• 08 Jun, 2023 00:35

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Appliance Maintenance Tips: तुमच्या घरगुती उपकरणांची निगा कशी राखाल? जाणून घ्या साध्यासोप्या टिप्स

home appliances Maintenance

आपल्या घरगुती उपकरणांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आणि हानीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि नियमित देखभाल करणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. या साध्यासोप्या टिप्सचे अनुसरण करून, आपण आपल्या उपकरणांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करू शकता आणि अनावश्यक खर्च टाळू शकता.

घरगुती उपकरणे हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक आवश्यक भाग आहेत. कुलर, एसी, गॅस शेगडी, कॉम्प्युटर, मिक्सर, मायक्रोव्हेव, वॉशिंग मशीन इत्यादी इत्यादी. या सगळ्या वस्तू आपण आपलं काम सुलभ व्हावं, लवकर व्हावं म्हणून खरेदी करतो. परंतु या इलेक्ट्रोनिक वस्तूंची निगा राखणं  देखील महत्वाचं आणि अत्यावश्यक आहे हे विसरू नका. या महागड्या वस्तूंची दुरुस्ती किंवा नवीन खरेदी टाळण्यासाठी त्यांचं नुकसान होणार नाही यासाठी विशेष काळजी घेणं खर तर शहाणपणाचे ठरणारे आहे. चला तर तुमची घरगुती उपकरणे सुरक्षित कशी ठेवायची, त्यांची निगा कशी राखायची यासाठी आपण साध्यासोप्या टिप्स  बघुयात.

मॅन्युअल काळजीपूर्वक वाचा

जेव्हा केव्हा तुम्ही नवीन उपकरण खरेदी करता तेव्हा त्याच्यासोबत आलेले मॅन्युअल वाचत नाही. नेमकी इथेच आपण चूक करतो. या मॅन्युअलमध्ये उपकरणाची निगा कशी राखायची, कशी त्याची काळजी घ्यायची, बिघडले तर काय करायचे इत्यादी गोष्टींचा तपशील दिलेला असतो. उपकरणासंबंधी सुरक्षा सूचना आणि नुकसान टाळण्यासाठी टिप्स त्यात दिलेल्या असतात. वेगवगेळ्या उपकरणांसाठी वेगवगेळ्या टिप्स असतात हे लक्षात असू द्या. म्हणजेच फ्रीज आणि एसी या दोन्ही गोष्टींसाठी वेगवेगळ्या उपाययोजना कराव्या लागतात. फ्रीजसाठी असलेले उपाय एसीसाठी लागू पडणार नाहीत, आणि एसीसाठी असलेले उपाय फ्रीजसाठी लागू पडणार नाहीत, त्यामुळे त्यांचे वेगवेगळे मॅन्युअल असते, ते आपण वाचलेच पाहिजे.

योग्य इलेक्ट्रिकल आउटलेट्स वापरा

तुमची उपकरणे योग्य विद्युत आउटलेट्समध्ये प्लग करा जे त्यांच्या पॉवर आवश्यकतेनुसार डिझाइन केलेले आहेत. एक्स्टेंशन बोर्ड (Extension Board) किंवा अडॅप्टर (Adapter) वापरणे टाळा, कारण ते उपकरणाचे सर्किट ओव्हरलोड करू शकतात आणि वस्तूचे नुकसान होऊ शकते.

नियमित देखभाल करा

तुमच्या उपकरणांची नियमित देखभाल केल्याने होणारे संभाव्य नुकसान टाळता येते आणि वस्तूचे आयुष्य वाढवता येते. वापरकर्ता मॅन्युअलमध्ये (User Manual) दिले गेलेल्या देखभाल वेळापत्रकाचे (Maintenance Time Table) अनुसरण करा.

सर्ज प्रोटेक्टर (Surge Protector) वापरा

वीज पुरवठ्यामध्ये चढ-उतार झाल्यास किंवा पॉवर सर्जमुळे तुमच्या उपकरणांचे नुकसान होऊ शकते, विशेषत: पावसाळ्यात वादळाच्या वेळी ही समस्या भेडसावते. आपल्या उपकरणांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी, तुमच्या उपकरणांचे व्होल्टेज स्पाइक्सपासून संरक्षण करण्यासाठी सर्ज प्रोटेक्टर वापरा.

उपकरणांची स्वच्छता ठेवा

तुमची उपकरणे नियमित साफ केल्याने नुकसान टाळता येऊ शकते. उपकरणांच्या छिद्रांमध्ये धुलीकण व इतर कचरा जाऊ शकते, ज्यामुळे उपकरण गरम होणे, आवाज करणे अशा इतर समस्या उद्भवू शकतात. धुलीकण काढण्यासाठी मऊ ब्रश किंवा व्हॅक्यूम क्लिनरचा वापर करा.

सुरक्षित हालचाल करा

उपकरणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना ते सुरक्षित राहतील याची खात्री करून घ्या आणि त्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्या. सामानची वाहतूक करताना योग्य पॅकिंग साहित्य (Packing Material) वापरा, जसे की बबल रॅप (Bubble Wrap) आणि पुठ्ठ्याचे बॉक्स इत्यादी. महागडी उपकरणे असतील तर  व्यावसायिक मूव्हर्सच्या मदतीने उपकरणांची हालचाल करा.

उपकरणांचा विमा काढा

तुमची उपकरणे कुठल्याही नुकसानीपासून, चोरीपासून किंवा अपघातांपासून संरक्षित रहावी असा जर तुम्ही विचार करत असाल तर उपकरणांचा विमा उतरवण्याचा नक्की प्रयत्न करा. गृह विमा पॉलिसी उपकरणांचे नुकसान कव्हर करू शकतात,तसे प्रावधान देखील गृह विम्यात असते. यासंबंधी जेव्हा तुम्ही गृह विमा घ्याल तेव्हा विमा कंपनीकडे याबाबत विचारणा करा आणि जास्तीत जास्त उपकरणांचा पॉलिसीमध्ये समावेश करून घ्या.  

आपल्या घरगुती उपकरणांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आणि हानीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि नियमित देखभाल करणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. या साध्यासोप्या टिप्सचे अनुसरण करून, आपण आपल्या उपकरणांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करू शकता आणि अनावश्यक खर्च टाळू शकता.