Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

What Are The Rule Of Mortgage Loan? तारण कर्जाचे नियम आणि डिटेल्स माहित करून घ्या

What Are The Rule Of Mortgage Loan

What Are The Rule Of Mortgage Loan?: तुम्हाला जर तारण कर्ज घ्यायचे असेल त्याबाबतीत असलेले नियम आणि त्याबद्दल माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. तारण कर्जाच्या बाबतीत रूल्स आणि डिटेल्स जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख.

What Are The Rule Of Mortgage Loan?: तारण कर्ज म्हणजे काय? आणि त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती (Mortgage Loan Details)असल्याशिवाय तुम्ही तारण कर्ज घेऊ शकत नाही. तारण कर्ज हे देखील इतर कर्जासारखे आहे. घर किंवा मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेतले तर त्याला तारण कर्ज असे म्हणतात. हे कर्ज कोण घेऊ शकतो? त्याला कोणती कागदपत्रे लागतात हे जाणून घेणे महत्वाचे ठरते. ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी पुढे वाचा. 
तारण कर्ज कोण घेऊ शकते? तारण कर्जासाठी, प्रत्येक बँकेने भिन्न पात्रता निकष केले आहेत, काही सर्वात सामान्य निकष खालीलप्रमाणे,

  • तुम्ही भारताचे रहिवासी असणे आवश्यक आहे. 
  • तुमचे वय किमान २५ वर्षे आणि कमाल ७५ वर्षे असावे. 
  • जर तुम्ही स्वयंरोजगार करत असाल तर तुम्ही किमान तीन वर्षे एकाच व्यवसायात काम  केले असावे.
  • कर्जाची मात्रा किमान रु. 5 लाख, कमाल - निवासी भारतीय - रु. 10 कोटी आणि अनिवासी भारतीय - रु. 5 कोटी
  • जास्तीत जास्त परतफेड कालावधी असेल 15 वर्षे (180 महिने)
  •  रहिवासी भारतीयांसाठी तृतीय पक्ष हमी (Third Party Guarantee)अनिवार्य नाही.


जमिनीवर कर्ज घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

मालमत्तेवर तारण कर्जासाठी अर्ज करताना तुम्हाला काही कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे, ते पुढीलप्रमाणे,

  • तुमच्या पॅन कार्डच्या कॉपीसह तारण कर्ज अर्जाचा फॉर्म योग्यरित्या भरा. 
  • आधार कार्ड (Aadhaar Card) / ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License)/ मतदार ओळखपत्र (Voter ID Card)/ भाडेपट्टी किंवा भाडे करार (Lease or Rent Agreement)
  • व्यवसायाचा पुरावा विक्रीकर / सेवा कर /  व्हॅट नोंदणी / व्यवसाय परवाना / भागीदारी करार / सराव प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा पुरावा मागील तीन वर्षांचे आयटीआर विवरण, बॅलन्स शिट, पी अँड एल खाते आणि मागील सहा महिन्यांचे बँक डिटेल्स 


सर्व तारण कर्जासाठी अर्ज कसा करावा?

तारण कर्जासाठी अर्ज करण्यासाठी, तुम्ही वित्तीय संस्थेच्या वेबसाइटवर किंवा त्यांच्या शाखा कार्यालयात जाऊन वैयक्तिकरित्या अर्ज करू शकता. वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे, 

  • मालमत्ता वेबपृष्ठावरील तारण कर्जावर जा. 
  • वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या पात्रता निकष विभागातून तुमची पात्रता चेक करा. 
  • तारण कर्ज पेजवर, तारण कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे चेक करा. 
  • आता अर्ज करा' टॅबवर क्लिक करा आणि आवश्यक माहिती भरा, आणि ऑनलाइन फॉर्म सबमिट करा.
  • तुमच्या तपशिलांवर समाधानी झाल्यानंतर, संस्थेचे अधिकारी तुमच्याशी कॉनटॅक्ट साधतील.
  • तुम्ही वित्तीय संस्थेच्या जवळच्या शाखेत किंवा आउटलेटला भेट देऊन तारण कर्जासाठी अर्ज करू शकता.