Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Hyundai Investment Plan: ह्युंदाय मोटरची 70000 कोटींची गुंतवणूक, इलेक्ट्रि्क कार्सची नवी मॉडेल्स आणणार

auto

Image Source : www.deep.hyundaimotor.in

Hyundai Investment Plan: दक्षिण कोरियाची आघाडीची ऑटो कंपनी ह्युंदाय मोटरने 8.5 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वच्छ इंधनाचा अर्थात इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीवर कंपनीने लक्ष केंद्रीत केले आहे. याती काही गुंतवणूक भारतात होण्याची शक्यता आहे.

जागतिक पातळीवर आघाडीची वाहन उत्पादक कंपनी असलेल्या ह्युंदाय मोटर कंपनीने 8.5 बिलियन डॉलर्सची (भारतीय चलनात 70000 कोटी रुपये) गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांची इलेक्ट्रिक कारला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे ह्युंदायकडून इलेक्ट्रिक कार सेगमेंटवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. (Hyundai Motor unveils $8.5-billion spending plan amid EV push)

ह्युंदाय मोटरकडून लवकरच चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले जातील. यात महसुलात 11.5% वाढ अपेक्षित असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे भागधारकांना भरघोस लाभांश देण्याचे संकेत कंपनीने दिले आहे.

ह्युंदायकडून नुकताच गुंतवणूक आराखडा सादर करण्यात आला. यात इलेक्ट्रिक कार्सला प्रोत्साहन देण्यासाठी भक्कम गुंतवणूक केली जाणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. वर्ष 2022 मध्ये ह्युंदायच्या टस्कन एसयूव्ही, सोनाटा आणि आयओनिक या इलेक्ट्रिक कार्स सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार ठरल्या होत्या. या श्रेणीत कंपनीने एकूण 43 कार्सची जगभरात विक्री केली. 2021 च्या तुलनेत विक्रीत 10% वाढ झाली होती.



किया कॉर्पशी संयुक्त उद्यम असलेल्या ह्युंदायने बहुतांश कार्सचे इलेक्ट्रिक व्हर्जन आणण्याची तयारी सुरु केली आहे. इलेक्ट्रिक कारच्या संशोधनासाठी कंपनीकडून मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. त्याशिवाय नव्याने उत्पादन क्षमता वाढवली जाणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. एसयूव्ही प्रकारातील कार्निव्हलच्या विक्रीत किमान 10% होण्यासाठी ह्युंदायकडून प्रयत्न केले जात आहेत. टोयोटो आणि फोक्सवॅगन या कंपन्यांनंतर ह्युंदाय आणि किया ही जगातील तिसरी मोठी कार उत्पादक कंपनी आहे.

मागील दोन वर्षात ऑटो इंडस्ट्री पेट्रोल आणि डिझेल, सीएनजी या पारंपारिक इंधनाऐवजी स्वच्छ इंधनावर अर्थात इलेक्ट्रिकमध्ये हळुहळू परावर्तीत झाली आहे. बजेट कारपासून लक्झरी कार पर्यंत सर्वच कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार्सच्या निर्मितीला प्राधान्य दिले आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत उद्योजक असलेल्या एलन मस्क यांच्या टेस्लाकडून यापूर्वीच ई कार्सचे व्यापक उत्पादन घेतले जात आहे. आता या मोहीमेत इतर ऑटो कंपन्या देखील सहभागी झाल्या आहेत.