आयुष्यातील महत्त्वाची आर्थिक ध्येय पूर्ण करण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक करणे आवश्यक आहे. तसेच भविष्य सुरक्षित करण्यासाठी आर्थिक नियोजन करणे हे ही तितकेच आवश्यक आहे. येत्या काळात मुलांच्या शिक्षणाबरोबरच व स्वत:च्या सेवानिवृत्तीसाठी सर्व गोष्टींचा विचार करून त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यात आर्थिक समस्या उद्भवणार नाही. ते कसे करायचे, हे आपण समजून घेऊ.
भविष्यातील उद्दिष्टांच्या दिशेने गुंतवणूक सुरू करा
मुलाचे शिक्षण व सेवानिवृत्ती या दोन्ही गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात एका ठराविक कालावधीने येतात. मुलांचे शिक्षण आणि सेवानिवृत्ती यात किमान 10 ते 20 वर्षांचे अंतर असू शकते. जसे की, तुमचे वय 40 ते 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मुलांच्या उच्च-शिक्षणासाठी आर्थिक भांडवलाची गरज पडते. त्यानंतर वयाची 60 वर्षे पूर्ण झाली की निवृत्ती स्वीकारण्याचे वेध लागतात. अशावेळी निवृत्ती आणि मुलांच्या शिक्षणासाठी त्या कालावधीत योग्य गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
प्रत्येक ध्येयासाठी स्वतंत्र गुंतवणूक करणे गरजेचे
मुलांचे शिक्षण आणि सेवानिवृत्ती या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या असल्या तरी त्यासाठी लागणारी गुंतवणूक किंवा बचत ही बऱ्यापैकी समान असते. त्यामुळे मुलांचे शिक्षण अगोदर पहिले येते. त्यासाठी त्याचे नियोजन करून त्यामध्ये ठरवून गुंतवणूक केली पाहिजे. जसे की, पहिल्या उद्दिष्टासाठी मुलांच्या शिक्षणासाठी अधिक बचत करणे. त्यावेळी निवृत्तीचे नियोजन करण्यासाठी तुलनेने कमी गुंतवणूक करणे. पहिले उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या उद्दिष्टातील गुंतवणूक वाढवणे. अशाप्रकारे प्रत्येक ध्येयासाठी स्वतंत्र गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
ध्येय साध्य न करू शकल्यास काय करावे?
ठरवलेली आर्थिक उद्दिषट्ये पूर्ण होत नसतील किंवा त्यात अडथळे येत असतील तर त्यावर नव्याने नियोजन करून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे. शेअर मार्केटमधील चढ-उतारामुळे तुमच्या गुंतवणुकीवर कमी-अधिक परतावा मिळू शकतो. या गोष्टी तुम्हाला आर्थिक उद्दिष्टांपासून दूर नेऊ शकतात. उदरणार्थ, मुलांच्या शिक्षणाच्यावेळी ही परिस्थिती निर्माण झाल्यास तुम्ही शैक्षणिक कर्जाचा आधार घेऊ शकता. असे झाल्यास तुम्ही सहलीचे नियोजन, नवीन कार या गोष्टींची खरेदी स्थगित करून कर्जाची परतफेड करू शकता. तसेच सेवा निवृत्तीनंतरचे ध्येय गाठण्यास तुम्ही अपयशी ठरत असाल तर काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. जसे की, निवृत्तीच्या वयानंतरही तुम्हाला तुमचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उत्पन्न मिळवण्याचे इतर स्त्रोत निर्माण करावे लागतील. त्यानुसा बचत, गुंतवणूक आणि खर्चाचे नियोजन करावे लागेल.
Source: www.financialexpress.com