How To Repay Home Loan If Job Lost: प्रत्येकाला आपल्या स्वप्नातले घर(Dream Home) खरेदी करण्याची ईच्छा असते. पण हे घर खरेदी करण्यासाठी कधीही आपल्याकडे एकरकमी रोख(Cash) पैसे नसतात. अशा वेळी मदत होते ती बँकेतून घेतलेल्या 'गृहकर्जाची(Home Loan)'. कित्येक लोक गृहकर्ज घेऊन स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न साकार करतात आणि त्यानंतर सुरु होतो तो EMI चा तगादा. पण तुम्ही कधी विचार केलायं का? ज्या नोकरीच्या जीवावर आपण गृहकर्ज घेतलेलं असतं, तीच नोकरी(Job) गेली तर…अशा वेळी लाखो किंवा करोडो रुपयांचं गृहकर्ज कसं फेडायचं? EMI वेळच्या वेळी नाही भरला गेला तर बँक(Bank) काय करते? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा.
अशा वेळी बँक काय करते?(What does a bank do at such a time?)
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ठप्प झालेले उद्योगधंदे(Business) आणि थांबलेलं अर्थव्यवस्थेचं चाक अशी परिस्थिती आपण अलीकडेच पाहिली होती. त्यावेळी अनेकांच्या नोकऱ्या गेल्या(Job Lost) होत्या, आर्थिक उत्पन्न बंद झालं होतं, काहींच्या पगारातही कपातही(Salary Deduction) करण्यात आली होती. मात्र त्यावेळी रिझर्व्ह बँकेने(RBI) 3 महिने गृहकर्ज हप्ते न भरण्याची मुभा दिली होती. नोकरदार वर्गाला त्याच्या पगारावर कर्ज देण्यात येतं पण समजा नोकरी गेली आणि गृहकर्ज वेळच्या वेळी तुम्ही भरू शकला नाही तर घाबरून जाण्याची गरज नाही. कर्ज भरू न शकण्याच्या परिस्थितीत लोक बऱ्याचदा त्यांनी बँकेला दिलेल्या पत्त्यावर(Bank Address) राहत नाहीत, कारण त्यांना भीती असते की कर्जाची(Loan) परतफेड केली नाही म्हणून बँक त्यांना त्रास देईल, तर तसं काही नसतं. एखादा कर्जदार जेव्हा हप्ते वेळेत भरत नाही तेव्हा बँक त्यांना डिफॉल्टर(Defaulter) बनवते. अशा वेळी बँक त्या व्यक्तीचं कर्ज खातं(Bank Account) लगेच बंद करून त्यांचं घर ताब्यात घेत नाही. बँक सर्वप्रथम थकीत कर्जाची जास्तीत जास्त वसुली करण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी बँक कर्जदाराशी चर्चा करण्यासाठी भेटायला बोलावते किंवा फोन(Phone) करते आणि त्या परिस्थितीतून मार्ग काढते.
कर्जदाराने काय करावे?(What should the borrower do?)
कर्जदाराकडे हप्ते भरण्यासाठी पैसे नसतील, तर लपण्यापेक्षा किंवा पळण्यापेक्षा परिस्थितीला सामोरं जाण्याचा प्रयत्न करणं केव्हाही चांगलं. अशा कठीण काळात कर्जदाराने(Borrower) हताश न होता नवीन नोकरी शोधायला सुरुवात(Find Out New Job) करायला हवी. नव्या नोकरीत कदाचित अपेक्षित किंवा आधी होता तेवढा पगार मिळणार नाही. अशा वेळी बँक प्रतिनिधीला भेटून कर्जाची पुनर्रचना(Loan Restructure) करण्यासंदर्भात चर्चा करायला हवी. थोडक्यात समजून घ्यायचं झालं तर, समजा पूर्वी 20 वर्षांसाठी गृहकर्जाचा मासिक हप्ता(Monthly EMI) 10,000 रूपये होता. तर तो बँकेशी बोलून कमी करून 6,000 रूपये 30 वर्षांसाठी करून घेता येऊ शकतो. यामध्ये EMI ची रक्कम कमी होईल आणि गृहकर्जाची मुदत(Loan Duration) वाढेल. यामुळे कर्जदारावरील आर्थिक बोजा कमी होईल आणि बँकेचं होणारं नुकसानही टळेल. अर्थात हे समजून घ्यायला हवं की, मुदत वाढल्याने अधिक व्याज(Interest) भरावं लागणार आहे. पण चालू परिस्थितीमध्ये कर्जदारावरील ताण कमी होण्यासाठी हे करणे गरजेचे आहे. याशिवाय कर्जदार बँकेकडून काही महिन्यांची वाढीव मुदत मागू शकतो. कर्जदाराच्या कर्ज परतफेडीचा रेकॉर्ड आणि अडचण लक्षात घेऊन बँक त्यासंदर्भात निर्णय घेते. कर्जाची परतफेड न करता जर कर्जदार डिफॉल्टर(Defaulter) बनला तर बँकेशी असलेले त्याचे संबंध खराब होतातंच शिवाय क्रेडिट स्कोअर(Credit Score) सुद्धा कमी होतो. त्यामुळे तुम्हाला भविष्यात नंतर कधीही कर्जाची गरज लागली तर खूप समस्या उद्भवू शकतात.