Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पीएफ खात्याचा UAN नंबर विसरलात, तर 'या' तीन पद्धतीने माहिती करून घ्या

PF Account UAN Number

PF Account UAN Number: आपण बऱ्याच वेळा घाईगडबडीत किंवा महत्त्वाच्या वेळी आपल्या पीएफ खात्याचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) विसरतो. अशा वेळी गडबडून न जाता फक्त तीन पद्धतींचा अवलंब करून तुम्ही हा UAN नंबर मिळवू शकता.

नोकरदार व्यक्तीच्या पगारातील काही हिस्सा हा पीएफ खात्यात (PF Account ) जमा होत असतो. जो वेगवेगळ्या प्रसंगी किंवा निवृत्तीनंतर काढता येतो. याच पीएफ खात्याला एक युनिक क्रमांक देण्यात आलेला आहे. त्याला तांत्रिक भाषेत यूएएन (Unique Account Number - UAN) नंबर म्हटले जाते. याच नंबरच्या मदतीने आपण या खात्यातील जमा रक्कम वेळोवेळी चेक करू शकतो.

हल्ली आपल्याकडे वेगवेगळ्या खात्याचे नंबर आणि पासवर्ड (Password) असतात. ते काहीवेळेस विसरण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे एखादा पीएफ खातेधारक UAN नंबर विसरू शकतो. अशावेळी घाबरून किंवा गोंधळून न जाता तुम्ही घरबसल्या UAN नंबर सहज मिळवू शकता. ऑनलाईन (Online), एसएमएस (SMS) किंवा मिस्ड कॉलच्या (Missed Call) माध्यमातून तुम्ही UAN नंबर शोधू शकता. यासाठी तुमचा अधिकृत मोबाईल क्रमांक (Register Mobile Number) तुमच्या पीएफ खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.

ऑनलाईन असा मिळवा UAN क्रमांक

ऑनलाईन पद्धतीने UAN नंबर जाणून घेण्यासाठी तुम्हाला EPFO च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. तिथे होम पेजवर डाव्या बाजूला असणाऱ्या 'Service Section' या पर्यायावर क्लिक करा. इथे क्लिक केल्यावर नवीन विंडो ओपन होईल. तिथे डाव्या बाजूस UAN ऑनलाईन सर्व्हिस या पर्यायावर क्लिक करा. तिथे तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाका. त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवर OTP येईल. हा ओटीपी क्रमांक टाकल्यानंतर खातेधारकाला नाव, जन्म तारीख, आधारकार्ड नंबर टाकावा लागेल. त्यानंतर 'Show My UAN' या पर्यायावर क्लिक केल्यानंतर खातेधारकाला UAN नंबर दिसेल.

एसएमएसद्वारे मिळवा UAN नंबर

तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एसएमएसच्या (SMS) माध्यमातून तुम्ही UAN नंबर जनरेट करू शकता. यामध्ये तुम्हाला समजणारी भाषा (Language) निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरून तुम्ही EPFOHO UAN ENG असा मेसेज 7738299899 या नंबरवर पाठवला की, तुम्हाला UAN नंबर सोबत इतरही माहिती उपलब्ध होईल.

मिस्ड कॉल द्या आणि UAN क्रमांक मिळवा

रजिस्टर मोबाईल क्रमांकावरून पीएफ खातेधारक मिस्ड कॉल (Missed Call) देऊन UAN क्रमांक जाणून घेऊ शकतो.  त्यासाठी त्याला रजिस्टर मोबाईलवरून 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. या नंबरवर मिस्ड कॉल दिल्यानंतर लगेचच तुम्हाला EPF विभागाकडून त्वरित एक मेसेज प्राप्त होईल. ज्यामध्ये तुमच्या UAN नंबर सोबत इतर महत्त्वाची PF खात्यासंदर्भातील माहिती दिली जाते.

Source: www.moneycontrol.com