Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Hyundai IONIQ 5 Electric Car: 1 लाख रुपयांत बुक करा 'Hyundai IONIQ 5 Electric' कार

Electric Car

Image Source : www.thedriven.io

Hyundai IONIQ 5 Electric Car: ग्राहकांना Hyundai IONIQ 5 Electric कार खरेदी करायची असेल तर त्यांना फक्त 1 लाख रुपये भरून ती बुक करता येऊ शकते. या इलेक्ट्रिक वाहनाची बुकिंग 21 डिंसेबर 2022 पासून सुरू झाली आहे.

Hyundai IONIQ 5 Electric Car: हल्ली जगभरातील (World) बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड खूप मोठ्या वेगाने वाढत आहे. त्यामुळेच तरुणाईमध्ये अशा गॅजेट्सचे प्रचंड प्रमाणात क्रेझ वाढत चालली आहे. भारतीय बाजारात Hyundai ने अखेर आपले नवीन इलेक्ट्रिक वाहन 'Hyundai IONIQ 5' लॉन्च केले आहे. Hyundai IONIQ 5 ही कार गेटवे ऑफ इंडिया येथे लॉन्च करण्यात आली. यावेळी कंपनीकडून एक खास ऑफर ग्राहकांसाठी देण्यात आली होती. ग्राहकांना जर ही इलेक्ट्रिक कार खरेदी करायची असेल तर त्यांना फक्त 1 लाख रुपये भरून ती बुक करता येऊ शकते. या इलेक्ट्रिक वाहनाची बुकिंग 21 डिंसेबर 2022 पासून सुरू झाली आहे.  Hyundai IONIQ 5, E-GMP (इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्युलर प्लॅटफॉर्म) वर विकसित केलेले पहिले मॉडेल असून पंप-टू-प्लग क्रांती सुरू करण्यासाठी आता हे सज्ज आहे.चला तर या गाडीच्या फीचर्स बद्दल जाणून घेऊयात.

Hyundai IONIQ 5  कारचे फीचर्स -

  • Hyundai IONIQ 5 देखील 21 Hyundai Smart Sense वैशिष्ट्यांसह (लेव्हल 2 ADAS) सोयीस्कर आणि अत्याधुनिक ड्रायव्हिंगचा अनुभव देते 
  • ही कार केवळ 18 मिनिटांत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते
  • Hyundai IONIQ 5 V2L (वाहन-टू-लोड) सह सुसज्ज आहे
  • आतील व बाहेरील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान जे 3.6 kW पर्यंत विद्युत उपकरणांना उर्जा देते 
  • सुरक्षेच्या दृष्टीने या कारच्या २०२१ च्या मॉडेलने युरोपमधील युरो एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार रेटिंग मिळवले आहे 
  • Hyundai IONIQ 5 मध्ये लेन कीप असिस्ट, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ड्रायव्हर अटेन्शन वॉर्निंग यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत
  • कारमध्ये 12.3-इंचाचा HD टचस्क्रीन मुख्य डिस्प्ले आणि आणखी 12.3-इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे 
  • वायरलेस फोन चार्जिंग, हेड-अप डिस्प्ले, सनरूफ, प्रिमियम रिलॅक्सेशन सीट, रिलॅक्सेशन फंक्शनॅलिटी, इलेक्ट्रिक अॅडजस्टमेंट, लंबर सपोर्ट, स्लाइडिंग सेंटर कन्सोल इ. सुविधांनी ही कार ग्राहकांच्या सेवेत सज्ज आहेत