Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Loan Against Property: मालमत्तेवर मिळेल 10 कोटींपर्यंत कर्ज; IDFC बँकेची ऑफर चेक करा

IDFC Bank Loan against property

IDFC बँक मालमत्तेवर 10 कोटीपर्यंत कर्ज देत आहे. तसेच कर्जफेडीचा कालावधीही 25 वर्षापर्यंत आहे. उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा इतर कोणत्याही मोठा खर्च भागवायचा असेल तर मालमत्तेवर कर्ज मदतीला येईल. कर्जाच्या ऑफरबद्दल जाणून घ्या.

IDFC Bank Loan Against Property: उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा इतर कोणत्याही मोठा खर्च भागवायचा असेल तर मालमत्तेवर तुम्ही कर्ज घेऊ शकता. बऱ्याच वेळा जास्त पैशांची गरज लागते तेव्हा पर्सनल लोन हवे तेवढे मिळत नाही. मात्र, मालमत्तेवर तुम्हाला IDFC बँकेकडून 10 कोटींपर्यंत कर्ज मिळू शकते. जाणून घ्या काय आहे ऑफर.

पैशांची निकड होईल पूर्ण

तुम्हाला बिझनेस सुरू करायचा असेल तर लाखो, कोटींमध्ये पैशांची गरज पडेल. तसेच लग्न, घराची डागडूजी, सजावट किंवा इतर कोणत्याही कारणासाठी कर्ज मिळत नसेल तर तुम्ही मालमत्तेवर कर्ज घेऊ शकता. 

घर, प्लॉट, शेतजमीन, व्यावसायिक जमीन, बंगलो, दुकान अशा मालमत्ता तुम्ही बँकेकडे तारण ठेवून कर्ज घेऊ शकता. (IDFC Bank Loan against property) विशेष म्हणजे कर्ज घेताना मालमत्ता बँकेच्या नावावर करण्याची गरज नाही. ही मालमत्ता तुमच्याच नावावर राहील. मात्र, तुम्हाला वेळेत हप्ते भरावे लागतील. अन्यथा मालमत्तेवर टाच येऊ शकते.

IDFC बँकेची ऑफर काय आहे?

IDFC बँक मालमत्तेवर 10 कोटीपर्यंत कर्जाची ऑफर देत आहे. तसेच कर्जफेडीचा कालावधी 25 वर्षापर्यंत आहे. त्यामुळे पुरेसा वेळही तुम्हाला मिळेल.

सहसा मालमत्तेच्या 60% मूल्यापर्यंत कर्ज दिले जाते. मात्र, IDFC बँक 80% पर्यंत मालमत्तेच्या मूल्यावर कर्ज देते. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त कर्ज मिळेल.

IDFC बँकेकडून 8.25% पासून पुढे व्याजदर आकारला जात आहे. गृहकर्जापेक्षा सहसा मालमत्तेवर कर्ज घेत असताना दीड ते दोन टक्के जास्त व्याजदर आकारला जातो. तसेच कर्जदाराचे उत्पन्न, मालमत्तेचा प्रकार, मूल्य, कर्ज कालावधी यासह इतरही अनेक गोष्टींवर व्याजदर अवलंबून असतो.

तुम्ही जर आधीच दुसऱ्या बँकेकडून मालमत्तेवर कर्ज घेतले असेल तर लोन IDFC बँकेत ट्रान्सफर करू शकता. त्यामुळे कमी व्याजदर आणि इतर फायदे तुम्हाला मिळतील.

पगारदार, व्यावसायिक आणि NRI नागरिक IDFC बँकेत कर्जासाठी अर्ज करू शकतात.

कमीत कमी 12 महिने आणि जास्तीत जास्त 300 महिन्यांपर्यंत म्हणजेच 1 वर्ष ते 25 वर्षापर्यंत कर्जाचा कालावधी तुम्ही घेऊ शकता.

10 लाख ते 10 कोटीपर्यंतच्या मालमत्तेवर तुम्हाला कर्ज मिळेल. मालमत्तेचे बाजार मूल्य बँकेकडून ठरवण्यात येईल. 

मालमत्तेवर कर्ज घेताना कोणती कागदपत्रे लागतील?

मालमत्तेवर कर्ज घेताना पगारदार आणि व्यावसायिक यांना वेगवेगळी कागदपत्रे लागतात. (IDFC Bank Loan against property) मात्र, काही कागदपत्रे दोघांसाठीही समान आहेत. ओळखपत्र, रहिवासी पुरावा, नोकरी करत असेल तर दोन वर्षांचा ITR फाइल केल्याचा पुरावा, मालमत्तेची सर्व कागदपत्रे, व्यवसाय असले तर परवाना, जीएसटी आणि ITR डिटेल्स, आधीपासून काही कर्ज सुरू असल्यास त्याचा पुरावा अशी कागदपत्रे लागतात. अधिक माहितीसाठी तुम्ही बँकेच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. कागदपत्रांसोबत इतरही माहिती तुम्हाला मिळेल.