Krishna Earns 37 Lakh Rupees a Day : अरविंद कृष्णा फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ न्यूयॉर्कच्या संचालक मंडळातही आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सीईओंच्या यादीत कृष्णा यांचे नाव आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून 7800 कर्मचारी कपात करण्याच्या निर्णयामुळे अरविंद कृष्णा सध्या चर्चेत आहेत.
सर्वाधिक मानधन घेणारे सीईओ
आपल्या विविध गुणांसाठी आणि कल्पनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अरविंद कृष्णा यांच्याकडे 15 पेटंट आहेत. त्यांचे पदवी शिक्षण आयआयटी कानपूरमधून झालेले आहे आणि त्यांनी इलिनॉय विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये पीएचडी केली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सीईओंच्या यादीत कृष्णा यांचे नाव आहे.
IBM ला पूढे नेण्यात महत्त्वाची भूमिका
वर्ष 1990 मध्ये कृष्णा IBM मध्ये व्यवस्थापक म्हणून रूजू झाले. चांगल्या कामातून त्यांनी आपली वेगळी छाप पाडली. तसेच कंपनीला फायदा होईल असे अनेक निर्णय घेतले. 2020 मध्ये त्यांची सीईओ पदी निवड झाली. सीईओ होण्यापूर्वी ते IBM मध्ये उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते.
2022 मध्ये अरविंद कृष्णा यांना महिन्याला सुमारे 135 कोटी रुपये पगार दिला जात होता. म्हणजेच त्यांना एका दिवसाला 37 लाख रुपये पगार मिळत होता. अनेक वर्षांपासून IBM च्या महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्या कृष्णा यांनी आयबीएमला पुढे नेण्यात महत्वाची भूमिका बजावली. अरविंद कृष्णा यांनी 34 बिलियन डॉलरमध्ये विकत घेतलेल्या रेड हॅट संघाचे नेतृत्व केले. IBM ही आघाडीची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी आहे. न्यूयॉर्क येथे कंपनीचे कार्यालय असून जगभरात ऑफिसेस आहेत.