यात जमा केलेल्या रक्कमेवर तुम्हाला कर्ज देखील मिळते. मात्र, या कर्जाची परतफेड 3 वर्षांच्या आत करणे गरजेचे आहे. जर तुम्ही या कालावधीत कर्जाची परतफेड केली नाही तर अतिरिक्त  व्याज आकारले जाते.
मुदतीपूर्वी खाते बंदमुदतीपूर्वी पीपीएफ खाते बंद करणे शक्य असले तरी यासाठी 5 वर्ष वाट पाहावी लागते. तुम्ही ठराविक फॉर्म बँकेत जमा करून मुदतीपूर्वी खाते बंद करू शकता.

पीपीएफ खात्यातील रक्कमेवर करात पूर्ण सूट

पीपीएफ खात्यात रक्कम जमा करण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे यातील गुंतवणुकीवर करात पूर्णपणे सूट मिळते. एका आर्थिक वर्षात जमा केलेले दीड लाख रुपये व यावर मिळणारे व्याज हे आयकर कायद्याच्या कलम 80C नुसार करपात्र नाही. याचाच अर्थ पीपीएफ खात्यात जमा केलेली रक्कम काढताना तुम्हाला कोणताही कर भरावा लागत नाही.