Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Hospital Itemized Bill: हॉस्पिटलचं भरमसाठ बिल टाळायचं असेल तर 'या' बिलाची मागणी कराच!

Hospital Itemized Bill

Hospital Itemized Bill: जेव्हा केव्हा तुम्ही हॉस्पिटलचे बिल भरायला जाल तेव्हा दिलेले बिल बारकाईने तपासून घ्या. त्यात लिहिलेले मुद्दे, वापरलेले सामान, दिलेली सेवा, शुल्क आकारणी व्यवस्थित आहे की नाही हे तपासून घ्या.

आजकाल हॉस्पिटलचा खर्च भरमसाठ वाढलाय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यातच जर हॉस्पिटल मोठे असेल, नामांकित असेल तर मग विचारुच नका. आरोग्याचा विषय असा असतो की जेथे रुग्ण ठीक व्हावा ही आपली प्राथमिकता असते. पैशांचा विचार आपण करत नाही. नेमक्या याच आपल्या मानसिकतेचा फायदा काही हॉस्पिटल घेताना दिसतात. सर्वच हॉस्पिटल असे करतात असे नाही, परंतु हॉस्पिटलकडे व्यवसाय म्हणून बघणारे काही लोक असा व्यवहार करताना दिसतात आणि अव्वाच्या सव्व्वा बिल लावताना दिसतात.

यासाठी जेव्हा केव्हा तुम्ही हॉस्पिटलचे बिल भरायला जाल तेव्हा दिलेले बिल बारकाईने तपासून घ्या. त्यात लिहिलेले मुद्दे, वापरलेले सामान, दिलेली सेवा, शुल्क आकारणी व्यवस्थित आहे की नाही हे तपासून घ्या. अनेकवेळा हॉस्पिटलने दिलेल्या सेवांचा, वापरलेल्या मेडिकल औषधींचा किंवा ऑपरेशनमध्ये वापरलेल्या सामानाचा तपशील नसतो. त्यामुळे खर्चाचा हिशोब सामान्य माणसाला लावता येत नाही. अशावेळी आपण ग्राहक म्हणून सजगपणा दाखवायला हवा.

हॉस्पिटलकडे सविस्तर बिल ( Itemized bill) मागा , जेव्हा हॉस्पिटलने दिलेल्या बिलात तपशीलवार माहिती नसेल तेव्हा आपण सविस्तर बिल मागायलाच हवे. जेणेकरून आपल्याला कुठल्या सुविधा दिल्या आहेत, कुठली औषधे वापरली आएत याचा होशोब आपल्याला लावता येईल.

रुग्णालयाचे सविस्तर बिल अनेक कारणांसाठी महत्त्वाचे आहे, त्यातील महत्वाची कारणे खालीलप्रमाणे:

पारदर्शकता (Transparency): रुग्णाला मिळणा-या वैद्यकीय सेवा आणि उपचारांबद्दल एक आयटमाइज्ड बिल पारदर्शकता दर्शवते. रुग्णांना त्यांच्याकडून नेमके कशासाठी शुल्क आकारले जात आहे हे यातून समजते. तसेच जुआ सुविधा किंवा औषधी घेतलेच नाहीत त्याची रक्कम कमी करण्यास देखील तुम्ही सांगू शकता.  

अचूकता (Correctness): रुग्णांना न मिळालेल्या सेवा किंवा उपचारांसाठी शुल्क आकारले जात नाही याची खात्री करण्यासाठी आयटमाइज्ड बिल मदत करते. हे बिलिंग त्रुटी आणि विसंगती टाळण्यास देखील मदत करते.यामुळे अधिक शुल्क जर आकारले जात असेल तर ते न भरण्याचे पूर्ण अधिकार ग्राहकाकडे आहेत हे लक्षात ठेवा.

विम्याचे दावे (Insurance Claim): जर तुमचा आरोग्य विमा असेल तर  विमा दाव्यांसाठी हे आयटमाइज्ड बिल अत्यंत आवश्यक आहे. विमा कंपन्या देखील याच आधारावर तुम्हाला पैसे देत असते. त्यामुळे तुमचे नुकसान होऊ नये, जास्त पैसे खर्चले जाऊ नयेत यासाठी आयटमाइज्ड बिल घेतलेच पाहिजे.

हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन ग्राहकांनी बिलाची मागणी केलीच पाहिजे. तुम्ही जेव्हा आयटमाइज्ड बिलाची मागणी करता तेव्हा काही हॉस्पिटल तुम्हांला बिलात सवलत देण्याची देखील तयारी दर्शवतात. परंतु अशावेळी सवलतीच्या मोहाला बळी न पडता आयटमाइज्ड बिलच घ्या, कारण जर तुमचा आरोग्य विमा क्लेम असेल तर त्यासाठी नंतर अडचणी उत्पन्न होऊ शकतात.

त्यामुळे सुरुवातीपासूनच हॉस्पिटलमध्ये होत असलेल्या खर्चाचा स्वतःकडे देखील हिशोब ठेवा आणि उपचारासाठी जी औषधे आपण स्वतः आणली आहेत त्याची बिले आणि हिशोब देखील आपल्याकडे ठेवा. तसेच न वापरलेले सामान किंवा औषधी मेडिकलला परत दिल्यास त्याची वजावट बिलात झाली आहे किंवा नाही हे देखील तपासून घ्या.