Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Hybrid Fund Advantages : हायब्रीड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे फायदे

what is hybrid mutual fund aggressive hybrid fund meaning top 10 hybrid mutual funds hybrid mutual

Hybrid Fund Advantages : दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास इक्विटीमध्ये महागाईवर मात करण्याची क्षमता असते. मात्र यातील गुंतवणूकीवरील परतावा हा शेअर बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असतो. यामुळे इक्विटीबरोबरच पोर्टफोलिओमध्ये सुरक्षित गुंतवणुकीला देखील महत्वाचे स्थान आहे. यामुळे गुंतवणुकीत हा समतोल महत्वाचा ठरतो.

दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास इक्विटीमध्ये महागाईवर मात करण्याची क्षमता असते. मात्र यातील गुंतवणूकीवरील परतावा हा शेअर बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असतो. यामुळे इक्विटीबरोबरच पोर्टफोलिओमध्ये सुरक्षित गुंतवणुकीला देखील महत्वाचे स्थान आहे. यामुळे गुंतवणुकीत हा समतोल महत्वाचा ठरतो. इथे हायब्रीड म्युच्युअल फंडांची उपयुक्तता लक्षात येते. Hybrid Fund Advantages काय आहेत ते बघणारच आहोत. पण त्याआधी हा फंड काय आहे, कसे काम करतो ते बघूया.

हायब्रीड म्युच्युअल फंड म्हणजे काय? (What is Hybrid/ Balanced Mutual Fund)

हायब्रीड म्युच्युअल फंड या प्रकारात इक्विटी आणि डेटमध्ये गुंतवणूक केली जाते. यामुळे एकाच वेळी दोन्ही पर्यायात गुंतवणुकीची संधी गुंतवणूकदाराला उपलब्ध होते. फंड मॅनेजर इक्विटी आणि डेटमध्ये प्रमाणशीर वाटप करतो. प्रत्येक फंड हाऊस आपापल्या पद्धतीने गुंतवणुकीचे वाटप करते. यामुळे गुंतवणूकीत विविधता येते. गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये वैविध्य असणे महत्वाचे मानले जाते. हायब्रीड म्युच्युअल फंडाचे अनेक प्रकारांमध्ये असतात. (Types of Hybrid Mutual Funds)  डेट ओरिएंटेड फंडामध्ये ( debt-oriented fund) डेटमधील गुंतवणुकीचे प्रमाण जास्त असते. या फंडामधील एकूण रकमेपैकी किमान 60 टक्के रक्कम डिबेंचर्स,  बाँड्स अशा  निश्चित उत्पन्न देणाऱ्या  रोख्यांमध्ये गुंतवले जातात.  यामध्ये इक्विटीचे प्रमाण कमी असते. 40 टक्के पर्यंत इक्विटीमध्ये गुंतवले जातात. इक्विटी ओरिएंटेड हायब्रीड फंड (equity oriented hybrid funds) हा इक्विटीप्रधान असतो. यात इक्विटीचे प्रमाण जास्त असते.  एकूण मालमत्तेपैकी किमान 65% इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित अॅसेटमध्ये  वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूक केली जाते.  डेट सिक्युरिटीजमध्ये 35% पर्यंत गुंतवणूक केली जाते.

हायब्रीड म्युच्युअल फंडाचे फायदे  (hybrid mutual fund Advantages)

वेगवेगळी गुंतवणूक करण्याचे कष्ट वाचतात 

हायब्रीड म्युच्युअल फंडामध्ये आपल्याला अनेक मालमत्ता वर्गांमध्ये एकाच वेळी गुंतवणूक करता येते. गुंतवणुकीच्या स्वरूपानुसार प्रत्येक फंडामध्ये वेगवेगळी गुंतवणूक करण्याची गरज पडत नाही. प्रत्येक गुंतवणुकीसाठी वेगवेगळी प्रक्रिया करण्याचा त्रास वाचतो.

गुंतवणुकीत वैविध्यता येते (Investment Diversified) 

हे एक महत्वाचे hybrid mutual fund advantage आहे. हायब्रिड फंड तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीत विविधता आणण्यास मदत करते. गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये हे महत्वाचे मानले जाते. इक्विटी, सोने, कर्ज रोखे यासारख्या मालमत्तांमध्ये गुंतवणूक केली जाते.

जोखीम कमी होते 

इक्विटीमध्ये महागाईवर मात करत त्यापेक्षा अधिक परतावा देण्याची क्षमता असते. पण ते बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असल्याने त्यात जोखीमही असते. हायब्रीड म्युच्युअल फंडामध्ये डेट मधील गुंतवणूकीमुळे ही जोखीम कमी होते. हादेखील hybrid mutual fund advantage आहे.

मार्केटसाठी द्यावा लागणारा वेळ वाचतो 

हा एकूणच म्युच्युअल फंडाचा फायदा आहे. आपण जेव्हा स्टॉकमध्ये गुंतवणूकीचा विचार करतो तेव्हा बाजाराचा व्यवस्थित अभ्यास करावा लागतो. ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. मात्र आपण जेव्हा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करतो. तेव्हा फंड ही प्रक्रिया पार पाडत असतो. यामुळे मार्केटचा आपल्याला सखोल अभ्यास करावा लागत नाही. ज्याला इक्विटीमध्ये गुंतवणुकीची सुरुवात करायची आहे त्याच्यासाठी  हायब्रीड फंडाचा पर्याय चांगला मानला जातो. मात्र यातही जोखीमीचा भाग असतो. तेव्हा आपली आर्थिक क्षमता, उद्दिष्टे आणि जोखीम घेण्याची क्षमता याचा सारासार विचार करून निर्णय घेणे योग्य असते.