भारतात किंवा परदेशात विमानाने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाकडे पासपोर्ट (Passport)असणे गरजेचे आहे. पासपोर्ट कायदा 1967 अंतर्गत, भारत सरकारकडून विविध प्रकारचे पासपोर्ट जारी केले जातात. ज्यामध्ये सामान्य पासपोर्ट, डिप्लोमॅटिक पासपोर्ट आणि अधिकृत पासपोर्ट यांचा समावेश करण्यात आलेला असतो.
तुम्हालाही तुमचे पासपोर्ट बनवायचे असेल, तर त्याचे संपूर्ण नियम जाणून घेणे आवश्यक आहे. पासपोर्ट काढण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे लागतात. ज्याच्या मदतीने तो सहज काढता येतो. यामध्ये पत्ता आणि जन्माचा दाखला हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणून ओळखले जाते. या आधारे पडताळणीचे काम सुरू होते आणि पासपोर्ट ऑफिसकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर पासपोर्ट आठवडाभरात तयार होतो. ऑनलाईन पासपोर्ट काढताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, हे जाणून घेऊयात.
जन्म प्रमाणपत्र आणि पत्त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे कोणती ते जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
जन्म प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे-
- नगरपालिका आणि महानगरपालिकेने दिलेले जन्माचे प्रमाणपत्र
- शाळेचे प्रवेश पत्र
- आयुर्विमा पॉलिसी किंवा कोणत्याही सरकारी कंपनीचे बाँड
- निवृत्तीवेतनधारक व्यक्ती असल्यास प्रमाणित सेवा रेकॉर्ड
- आधार कार्ड
- मतदार ओळखपत्र
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
पत्त्यासाठी आवश्यक कागदपत्रे -
- महापालिकेनेचे पाणी बिल
- वीज बिल
- मतदार ओळखपत्र
- गॅस कनेक्शन बुकलेट
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- रेंट अॅग्रिमेंट
मोबाईल पासपोर्ट सेवा
भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने mPassport सेवा सुरू केली आहे. यामध्ये एक मोबाईल अॅप्लिकेशन सुरू केले आले आहे. ज्याच्या मदतीने स्मार्टफोनवर पासपोर्ट संबंधित सर्व माहिती मिळू शकते. mPassport सेवा अशा लोकांसाठी तयार करण्यात आली आहे, ज्यांना केवळ पासपोर्ट संदर्भातील माहिती मिळवायची आहे. या अॅपचा उपयोग करणे सोपे असून याच्या मदतीने तुम्ही पासपोर्ट सेवा केंद्रांचे स्थान, शुल्क, अर्जाची स्थिती, संपर्क कसा करावा आणि इतर माहिती मिळवू शकता.
पासपोर्ट कसा काढावा?
- पासपोर्ट सेवेच्या (https://www.passportindia.gov.in/AppOnlineProject/welcomeLink) वेबसाईटला भेट द्या
- त्याठिकाणी नवीन यूझरच्या बॉक्सवर क्लिक करा आणि रजिस्ट्रेशन पेजवर जा
- तुम्ही राहत असलेल्या शहरातील पासपोर्ट ऑफिस निवडा. तुमचे नाव कागदपत्रानुसार लिहा. उर्वरित फॉर्मही भरा
- सर्व तपशील भरल्यानांतर Register या पर्यायावर क्लिक करा
- याठिकाणी तुमचे अकाउंट तयार करण्यात येईल, त्यानंतर पासपोर्ट सेव्हीच्या वेबसाईटवर जा आणि हिरव्या रंगाच्या लॉगिन बटणावर क्लिक करा
- तुमचा अधिकृत ईमेल आयडी त्याठिकाणी लिहा आणि Continue पर्यायावर क्लिक करा
- ईमेल, पासवर्ड आणि इमेजमधील कॅप्चा टाइप करून Login वर क्लिक करा
- त्यांनतर Apply for Fresh Passport/Reissue of Passport पर्यायावर क्लिक करा
- येथे तुम्हाला दोन पर्याय पाहायला मिळतील. त्यापैकी पाहिल्यामध्ये तुम्ही फॉर्म डाउनलोड करा, तो संपूर्ण भरून पुन्हा वेबसाईटवर अपलोड करा किंवा दुसरा पर्याय हा ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करा.
- ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी Click here to fill the application form online या पर्यायावर क्लिक करा
- त्यानंतर तुम्हाला नवीन पासपोर्ट किंवा री-इश्यू, सामान्य किंवा तात्काळ, 38 पृष्ठे किंवा 60 पृष्ठांपैकी एक असे पर्याय पाहायला मिळतील, ज्याची निवड करावी लागेल. त्यानंतर नेक्स्ट पेजवर क्लिक करा
- यानंतर तुम्हाला काही माहिती विचारण्यात येईल, जी भरावी लागेल. कागदपत्रांमध्ये नोंद असलेली माहितीच तुम्ही याठिकाणी भरा. फॉर्म भरल्यानंतर उजव्या बाजूला खाली असलेल्या -Submit Application या पर्यायावर क्लिक करा
- आता View Saved/Submitted Applications या बटनावर क्लिक करा
- तुम्ही काही वेळापूर्वी भरलेला अर्ज पाहू शकता. यानंतर पे आणि शेड्यूल अपॉइंटमेंटवर क्लिक करा आणि ऑनलाईन पेमेंटचा पर्याय निवडा आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करा
- PSK Location च्या पुढील ड्रॉप डाउन मेनूवर जा आणि इमेजवरील अक्षरे टाईप करा. त्यानंतर Next वर क्लिक करून Pay and Book Appointment वर क्लिक करा
- याठिकाणाहून तुम्ही पेमेंट गेटवे पेजवर जाल. तुमची पेमेंट प्रक्रिया पूर्ण होताच, तुम्ही पासपोर्ट सेवेच्या वेबसाईटवर पोहोचाल. त्यानंतर Appointment Confirmation लिहिलेले दिसेल जेथे पासपोर्ट सेवा केंद्राकडून मिळालेल्या अपॉइंटमेंटचे डिटेल्स उपस्थित असतील
- Print Application Receipt वर क्लिक केल्यानंतर Print Application Receipt या पर्यायावर क्लिक करा. या प्रक्रियेनंतर तुम्हाला फॉर्मचा संपूर्ण प्रिव्ह्यू पाहायला मिळेल. त्यानंतर Print Application Receipt या पर्यायावर क्लिक करून अपॉइंटमेंट कन्फर्मेशनची प्रिंटआउट काढा
- तुम्ही पासपोर्ट सेवा केंद्रात गेल्यानंतर तुम्हाला एंट्रीसाठी या पावतीची प्रिंटआउट आवश्यक असेल
तत्काळ पासपोर्ट मिळतो का?
ज्यांना तत्काळ पासपोर्टची गरज असते, त्याच्यासाठी अशा स्वरूपाची सेवा पासपोर्ट ऑफिसकडून देण्यात येते. तत्काळ पासपोर्ट कोणाला द्यायचा आणि कोणाला नाही हे पासपोर्ट कार्यालय ठरवते. तत्काळ पासपोर्टचे दोन प्रकार आहेत, ज्यातील पहिल्या प्रकारात पोलिस पडताळणी आवश्यक असते. तर दुसऱ्या प्रकारात पोलिस पडताळणी आवश्यक नसते. पोलिस तपासाची गरज नसेल, तर पासपोर्ट अर्ज सादर केल्यानंतर एका दिवसानंतर पासपोर्ट जारी करण्यात येतो. पोलिस तपास करण्याची गरज भासल्यास तपास पूर्ण झाल्यानंतर तीन दिवसांनी पासपोर्ट देण्यात येतो.