Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

EPF Account Number : पीएफ अकाउंट नंबर विसरलात? कसा शोधायचा? पाहा संपूर्ण प्रक्रिया

EPF Account Number : पीएफ अकाउंट नंबर विसरलात? कसा शोधायचा? पाहा संपूर्ण प्रक्रिया

EPF Account Number : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी या खात्याचा क्रमांक विसरल्यास काय करावं, हा अनेकांसमोरचा प्रश्न असतो. कारण नोकरदार वर्गाची बचत या खात्यामार्फत होत असते. दर महिन्याला पगारातून काही हिस्सा या खात्यात जमा केला जात असतो. त्यातून पैसे काढण्यासाठी खात्याचा क्रमांक गरजेचा असतो. तो विसरल्यास काय करावं, हे पाहुया...

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employees Provident Fund Organisation) हा नोकरदार कर्मचाऱ्यांच्या बचतीचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. देशातल्या संघटित क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांसाठी या माध्यमातून सामाजिक सुरक्षा योजना चालवली जाते. एखादा कर्मचारी खासगी कंपनीत काम करत असेल तर दर महिन्याला त्या कर्मचाऱ्याच्या पगारातून ईपीएफ (EPF) म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी पैसे कापले जातात. या योजनेनुसार प्रत्येक नोंदणीकृत कंपनीत कर्मचाऱ्याला एक ईपीएफ खातं मिळतं. या खात्यात आपला सेवानिवृत्ती निधी जमा होत राहतो. कधी त्यातून पैसे काढायचे असतील तर आपल्याला एक खातेक्रमांक दिला जातो. त्याचा वापर करून आपण पैसे काढू शकतो. मात्र आपण पीएफ खाते क्रमांक कधीतरी विसरतो किंवा नोकरी सोडल्यानंतर अथवा बदलल्यामुळे त्याचबरोबर इतर काही कारणांमुळे तो आपल्याकडून हरवला जातो. मात्र अशावेळी गोंधळून जाण्याची गरज नाही. आपला विसरलेला पीएफ क्रमांक शोधण्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. पॅन (Permanent account number) आणि यूएएनवरूनदेखील (Universal account number) पीएफचा क्रमांक शोधता येतो.

पीएफ नंबर मिळवण्याचे मार्ग 

  • ईपीएफओ कार्यालय - ईपीएफओच्या कार्यालयात जाऊन कर्मचारी आपला पीएफ क्रमांक शोधू शकतो. तुम्ही तुमचा यूएएन क्रमांकदेखील जाणून घेऊ शकता. याविषयी सविस्तर माहिती हवी असल्यास कार्यालयात संबंधित अधिकाऱ्याला तुमची वैयक्तिक माहिती द्यावी लागेल. त्यासोबतच ओळखपत्र आणि अर्ज सादर करणं बंधनकारक आहे.
  • तुमच्या नियोक्त्याकडे तपासा - ज्याठिकाणी तुम्ही काम करत असाल तिथल्या एचआर (HR) विभागात तुमची माहिती रुजू होण्यावेळी कागदपत्रांच्या माध्यमातून जमा केलेली असते. तिथे तुमचा पीएफचा क्रमांक किती ते काढू शकता.
  • पे स्लिपवर शोधा - काही कंपन्या (सरकारी, खासगी) कर्मचार्‍यांच्या सॅलरी स्लिपवर पीएफचा क्रमांकदेखील नमूद करतात. त्याठिकाणी तुम्ही तो पाहू शकता.
  • फोन नंबरवरून अपडेट मिळवा - तुम्ही जिथं नोकरी करता त्याठिकाणी ईपीएफओ ​तुमच्या मोबाइल क्रमांकावर प्रत्येक महिन्याला जी रक्कम कापते त्या पैशांच्या डिटेलसंदर्भात मेसेजच्या मार्फत अपडेट देत असते. त्यामुळे आपले मेसेच चेक करत राहायला हवं. तसंच यासंबंधीचा अलर्टही चालू असायला हवा.
  • यूएएन पोर्टलला व्हिझीट करा - तुम्हाला तुमचा यूएएन क्रमांक माहीत असेल तर ईपीएफओ ​​पोर्टलला भेट देऊनही तो तुम्ही शोधू शकता.

पॅन कार्डवरून कसा शोधावा?

  • तुमचं पॅन कार्ड पीएफच्या खात्याशी जोडलं असेल तर त्यावरूनही तुम्ही पीएफ नंबर शोधू शकता
  • पॅन कार्ड वापरून पीएफ नंबर शोधण्यासाठी, ईपीएफ पोर्टलला व्हिझीट करावी लागेल
  • https://www.epfindia.gov.in/site_en/index.php
  • पॅन डिटेल, नाव, डीओबी (जन्म), मोबाइल नंबर आणि कॅप्चा कोड टाकून एंटर करा.
  • 'ऑथोराइज्ड पिन'च्या बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर 'Agree'वर क्लिक करा आणि तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत ई-मेलवर मिळालेला ओटीपी टाकावा
  • शेवटी 'Validate OTP आणि UAN मिळवा'वर क्लिक करा.
  • तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर यूएएन मिळेल. या माध्यमातून तुम्ही ईपीएफओ पोर्टलवर लॉग इन करून तुमचा पीएफ क्रमांक माहीत करून घेऊ शकता.