Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ideaForge IPO: ग्रे मार्केटमध्ये तेजीत असलेला ideaForge IPO आज खुला होणार, जाणून घ्या सविस्तर

IPO

ideaForge IPO: IPO खुला होण्यापूर्वीच ग्रे मार्केटमध्ये आयडियाफोर्जच्या शेअरने धुमाकूळ घातला आहे. आयडियाफोर्जचा शेअर ग्रे मार्केटमध्ये 485 रुपये प्रीमियमसह ट्रेड करत आहे.

ड्रोन उत्पादन करणाऱ्या आयडियाफोर्ज टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीची सार्वजनिक समभाग विक्री योजना आज सोमवार 26 जून 2023 पासून खुली होणार आहे. ग्रे मार्केटमध्ये आयडियाफोर्जच्या शेअरला प्रचंड मागणी असून आयपीओतील इश्यू प्राईसच्या तुलनेत हा शेअर 70% प्रीमियमवर ट्रेड होत आहे. त्यामुळे आयपीओतील समभाग विक्रीला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

आयडियाफोर्ज समभाग विक्रीतून 567 कोटी उभारणार आहे. आयपीओसाठी कंपनीने प्रती शेअर 638 ते 672 रुपये असा किंमत पट्टा निश्चित केला आहे. गुंतवणूकदारांना 29 जून 2023 पर्यंत आयपीओसाठी अर्ज करता येणार आहे. गुंतवणूकदारांना किमान 22 शेअर्ससाठी अर्ज करता येईल.

IPO खुला होण्यापूर्वीच ग्रे मार्केटमध्ये आयडियाफोर्जच्या शेअरने धुमाकूळ घातला आहे. आयडियाफोर्जचा शेअर ग्रे मार्केटमध्ये 485 रुपये प्रीमियमसह ट्रेड करत आहे.  IPO प्राईसच्या तुलनेत ग्रे मार्केटमध्ये आयडियाफोर्जचा भाव 70% जास्त आहे. 4 जुलै 2023 रोजी शेअरचे वाटप होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर संरक्षण क्षेत्रात करण्याबाबत धोरण तयार केले आहे. त्यामुळे ड्रोन उत्पादनातील कंपन्यांना भविष्यात फायदा होण्याची शक्यता आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकिंग कंपनीने आयडियाफोर्जच्या आयपीओला सबस्क्राईब करण्याचा सल्ला दिला आहे.

'या' दिवशी होणार लिस्टींग

आयडियाफोर्जचा शेअर बीएसई आणि एनएसई या दोन्ही शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध होणार आहे. लिंकइनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आयडियाफोर्जच्या आयपीओचे व्यवस्थापन करत आहे. येत्या 7 जुलै 2023 रोजी आयडियाफोर्जचा शेअर शेअर मार्केटमध्ये लिस्ट होण्याची शक्यता आहे.

आणखी एक ड्रोन उत्पादक शेअर बाजारात एंट्री घेणार 

आयडियाफोर्जच्या निमित्ताने ड्रोन उद्यागोतील आणखी एक कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट होणार आहे. यापूर्वी ड्रोनआचार्य एरियल इनोव्हेशन ही कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाली होती. आज सोमवारी 26 जून 2023 रोजी ड्रोनआचार्यचा शेअर 184 रुपयांवर ट्रेड करत आहे. यात 5.81% वाढ झाली.