Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pre-Wedding Photoshoot Tips: कमी पैशात प्री-वेडिंग फोटोशूट करायचे असेल, तर 'या' टिप्स फॉलो करा

Pre Wedding Photoshoot Tips

Image Source : www.weddingsutra.com

Pre-Wedding Photoshoot Tips: सध्या लग्नापूर्वी प्री-वेडिंग फोटोशूट करण्याचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. या फोटोशूटवर हजारो-लाखो रुपये खर्च केले जातात. हा खर्च आटोक्यात कसा आणायचा, हे जाणून घेण्यासाठी खालील टिप्स नक्की फॉलो करा.

लग्न (Wedding) हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय सोहळा असतो. याच सोहळ्याला आणखी खास बनवण्यासाठी नवविवाहित दांपत्य लग्न सोहळ्याचे आणि त्याच्या अगोदरच्या वेगवेगळ्या विधींचे फोटो काढतात. जेणेकरून हे क्षण आठवणीत राहतील. आजकाल लग्नाअगोदर प्री-वेडिंग फोटोशूट करण्याचा ट्रेंड (Pre-Wedding Photoshoot Trend) पाहायला मिळत आहे. या प्री-वेडिंगसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. लग्न समारंभात पैशांचे योग्य नियोजन करणे आणि त्यातून बचत करणे गरजेचे असते. जर तुम्हीही प्री-वेडिंग फोटोशूट करण्याचा विचार करत असाल, तर होणारा अतिरिक्त खर्च आटोक्यात कसा आणायचा, हे जाणून घेण्यासाठी खालील टिप्स नक्की फॉलो करा.

कमी पैशात प्री-वेडिंग फोटोशूट करण्यासाठी खालील टिप्स फॉलो करा

भाड्याने कपडे खरेदी करा (Clothes on Rent)

प्री-वेडिंग फोटोशूट करण्यासाठी नवदांपत्य एक थीम (Theme) ठरवतात. त्या थीमनुसार कपड्यांची खरेदी केली जाते. साऊथ इंडियन, वेस्टर्न, ट्रेडिशनल अशा वेगवेगळ्या प्रकारातील कपड्यांची निवड केली जाते. हे कपडे हजारो-लाखो रुपयांचे असतात. हा खर्च टाळता येऊ शकतो. त्यावर उपाय म्हणजे ठरलेल्या थीमनुसार कपडे भाड्याने खरेदी करणे. शक्यतो प्री-वेडिंग फोटोशूटसाठी वापरले जाणारे कपडे हे पुनर्वापरात येत नाहीत. त्यामुळे प्री-वेडिंगचे कपडे भाड्याने खरेदी करणे केव्हाही उत्तम.

स्थानिक स्थळांना प्राधान्य द्या (Prefer Local Places)

कपड्याच्या थीमप्रमाणे ज्या ठिकाणी फोटोशूट केले जाणार आहे, त्या जागेची थीम देखील ठरवली जाते. अनेकजण प्री-वेडिंग फोटोशूट परदेशात करतात. ज्यासाठी लाखो रुपये खर्च होतो. मात्र हा खर्च आटोक्यात आणण्यासाठी भारतात किंवा स्थानिक स्थळांना प्राधान्य देता येऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरील ठिकाणी फोटोशूट करण्यासाठी चार्ज केला जात नाही. ज्यामुळे हा अतिरिक्त खर्च टाळता येऊ शकतो.

नवख्या फोटोग्राफरला संधी द्या (Choose Newbie photographer)

अनेकजण प्री-वेडिंग फोटोशूट करण्यासाठी नामांकित फोटोग्राफरची निवड करतात. नामांकित फोटोग्राफर फोटो काढण्यासाठी मोठी रक्कम घेतात. याउलट तुम्हाला हवे असणारे फोटो डाऊनलोड करून तुम्ही एखाद्या नवख्या फोटोग्राफरला प्री-वेडिंग शूटची संधी देऊ शकता. यामुळे तुम्हाला हवे असणारे फोटोही काढता येतील, पैसेही वाचतील आणि नवख्या फोटोग्राफरला संधीही देखील मिळेल.

पॅकेजची तुलना करा (Compare Packages)

हल्ली बरेच फोटोग्राफर वेडिंग आणि प्री-वेडिंग फोटोशूट कॉम्बो पॅक (Combo-Pack) तयार करतात. हा पॅक तुम्ही तुलना करून पाहू शकता. बऱ्याच वेळा एकाच व्यक्तीकडे हा कॉम्बो पॅक खरेदी केल्यानंतर तो स्वस्तात पडतो.आजकाल सोशल मीडियावर यासंदर्भात अनेक जाहिराती पाहायला मिळतात. हा कॉम्बो पॅक खरेदी करण्यापूर्वी त्यामध्ये देण्यात येणाऱ्या सुविधांबद्दल माहिती करून घ्या. अनावश्यक वाटणाऱ्या सुविधा टाळून तुम्ही पैसे कमी करू शकता.