Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITR: आयटीआर फाइल केल्यानंतरही जर रिफंड मिळाले नाही, तर तुमच्या कडून झालेल्या 'या' चुका तपासा

Filing ITR

Image Source : www.indiafilings.com

Filing ITR: तुम्ही ITR भरला असेलच. यामध्ये तुमचा रिफंड अजून आला आहे की नाही? हा खरा प्रश्न आहे. जर रिफंड आला नाही तर, आयटीआर भरतांना तुमची चूक झाली असेल. म्हणूनच एकदा क्रॉस चेक करणे आवश्यक आहे. कारण, आता रिटर्नची प्रक्रिया खूप वेगवान झाली आहे आणि आता आयकर परतावा 7 ते 10 दिवसांतच मिळतो. तरीही, जर तुमचा परतावा (Refund) आला नसेल, तर तुमच्याकडून काही चूक झाली असेल.

ITR Refund: तुम्ही अद्याप आयटीआर फाइलिंग केले नसेल, तर हे काम लवकरात लवकर करा. कारण यावेळी देखील ITR दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. होय,  आणि जर का सगळेच एकावेळी भरायला गेले, तर साइटवर ट्रॅफिक वाढल्यामुळे काही दिवसांनी तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. याशिवाय, आयकर विभागाकडून सांगण्यात आले की, 11 जुलै 2023 पर्यंत 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 2 कोटीहून अधिक आयकर रिटर्न भरले गेले आहेत. ही संख्या गेल्या वर्षीच्या आकडेवारीपेक्षा अधिक आहे.

जर का तुम्ही ITR भरला असेल. यामध्ये तुमचा रिफंड अजून आला आहे की नाही? हा खरा प्रश्न आहे. जर रिफंड आला नाही तर, आयटीआर भरतांना तुमची चूक झाली असेल. म्हणूनच एकदा क्रॉस चेक करणे आवश्यक आहे. कारण, आता रिटर्नची प्रक्रिया खूप वेगवान झाली आहे आणि आता आयकर परतावा 7 ते 10 दिवसांतच मिळतो. तरीही, जर तुमचा परतावा (Refund) आला नसेल, तर तुमच्याकडून काही चूक झाली आहे, हे नक्की.  ती तपासणे फार गरजेचे आहे. कारण रिफंड होण्यास का बरं उशीर होतो, त्याची कारणे आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.

संपूर्ण माहिती न देणे

जर तुम्ही तुमच्या ITR मध्ये अपूर्ण माहिती दिली असेल, तर तुमचा रिफंड थांबवला जाऊ शकतो. यासाठी तुम्ही ITR Preview  तपासू शकता. यानंतर तुम्ही इतर माहिती आणि कागदपत्रांसह तुमचे ITR Filing करुन देणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधू शकता.

कर भरला नसल्यास

जर तुम्ही कोणत्याही प्रकारचा कर भरला नसेल किंवा तुमच्या गणनेत काही चूक झाली असेल, तर तुम्हाला आयकर बाबत सूचना देखील मिळू शकते. नोटीस मिळाल्यावर आयकर विभागाकडून तुमचा कोणत्याही प्रकारचा परतावा थांबवला जाऊ शकतो.

चुकीची बँक खाते माहिती

कोणत्याही प्रकारे तुमची बँक खाते माहिती चुकीची प्रविष्ट केली असल्यास, तुमचा परतावा रोखला जाऊ शकतो. वास्तविक, परताव्यासाठी तुमचे खाते तपशील अचूक असणे सर्वात महत्त्वाचे आहे. माहिती बरोबर नसल्यास, या प्रकरणात तुम्हाला 'रिफंड री-इश्यू'ची विनंती करावी लागेल, तेव्हा एकदा तपासा.

डिडक्शन मधील चुका

अनेक वेळा डिडक्शन मधील चुका या ITR दाखल केल्यानंतर पकडल्या जाते. नीट चेक केल्यावर, तुम्ही आयटीआर कपातीबाबत काहीतरी चूक केली असल्याचे तुमच्या लक्षात येईल. अशा परिस्थितीत, जर तुम्ही योग्य डिडक्शनचा दावा केला नसेल, तर तुम्हाला सुधारित (परत) आयटीआर दाखल करावा लागेल.

रिफंड विनंतीमध्ये चूक

तुमच्या रिफंड विनंतीमध्ये काही चूक असल्यास तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस प्राप्त होऊ शकते. अशा वेळी तुमची गणना चुकीची असू शकते, तर तुम्हाला रेक्टिफिकेशन आयटीआर फाइल करणे आवश्यक आहे.