Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Hobbies for Seniors: निवृत्तीनंतर छंद जोपासण्यासाठी बचत कशी करावी? जाणून घ्या

Hobbies for Seniors

Image Source : https://www.freepik.com/

ज्येष्ठ नागरिक निवृत्तीनंतरही तरूणपणी राहून गेलेल्या गोष्टी शिकू शकतात. मात्र, छंद जोपासण्यासाठी नोकरी करत असतानाच गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

वाढत्या वयाबरोबर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. निवृत्तीनंतर आर्थिक समस्येसोबतच आरोग्याच्या समस्या देखील उद्भवतात. त्यामुळे वृद्धांनी छंद सोपासायला हवे, असा सल्ला दिला जातो. स्वतःच्या आवडीचे काम करणे, समाज कार्यात स्वतःला गुंतवणे गरजेचे असते. यामुळे एकाकीपणा जाणवत नाही. 

मात्र, छंद जोपासण्यासाठी अथवा नवीन काहीतरी शिकण्यासाठी पैशांची गरज असते. त्यामुळे नोकरी करत असतानाच बचतीची सवय लावण्याची गरज आहे. तुम्ही निवृत्तीनंतरही राहून गेलेल्या गोष्टी शिकू शकता. या लेखातून निवृत्तीनंतर छंद जोपासण्यासाठी बचत कशी करावी व वयोवृद्धांसाठी कोणते छंद चांगले आहेत, याबाबत जाणून घेऊयात.

छंद जोपासण्यासाठी करा बचत

नियमित बचत तुम्ही नवीन काहीतरी शिकण्यासाठी अथवा छंद जोपासण्यासाठी नियमित बचत करायला हवी. याशिवाय, कमी वयातच आवडी-निवडी पूर्ण करण्यासाठी एक वेगळे बचत खाते उघडून त्यात पैसे जमा करायला हवे. ज्यामुळे निवृत्तीनंतर याचा वापर छंद पूर्ण करण्यासाठी याचा वापर होईल.
बजेट तयार कराबचतीसाठी बजेट तयार करणे गरजेचे आहे. तुमचे उत्पन्न व आर्थिक गरजा लक्षात घेऊन बजेट तयार करा. त्यानंतर दरमहिन्याला उर्वरित रक्कम बाजूला काढून ठेऊ शकता.
गुंतवणूक करानोकरी करत असलेल्या गुंतवणुकीचा फायदाच भविष्यात होणार आहे. त्यामुळे निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आधीपासून सोने, रिअल इस्टेट, स्टॉक्स, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायला हवी. निवृत्तीनंतर या गुंतवणुकीचा फायदा छंद जोपासण्यासाठी होईल.
पार्ट टाइम नोकरीनिवृत्तीनंतरही अनेकजण पार्ट टाईम नोकरीचा पर्याय निवडतात. यामागे आर्थिक स्थिती हे प्रमुख कारण असते. परंतु, पार्ट टाइम नोकरी करताना मिळणाऱ्या उत्पन्नातील काही रक्कम नवीन काहीतरी शिकण्यासाठी नक्कीच खर्च करू शकता.

वयोवृद्धांसाठी हे आहेत सर्वोत्तम छंद

सामाजिक कार्यात स्वतःला गुंतवा वयोवृद्ध व्यक्तींना एकटेपणाची समस्या जाणवते. अशावेळी ते स्वतःला सामाजिक कार्यात गुंतवू शकतात. समान विचारांच्या लोकांशी भेट झाल्याने ताणतणाव दूर होण्यास मदत होते. तसेच, सामाजिक कार्यामध्ये स्वतः जास्त गुंतवणूक करण्याची गरज नसते.
नवीन कला शिकातुम्ही निवृत्तीनंतर नवीन कला शिकण्यात वेळ घालवू शकता. चित्रकला, विणकाम, फोटोग्राफी, संगीत, लेखन अशा नवीन गोष्टी शिकू शकता. या कला तुम्ही स्मार्टफोनच्या मदतीने घरी देखील शिकू शकता.
प्रवास करातुम्हाला जर नोकरीच्या निमित्ताने प्रवास करायची संधी मिळाली नसल्यास, निवृत्तीनंतर ही आवड जोपासू शकता. तुम्ही कमी खर्चात देशांतर्गत प्रवास करू शकता. प्रवासाचा आनंद लुटताना मनमुराद जीवन जगता येईल. मात्र, इतर छंदाच्या तुलनेत प्रवास करताना जास्त पैसे खर्च करावे लागतील.
व्यायामज्येष्ठ नागरिक व्यायामाच्या मदतीने आरोग्याच्या समस्येपासून स्वतःचे रक्षण करू शकतात. याशिवाय, ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या ट्रेकिंग, बुक क्लबचे सदस्य बनू शकता. यामुळे नवीन लोकांशी देखील ओळखी होतील.