Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Registration of heirs: शेतजमिनीमध्ये वारसाची नोंद कशी करावी? जाणून घ्या

Registration of heirs

Registration of heirs: शेतजमीन मूळ मालकाच्या मृत्यनंतर वारसदाराच्या (the heir) नावे कशी करायची? याबाबत अनेकांना शंका असतात. माहिती नसल्यामुळे अशी कामे रखडली राहतात, तर जाणून घेऊया वारसा हक्कासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

Registration of heirs: ग्रामीण भागातील वडीलोपार्जित शेतजमीन ज्याच्या नावावर आहे. ती शेतजमीन मूळ मालकाच्या मृत्यनंतर वारसदाराच्या नावे कशी करायची? याबाबत अनेकांना शंका असतात. माहिती नसल्यामुळे अशी कामे रखडली राहतात, तर जाणून घेऊया वारसा हक्कासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

ई-हक्क प्रणाली काय आहे?

महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागानं शेतकऱ्यांना ऑनलाईन सुविधा देण्याच्या उद्देशाने ई-हक्क प्रणाली सुरू केली आहे. ई-हक्क प्रणालीच्या माध्यमातून शेतकरी घरी बसून 7 ते 8 प्रकारचे अर्ज करू शकतात. यात सातबारावर बोजा चढवणे, कमी करणे, नाव दुरुस्त करणे, इत्यादि कामांसाठी अर्ज करता येतो.

ऑनलाइन अर्ज कसा करावा? (How to apply online?)

agricultural-land-1.jpg
  • सर्वात आधी अर्ज करण्यासाठी भुलेख महाभूमी असे सर्च करावे लागेल. 
  • त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची अधिकृत वेबसाईट तुमच्यासमोर येईल. 
  • 7/12 दुरुस्तीसाठी ई हक्क प्रणाली' त्याच्याखाली एक लिंक दिलेली असेल  या लिंकवर तुम्हाला क्लिक करावे लागेल. 
  • त्यानंतर 'पब्लिक डेटा एन्ट्री' नावानं पेज ओपन होईल, त्यावरील  'Proceed to login' या पर्यायावर क्लिक करावे लागेल. 
  • तुम्हाला आधी तुमचं अकाऊंट सुरू करावे लागेल, त्यासाठी 'Create new user' यावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर  'New User Sign Up' नावाचं नवीन पेज ओपन होईल. 
agricultural-land-2.jpg
  • त्यावर तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव टाकावे लागेल. 
  • त्यानंतर लॉग-इन डिटेल्समध्ये Username टाकून check availability या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. 
  • त्यानंतर  Security Questions मध्ये प्रश्न निवडून त्याचे उत्तर द्यावे लागेल. 
  • मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पॅन कार्ड नंबर (Number, Email ID, PAN Card Number) आणि पिन कोड (pin code) टाकायचा आहे.
  • त्यानंतर 'Details' नावाचं एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल. 
  • इथं Registration, Marriage, e-filing, 7/12 mutations असे वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला दिसतील. 
  • यातल्या '7/12 mutations' वर क्लिक करून  तुम्हाला यूझरचा प्रकार निवडायचा आहे.
  • सामान्य नागरिक आहात तर 'User is Citizen' व बँकेचे कर्मचारी आहात तर 'User is Bank' यावर क्लिक करावे लागेल.
  • यूझरचा प्रकार निवडला की त्यानंतर 'Process ' या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर तुम्हाला 'फेरफार अर्ज प्रणाली- ई-हक्क' नावाचे पेज दिसेल. 
  • इथे तुम्हाला गावाची माहिती भरायची आहे. जिल्हा, तालुका आणि गावाची निवड करावी लागेल.
  • त्यानंतर तलाठ्याकडे ज्या फेरफार प्रकारासाठी अर्ज करायचा असेल, 
  • तो प्रकार निवडा असा मेसेज तुम्हाला दिसेल.
  • आता तुम्हाला  वारस नोंद करायची असल्यामुळे "वारस नोंद" हा पर्याय निवडा. 
agricultural-land-3.jpg
  • त्यानंतर वारस फेरफार अर्ज तुमच्यासमोर दिसेल.  
  • यात फॅमिली डिटेल्स आणि अर्जदाराचा ईमेल आणि मोबाईल नंबर टाकून.. 
  • 'पुढे जा' या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर तुम्हाला मेसेज येईल या मेसेजखालील 'ओके' बटनावर क्लिक करावे लागेल. 
  • त्यानंतर मृत व्यक्तीचे नाव किंवा खाते क्रमांक टाकावा लागेल. 
  • सातबाऱ्यावरील खाते क्रमांक इथे टाकणे अपेक्षित आहे.
  • पुढे 'खातेदार शोधा' या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. 
  • त्यानंतर मयताचे नाव निवडावे लागेल. 
  • एकदा नाव निवडून झाले की संबंधित खातेदाराच्या नावे असलेला गट क्रमांक निवडावा लागेल. 
  • नंतर मृत्यू दिनांक टाकावा लागेल. त्यानंतर 'समाविष्ट करा' या पर्यायावर क्लिक करावे लागेल. 
  • त्यानंतर खातेधारकाच्या जमिनीची सविस्तर माहिती तुम्हाला दिसेल. 
  • त्यानंतर अर्जदार हा वारसआहे का? असा प्रश्न विचारण्यात येईल. 
  • वारसांपैकी असल्यास होय, नसल्यास नाही या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर वारसांची नावे भरा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.
  • त्यात वारसांची नावे टाकावी लागेल. 
  • नंतर मोबाइल नंबर आणि पिनकोड टाकावा लागेल. 
  • त्यांनतर विचारलेल्या योग्य पर्यायावर क्लिक करून माहिती भरायची आहे. 
  • कागदपत्रे सुद्धा जोडावी लागणार आहे. 
  • संपूर्ण प्रोसेस पार केल्यानंतर Agree या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. 

वारस प्रमाणपत्र प्राप्तीसाठी आवश्यक कागदपत्रे (Documents required for obtaining heir certificate)

  • विहित नमुन्यातील कोर्ट फी स्टॅम्प लावलेले application आणि शपथपत्र
  • मृत्यू प्रमाणपत्र (Death certificate)
  • तलाठी अहवाल 
  • शासकीय नोकरीस असल्याचा त्याचे प्रूफ 
  • मृत व्यक्ती पेन्शनधारक असल्यास कोणत्या महिन्यापर्यंत शेवटचे पेन्शन घेतले त्या पानाची झेरॉक्स 
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • जन्म मृत्यू नोंद प्रमाणपत्र 
  • विहित नमुन्यातील वारसाचे नाव लिहिलेला असेल त्याचे प्रूफ 
  • वारस हक्क प्रमाणपत्र व नॉमिनी