ज्या कारची रेंज फुल चार्जिंगनंतर (Charging) 450 किलोमीटरच्या वर असेल आणि कारवर घसघशीत ऑफर (Offere) असेल तर? ह्युंदाई कंपनी त्यांच्या इलेक्ट्रिक वाहन कोना (Hyundai Kona) कारवर तब्बल 1 लाख रुपयांपर्यंत ऑफर देत आहे. ही प्रचंड अशी सूट ग्राहकांना मिळणार आहे. ही सवलत 31 जुलै 2023पर्यंत वैध असणार आहे.
किंमत 23.84 लाख रुपयांपासून सुरू
कंपनीच्या या वाहनाच्या बेस व्हेरिएंटची किंमत 23.84 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 24.03 लाखांपासून सुरू होते, या वाहनात 39.2 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे आणि या वाहनाची पॉवर 134bhp आहे. कारला पूर्णपणे चार्ज होण्यासाठी जवळपास 6 तास लागतात.
भारतीय कार बाजारात प्रतिस्पर्धी कोण?
हे इलेक्ट्रिक वाहन ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये देण्यात आलं आहे. या वाहनात 2 मोनोटोन आणि 3 ड्यूअल टोन शेड्स देण्यात आले आहेत. हे वाहन टाटा नेक्सन ईव्ही, महिंद्रा एक्सयूव्ही 400 ईव्ही, बीवायजी अट्टे 3 (BYD Atto 3) आणि एमजी झेड एस ईव्हीला (MG ZS EV) भारतीय कार मार्केटमध्ये टक्कर देत आहे. या कारमध्ये पाच सीटर बसण्याची क्षमता आहे.
सिक्युरिटी फीचर्स
वाहन स्थिरता व्यवस्थापन (Vehicle stability management) आणि इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रणासह (Electronic stability control) प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वाहनाला 6 एअरबॅग्ज मिळतात. हिल असिस्ट कंट्रोल आणि ऑल-व्हील डिस्क ब्रेक्स, आयसोफिक्स चाइल्ड सीट अँकरएजिस, रिअर कॅमेरा आणि टायर प्रेशर यासारखी सुरक्षा वैशिष्ट्ये या कारमध्ये देण्यात आली आहेत.