Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Documents Required for Registration of Heirs on Agricultural Land: पहा, शेतजमीनवर वारस नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक

Agricultural Land on Heir Registration

Agricultural Land: ग्रामीण भागात शेतजमीनच्या मुळ मालकाच्या मृत्यूनंतर त्या जमिनीचे हक्क वारसदारांकडे जातात. थोडक्यात, मुळ मालकाने वारसदार म्हणून ज्या व्यक्तींच्या नावाची नोंद केली असेल, त्यांना वारसदार म्हणून जमिनीचा हक्क प्राप्त होतो. मात्र त्यांच्या वारसदारांना त्या जमीनवर वारसनोंदणी कशी करायची, यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती याची माहिती नसते, या सर्व प्रश्नांबाबत सविस्तर माहिती घेवुयात.

Agricultural Land: शेतजमीन असलेल्या मुळ मालकाचा मृत्यू झाल्यास, त्या जमिनीचे हक्क वारसदारांकडे जाते. मात्र हे हक्क मिळविण्यासाठी शेतजमिनीवर वारसांची नोंद कशी करावी, हे बऱ्याच जणांना माहिती नसते. म्हणूनच शेतजमिनीवर वारसांची नोंद कशी करावी, यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, याबाबत जाणून घेवुयात.  

अर्ज कसा करायचा (How to Apply)

महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने शेतकऱ्यांना घरबसल्या ऑनलाईन अर्ज करता यावा, यासाठी ई-हक्क प्रणाली विकसित केली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना सातबारावर बोजा चढवणे, कमी करणे, नाव दुरुस्त करणे, वारस नोंदी करणे, ई-करार करणे आदी सेवांसाठी अर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर त्यांना अर्जाचे स्टेट्सही देखील चेक करता येणार आहे.

वारस नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे (Documents Required for Heir Registration)

• विहित नमुन्यातील कोर्ट फी स्टम्प लावलेला अर्ज व शपथपत्र
• मृत्यू प्रमाणपत्र
तलाठी अहवाल / मंडल अहवाल
• शासकीय नोकरी असलेला पुरावा 
• मृत व्यक्ती पेन्शनधारक असल्यास, कोणत्या महिन्यापर्यंत त्यांना शेवटचे पेन्शन मिळाले आहेत, त्या पानाची प्रत
• रेशन कार्डची प्रत
• ग्रामपंचायत/नगरपालिका यांचा जन्म-मृत्यूचा नोंद वहीतील उतारा
• सेवा पुस्तिकेत विहित नमुन्यातील वारसाचे नाव लिहिलेला असल्याचा पुरावा
• वारस हक्क प्रमाणपत्र व नॉमिनी (वारस हक्क व नॉमिनी हे दोन्ही वेगळे असतात)
• बॅंक, विमा रक्कम आदींबाबत नॉमिनी म्हणजे मृत्यूनंतर संबंधित खातेदाराची रक्कम ज्या व्यक्तीकडे देण्यात यावी असे नमूद असते. जसे की, नॉमिनी म्हणून ज्या व्यक्तीचे नाव असते, त्यांनाच ती रक्कम मिळते.
• जर विमा पॉलिसीधारकाने आत्महत्या केली असेल, तर ती विमा क्‍लेम रक्कम ही नॉमिनी असलेल्या व्यक्तीस मिळत नाही.
• वारस हक्क प्रमाणपत्र हे व्यक्तीच्या व संबंधित व्यक्तीच्या संपत्तीवर वारस नोंद, वहिवाट आदी बाबींसाठी महत्त्वापूर्ण असते.