IDBI Bank Scheme : आपल्या देशात मुदत ठेवी (Fixed Deposit) हा खूप आवडीचा विषय आहे. मग कुणी मुलांच्या शिक्षणासाठी, कुणी लग्नकार्यासाठी तर कुणी आपले भविष्यातील जे काही प्लॅनिंग असेल; ते पूर्ण करण्यासाठी अनेकदा आणि वेगवेगळ्या बँकामध्ये फिक्स डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेवी करतात. आयडीबीआय बँकेची 'अमृत महोत्सव एफडी' योजना 1 एप्रिल 2023 पासुन लागू झालेली आहे. आयडीबीआय बँकेनी आपल्या किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ही योजना सुरु केली आहे. खाजगी क्षेत्रातील आयडीबीआई बँकेने आपल्या ग्राहकांसाठी आगळी वेगळी योजना आणलेली आहे. आयडीबीआय बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी किमतींच्या एफडीवरील (मुदत ठेवी) व्याजदरात सुधारणा केली आहे.
Table of contents [Show]
काय आहे योजनेचे स्वरुप
'अमृत महोत्सव एफडी' योजने अंतर्गत ज्येष्ठ गुंतवणूकदारांसाठी 7.65 टक्के आणि सामान्य जनतेकरीता 7.15 टक्के रिटर्न दिले जाणार आहे. या अमृत महोत्सव योजनेचा लाभ घेऊन नागरिक आपल्या भविष्यातील ईच्छा पूर्ण करु शकतात. कारण या योजनेवर मोठ्या प्रमाणात रिटर्न दिले जात आहे.
बँकेच्या अन्य योजनांवरील व्याज दर
बँक 7 ते 30 दिवसांमध्ये परिपक्व (मॅच्युअर्ड) होणाऱ्या एफडींवर 3 टक्के व्याज देत आहे. तर 31 ते 45 दिवसांमध्ये मॅच्युअर्ड होणाऱ्या एफडीवर 3.3 टक्के व्याज देत आहे. आणि 46 ते 90 दिवसांच्या एफडीवर 4.25 टक्के. तसेच 91 दिवस ते 6 महिन्यांमध्ये मॅच्युअर्ड होणाऱ्या एफडीवर 4.75 टक्के व्याज देत आहे. तसेच, आयडीबीआय बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी किमतींच्या एफडीवरील व्याजदरात सुधारणा केली आहे.
टॅक्स सेविंग एफडी कोणत्या आहेत?
अनेकदा नागरिक टॅक्स वाचविण्याकरिता एक मोठी रक्कम एफडी करीत असतात. तेव्हा आयडीबीआय बँक पाच वर्षाच्या टॅक्स सेविंग फिक्स्ड डिपॉजिट करीता सामान्य गुंतवणूकदारास 6.25 टक्के आणि वरिष्ठ नागरिकांसाठी 6.75 टक्के व्याज देत आहे.
आयडीबीआयच्या इतरही योजना
आयडीबीआय बँकेने आपल्या इतरही ग्राहकांचा कल लक्षात घेता, काही योजनांवर वेगळा व्याजदर देण्याचे निश्चित केले आहे. सहा महिने, एक वर्ष आणि दोन वर्षांत मॅच्युअर्ड होणाऱ्या एफडीवर अनुक्रमे 5.5 आणि 6.75 टक्के व्याज आयडीबीआय बँक देणार आहे.