Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कोविडनंतर प्रवास करताय मग प्रवास विमा घ्यायला विसरू नका!

insurance travel

कोरोना आल्यापासून प्रवास विम्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. कोणत्या देशात काय परिस्थिती उद्भवू शकते हे सांगता येत नाही. या दरम्यान तुम्ही प्रवास विमा घेतल्यास तुमचे फारसे आर्थिक नुकसान होणार नाही, झाला तर फायदाच अधिक होईल.

मागील 2 वर्षात कोविड महामारीमुळे संपूर्ण जग आहे त्या ठिकाणी बंदिस्त झालं होत. महामारीनंतर सध्या हळूहळू सगळ्याच गोष्टी पूर्वपदावर येत आहेत. देश-विदेशातील सगळी पर्यटस्थळे पुन्हा सुरु झाली आहेत. त्यामुळे सगळेच बॅग भरून प्रवासाला निघायच्या विचारात आहेत. तसेच अनेकांना नोकरी आणि व्यवसायासाठी प्रवास करावा लागतो. या प्रवासात कोणती अडचण कधी येईल हे सांगता येत नाही. प्रवसातील अडचणीवर मात करण्यासाठी प्रवास विमा (Travel insurance) हाताशी असणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रवास विमा घ्या आणि प्रवासाला निघा. 

प्रवास विमा म्हणजे काय? (What is Travel insurance?) 

प्रवास विमा म्हणजे (Travel insurance policy) असा विमा, जो प्रवासात येणाऱ्या अडचणींमुळे  उद्भवणाऱ्या संकटातुन निर्माण होणाऱ्या आर्थिक अडचणीत आपली मदत करणारी पॉलिसी. प्रवास विम्यामध्ये देशांतर्गत प्रवास असो की विदेश, सहल किंवा कार्यालयीन काम असो, प्रवासा दरम्यान संभाव्य नुकसान आणि आर्थिक नुकसान झालेच तर हा विमा आपल्या मदतीला धावून येतो. कोरोना आल्यापासून प्रवास विम्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. कोणत्या देशात काय परिस्थिती उद्भवू शकते, हे सांगता येत नाही. या दरम्यान तुम्ही प्रवास विमा घेतला असल्यास तुमचे फारसे आर्थिक नुकसान होणार नाही, झाला तर फायदाच अधिक होईल.

प्रवास विम्याचे प्रकार (Types of Travel Insurance)

  1.  सिंगल ट्रिप – ही फक्त एका प्रवासा दरम्यान घेता येते म्हणजे आपला एक प्रवास संपला की हा विमा संपतो.
  2. अनेक ट्रीप करता – ज्यांना कौटुंबिक किंवा व्यवसाय व नोकरीनिमित्त वेळोवेळी प्रवास करावा लागतो अशा लोकांकरता हा एक उत्तम व्यावसायिक प्रवासी  विमा  (Business Travel Insurance) आहे.
  3. शैक्षणिक प्रवासा करता - विद्यार्थी जे विदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाऊ इच्छितात त्यांच्या करता हा खास असा विमा असतो जो अशा विद्यार्थ्यांनी नक्की घ्यायला हवा.
  4. ग्रुप विमा योजना- एकाच वेळी बरेच जण सोबत प्रवासाला निघणार असतील हा विमा खूप फायदेशीर ठरतो .परंतु यात जास्तीजास्त किती जण एका ग्रुप पॉलिसीत कव्हर होतात ते पाहिलं पाहिजे. साधारण 5- ७ जण बऱ्याच विमा कंपन्या विमा कव्हर देत असतात. या व्यतिरिक्त आपण जर आपल्या काही गरजा मांडून एखादी स्पेशल पॉलिसी  सुद्धा विमा कंपन्या कडून तयार करू शकता.

ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी करण्याअगोदर पाहिल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी

  • मेडिकल सुविधा – ट्रॅव्हल इन्शुरन्स खरदी करताना सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या प्रीमियम मध्ये मेडिकल सुविधा कव्हर केल्या आहेत का हे पाहिले पाहिजे.समजा तुम्ही बाहेरच्या देशात फिरायला गेला आणि तुम्ही प्रवासामुळे आजारी पडला ,विदेशात मेडिसिन खूप महागड्या आहेत.विदेशातील महागड्या मेडिसिन तुम्हाला परवडणार नाहीत. म्हणून तुम्ही ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना प्रीमियम मध्ये मेडिकल सुविधा कव्हरेज घेतले पाहिजे.
  • अपघाती मृत्यू –  एखादा व्यक्ती बाहेरच्या देशात ट्रॅव्हल करत आहे आणि दुर्देवाने त्याचा विदेशात मृत्यू झाला तर. त्याने ट्रॅव्हल इन्शुरन्स खरेदी केलेली कंपनी त्या मृत व्यक्तीला विदेशातून आपल्या देशात आणण्याचा खर्च उचलते.
  • बॅगेज चोरी – आजकाल चोरीचे प्रमाण खूप वाढलय. समजा तुमची बॅग चोरी झाली किंवा तुमचे पाकीट चोरी झाले तर ट्रॅव्हल इन्शुरन्स घेतलेली कंपनी तुम्हाला बॅगेज चोरी झाल्याच्या बदल्यात एक विशिष्ट रक्कम देते.
  • ट्रिप कॅन्सलेशन – समजा काही कारणास्तव तुमची ट्रिप कॅन्सल झाली.तर तुम्ही ट्रॅव्हल इन्शुरन्स घेतलेली कंपनी प्रीमियम रक्कम रिफंड न करता त्यातील काही विशिष्ट रक्कम तुम्हाला देते.


प्रवास विम्याचे स्वरूप  

प्रवास विमा आपण 5 दिवसापासून 500 दिवसापर्यंत घेऊ शकतो, मग तो आपण एका दिवसासाठी,महिन्यासाठी किंवा वर्षासाठी घेऊ शकतो. प्रवास विम्याच्या प्रीमियम ची रक्कम ही आपले वय,आपण कोणत्या देशात फिरायला जाणार आहे त्या देशाचे नाव या गोष्टींवर अवलंबून असते. सध्या बाजारात 500 रुपये प्रीमियम पासून 2000 रुपये प्रीमियम असलेल्या पॉलिसी आहेत.  काही प्रवास विमा कंपन्या प्रवास करण्याच्या दिवसापर्यंत विमा घेण्याची सुविधा देतात. पण आपल्या प्रवासाच्या 15 दिवस आधी विमा काढल्यास तुम्हाला काही बोनस कव्हरेजही मिळू ष्टो. आयत्या वेळेला घाई करण्यापेक्षा आधीच प्रवास विका पॉलिसी काढणे सोईचे होते.

प्रवास विमा ऑनलाईन कुठून घ्यायचा  (How to get travel Insurance)

प्रवास विमा ऑनलाईन घेणे अधिक सोईचे होते. तुम्ही कोणती पॉलिसी घ्यायची हे तुमच्या समोर असलेल्या विमा पॉलिसी पर्यायांच्या संख्येवर अवलंबून असेल, पॉलिसीचे फायदे आणि नियम बघून कोणती पॉलिसी घ्यायची ते ठरवा. बाजारात आदित्य बिर्ला ट्रॅव्हल इन्शुरन्स, बजाज अलियान्झ ट्रॅव्हल इन्शुरन्स, भारती एक्सए ट्रॅव्हल इन्शुरन्स, एचडीएफसी एर्गो जनरल ट्रॅव्हल इन्शुरन्स, इफको टोकियो ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि ओरिएंटल ट्रॅव्हल इन्शुरन्स या काही प्रवासी विमा कंपन्या आहेत. या व्यतिरिक्त बर्‍याच कंपन्या आहेत परंतु पॉलिसी कव्हरमध्ये काय आहे हे बघून प्रवास  विमा निवडू शकता.

प्रवास विमा घेताना प्रत्येक कंपनीनुसार त्यांच्या अटी आणि नियम वेगवेगळे असतात. तेव्हा विमा घेताना काही बाबी कव्हर आहेत, काय बाबी वगळल्या आहेत हे आवर्जून तपासा. दोन-चार कंपनी कडून माहिती मागवून आपल्या सोयीची कोणती पॉलिसी आहे हे बघून प्रवास विमा पॉलिसी निवडा.