Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Income Tax Planning : आयटीआर भरताना 'या' भत्त्यांचा तपशील टाका आणि टॅक्स वाचवा

Income Tax Planning

भत्ते वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत आणि कर्मचारी दरमहा त्यावर दावा करू शकतात. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR – Income Tax Return) भरताना हे भत्ते मदत करतात.

जर तुम्ही पगारदार व्यक्ती असाल आणि आयकर देखील भरत असाल, तर गुंतवणुकीच्या पुराव्याव्यतिरिक्त, तुम्हाला कंपनीकडून मिळणाऱ्या भत्त्यावर कर कपातीचा लाभ देखील मिळू शकतो. किंबहुना, भत्ते हे एक प्रकारचे आर्थिक फायद्यासारखे असतात जे नोकरदार कर्मचाऱ्याला त्याच्या मालकाकडून मिळतात. विशेष म्हणजे ते कराचा बोजा कमी करण्यासही मदत करतात. भत्ते वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत आणि कर्मचारी दरमहा त्यावर दावा करू शकतात. इन्कम टॅक्स रिटर्न (ITR – Income Tax Return) भरताना हे भत्ते मदत करतात. करदात्यांना दरवर्षी आयटीआर भरावा लागतो, त्यामुळे 2023 च्या सुरुवातीपासून आयटीआर दाखल करताना उपयोगी पडणारे विविध भत्ते आणि संबंधित कर लाभ समजून घेणे महत्त्वाचे आहे.

7 भत्त्यांवर कर कपातीचे फायदे 

कर्मचाऱ्यांना मिळणारे भत्ते करपात्र, अंशतः करपात्र आणि करपात्र नाही असे असतात. सर्वात लोकप्रिय भत्ते हे कलम 10 अंतर्गत आहेत ज्यांचे तपशील फॉर्म 16 मध्ये पगारदार व्यक्तींना त्यांच्या नियोक्त्यांकडून प्राप्त झालेले आहेत. फॉर्म 16 हे एक प्रमाणपत्र आहे ज्यामध्ये स्त्रोतावर कर वजावट (TDS), कलम 10 अंतर्गत सूट आणि वेतन ब्रेकअप यांचा तपशील आहे. करदात्यांनी आर्थिक वर्ष 2022-23 साठी त्यांचा आयटीआर चालू वर्षाच्या 31 जुलैपर्यंत दाखल करणे आवश्यक आहे.

घरभाडे भत्ता (से. 10(10A)) 

घरभाडे भरण्यासाठी मिळणाऱ्या भत्त्याला घरभाडे भत्ता म्हणतात. एचआरए हा बेसिक पगाराच्या 40 ते 50 टक्क्यांपर्यंत असतो, भाड्याने राहणारे पगारदार व्यक्ती एचआरएवर कर सवलतीचा दावा करू शकतात.

लिव्ह ट्रॅव्हल कंसेशन किंवा असिस्टंस (LTC/LTA) (10(5)) 

या भत्त्याअंतर्गत, भारतात रजेवर असताना कर्मचार्‍याने केलेला प्रवास खर्च करमुक्त खर्च म्हणून मानण्यात येतो. त्यामुळे, कर्मचार्‍याला दिलेले पैसे नियोक्त्याकडून करमुक्त भत्ता म्हणून दिला जातो. प्रवासाची पद्धत रेल्वे, विमान किंवा सार्वजनिक वाहतूक असावी.

मुलांचा शिक्षण भत्ता  

या अंतर्गत, दरमहा जास्तीत जास्त 2 मुलांपर्यंत, दरमहा प्रति बालक 100 रुपयांपर्यंत कर सवलत उपलब्ध आहे.

गणवेश भत्ता 

कार्यालयीन कर्तव्ये किंवा नोकरी दरम्यान परिधान करण्यासाठी गणवेश खरेदी किंवा देखभाल करण्यासाठी खर्च वास्तविक खर्च केलेल्या रकमेच्या मर्यादेतून सूट देण्यात आली आहे.

पुस्तके आणि नियतकालिक भत्ता

पुस्तके, वर्तमानपत्रे, नियतकालिके, मासिके इत्यादींसाठी झालेल्या खर्चावर आयकर कायद्यानुसार करमुक्त रिबर्समेंट दिली जाते.

रिलोकेशन अलाउन्स

कंपन्या कर्मचार्‍यांना व्यावसायिक कारणास्तव दुसर्‍या शहरात शिफ्ट होण्यास सांगतात. नियोक्ता कार वाहतूक खर्च, कार नोंदणी शुल्क, पॅकेजिंग शुल्क, पहिल्या 15 दिवसांसाठी निवास आणि ट्रेन/एअर तिकिटांवर झालेल्या खर्चाची परतफेड करतो, ही रिबर्समेंट करमुक्त आहे.

हेल्पर अलाउन्स 

ज्या प्रकरणांमध्ये नियोक्ता तुम्हाला कार्यालयातील अधिकृत कर्तव्ये पार पाडण्यासाठी मदतनीस नियुक्त करण्याची परवानगी देतो अशा प्रकरणांमध्ये हेल्पर भत्ता दिला जातो.