Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

वाढत्या महागाईपासून गुंतवणुकीचं संरक्षण कसं करायचं?

how to protect investment from rising inflation

वाढत्या महागाईपासून आपल्या गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ आणि भविष्यातील उद्दिष्टांचं संरक्षण कसं करावं, याची चिंता साऱ्यांनाच आहे.

अमेरिकेत महागाईचा दर गेल्या चार दशकांच्या वर पोहोचला. परिणामी फेडरल रिझर्व्हला (federal reserve) मोठी व्याजदर वाढ करावी लागली. इकडे भारतातही व्याजदर (interest rate) वाढीचा घाव सुरूच आहे. देशातील महागाई गेल्या तीस वर्षांत वरच्या पातळीवर पोहोचली आहे. अशा स्थितीत आपल्या गुंतवणुकीचं नेमकं संरक्षण कसं करायला हवं? वाढत्या महागाईपासून आपल्या गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ आणि भविष्यातील उद्दिष्टांचं संरक्षण कसं करावं, याची चिंता साऱ्यांनाच आहे. महागाईला (inflation) मागे टाकणारा परतावा (return) हवा, असं आर्थिक नियोजनकाराकडून नेहमी सांगितलं जातं.

एरवीच्या करांपेक्षा महागाई हा प्रत्यक्ष आकारला जात नसला तरी आपल्या खिशावर विपरित परिणाम करणारा एकप्रकारचा करच आहे. वाढत्या चलनवाढीने अमेरिका, ब्रिटन तसंच भारत, श्रीलंका, पाकिस्तानसारख्या देशांच्या अर्थव्यवस्थेला वेठीस धरलं आहे. यामध्ये वस्तूंच्या वाढत्या किमती आणि अर्थव्यवस्थेतील उत्पन्नादी रूपातील पैसा कमी होत आहे.


उच्च चलनवाढीपासून गुंतवणूकदार हे त्यांच्या पोर्टफोलिओचं आणि निश्चित लक्ष्याचं संरक्षण कसं करू शकतात, यावर चर्चा करायला हवी. आपलं अपेक्षित ध्येय हे भविष्यातील खर्चासाठी एक निधी तयार करण्याचं असेल आणि असं ध्येय किमान 10 वर्षे दूर असेल तर योग्य रणनीती (strategy) आखायलाच हवी.

महागाईविरुद्ध हेज (hedge) हे स्थूलपणे नजीकच्या कालावधीतील घेत असलेल्या उपभोगाचं वाढत्या महागाईपासून संरक्षण करण्यावर लक्ष केंद्रित करतं. विशेषत: निवृत्तीनजीक असताना किंवा अल्प-मुदतीची उद्दिष्टं असतील तेव्हा ते लागू होतं. यामुळे पोर्टफोलिओ पुन्हा तयार करण्यासाठी किंवा उत्पन्न वाढविण्यासाठी थोडासा कालावधी मिळतो.

चलनवाढीच्या काळात उद्योगांसाठी साधारणपणे इनपुट किमती वाढतात. एखाद्या कंपनीकडे अशा किमती सहन करण्याची शक्ती असेल तर ती ग्राहकांना अधिक किंमत मोजते. कंपन्यांनी खर्चाचा सामना करण्यासाठी आणि उत्पादनक्षम होण्यासाठी नवनवीन प्रयोग केले तर त्यांचा नफा वाढतो.

वाढत्या महागाईच्या कालावधीत अन्नधान्य तसेच अन्य पदार्थ (commodities), ग्राहकोपयोगी वस्तू आणि ऊर्जा क्षेत्रातील काही व्यवसाय यांना मागणी असते. त्यामुळे अशा वस्तू वा सेवेची सक्षमता ही महागाईविरूद्ध सर्वोत्तम बचाव पर्याय आहेत. वैविध्यपूर्ण इक्विटी पोर्टफोलिओ व्यवस्थापक सहसा या संधींचा लाभ घेण्यासाठी स्टॉक होल्डिंग्समध्ये वेळोवेळी बदल करत असतात.

वाढत्या महागाईमुळे कमी परतावा मिळतो का?

सततच्या वाढत्या चलनवाढीचा शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम होतो. तसंच किमतीच्या वाढीमुळे काही व्यवसायांना अल्पावधीत फायदा होतो. तर दीर्घकाळात सततच्या महागाईचा ग्राहकांच्या मागणीवर परिणाम होतो आणि संबंधित व्यवसायाचा महसूल कमी होतो.

तथापि, जगभरातील समभागांनी मात्र दीर्घकालीन चलनवाढीचा दर ऐतिहासिकदृष्ट्या मागे टाकला आहे. बीएसई सेन्सेक्ससाठी दीर्घकालीन वार्षिक परतावा 6 ते 7 टक्के (दीर्घकालीन सरासरी किरकोळ महागाई - CPI च्या तुलनेत 12 ते 16 टक्के) आहे. इक्विटी अर्थात शेअरमधील गुंतवणूकदारांना 6 ते 9 टक्के रिटर्न देते.

गुंतवणूक वाढीच्या विविध पर्यायांचा शोध घ्या!

महागाईच्या काळात विशेषत: अधिक रोख रक्कम बाजूला काढून ठेवू नका. एकदा आपत्कालीन निधी तयार केल्यानंतर गुंतवणूक वाढीच्या उत्तम संधी पडताळून पाहा. अन्यथा क्रयशक्ती गमावण्याचा धोका असतो.

फ्लोटिंग-रेट फंड

अमेरिकेतप्रमाणे वाढत्या महागाई दरम्यान आकर्षक परतावा देण्यासाठी मूळतः रचना केलेले महागाई-अनुक्रमित रोखे (bond) भारतीय बाजारपेठेत उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यावरचा उत्तम मार्ग म्हणजे फ्लोटिंग-रेट बाँड फंड (Floating rate bond fund). महागाई आणि व्याजदर समान प्रवास करत असतात. महागाई हमीपेक्षा अधिक वाढते तेव्हा रिझर्व्ह बँक (RBI) मागणी नियंत्रित करण्यासाठी अल्पकालीन व्याजाचे दर वाढवते. बँक नियामकाने यापूर्वीच दोन वेळा रेपो दरात जवळपास एक टक्क्याची वाढ केली आहे. फ्लोटिंग रेट फंड हे कूपन दर बेंचमार्क व्याजदरांशी जोडलेले असतात अशा रोख्यांमध्ये गुंतवणूक करतात. महागाईचा दर जास्त असतो तेव्हा अल्पावधीत सकारात्मक कामगिरी करण्याचा त्यांचा कल असतो. त्यामुळे सेवानिवृत्ती निधीचा एक भाग आणि इतर अल्प-मुदतीच्या उद्दिष्टांसाठी बाजूला ठेवलेला निधी या निधीमध्ये ठेवता येऊ शकतो.

आंतरराष्ट्रीय निधी

देशांतर्गत अर्थव्यवस्थेतील वाढती चलनवाढ आंतरराष्ट्रीय समभाग गुंतवणूकदारांसाठी वरदान ठरू शकते. परकीय चलन गुंतवणूक अधिक रुपयांमध्ये रूपांतरित होणा-या किंवा डॉलर किंवा युरोच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे लाभ होणा-यांना त्याचा लाभ होऊ शकतो. केवळ चलन लवादासाठी गुंतवणूक करणं कदाचित परिपूर्ण ठरणार नाही. जसं की - एखाद्या देशातील व्यवसायाला नुकसान होत असेल तर परदेशी चलनाशी निगडीत आर्थिक उद्दिष्ट असल्यास (मुलाचे परदेशी शिक्षण) गुंतवणूक करत राहायला हवी.

गोल्ड आणि रिअल इस्टेट

सोन्याला महागाईविरूद्धचा सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय मानलं जातं. मात्र गेल्या काही वर्षांत मैल्यवान धातूचे दर अस्थिर आहेत. ते वाढत्या महागाईच्या विरोधात सामना करू शकत नाहीत. तर स्थावर मालमत्तेतील गुंतवणूकदारांना वाढत्या महागाई दरम्यान घर-दुकानाचे भाडे आणि मालमत्तेच्या मूल्यांचा लाभ होत असला तरी सततच्या वाढत्या चलनवाढीमुळे मालमत्तांच्या मागणीलाही धक्का बसतो. कोरोना साथ आणि लॅकडाऊन दरम्यान आपण हे अनुभवलं आहे.

कोणत्याही संपत्ती निर्मितीच्या धोरणासाठी महागाईच्या अपेक्षांवर वास्तववादी गृहीतके आवश्यक असतात. संपत्ती राखून ठेवण्यासाठी हे पोर्टफोलिओ (portfolio) रिटर्न्स अधिक वाढण्यासाठी सुलभ प्रवास म्हणून ते उपयोगी ठरतात.