Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITR Filing : आता तुम्ही सुद्धा भरू शकता तुमचा ITR, या आहेत सोप्या पद्धती

ITR Filing

ITR Filing : प्रत्येक व्यक्तीने आपले कर्तव्य म्हणून दरवर्षी आपला कर अदा केला पाहिजे. यासाठी दरवर्षी विवरण पत्र सादर करणे आवश्यक असते. याचा फायदा आपल्याला सुद्धा आपली आर्थिक पत उंचावण्यासाठी होत असतो. हे विवरण पत्र सीए वा या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीशिवाय सुद्धा आपण भरू शकतो. यासाठी आयकर विभागाने ही प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे.

ITR Filing : प्रत्येक कमावणाऱ्या व्यक्तीने दरवर्षी आपले कर विविरण पत्र भरणे गरजेचे असते. आयकर विभागाच्या नियमानुसार जर आपण प्रत्येक वर्षी आपले कर विवरण पत्र सादर केले नाही तर तो गुन्हा ठरतो. जरी आपल्याला कोणताही कर लागत नसला तरी विवरण पत्र सादर करणे हे आपल्यासाठी सुद्धा सोयीचे असते. या विवरण पत्रानुसारच पुढे आपल्याला बँकाकडून कर्ज मिळणे सुलभ होते. यामुळे आपला क्रेडिट स्कोर सुद्धा चांगला होता. त्यामुळे विवरण पत्र सादर करण्याला प्राथमिकता देणे आवश्यक आहे.

हे विवरण पत्र भरण्यासाठी आता तुम्हाला सीए कडेच जायला हवं असं नाही. आता घरबसल्या ऑनलाईन सुविधेच्या माध्यमातून तुम्ही तुमचं कर विवरण पत्र भरू शकता. हे आपल्याला आयकर विभागाच्या https://www.incometax.gov.in/iec/foportal/  या संकेतस्थळावरच करता येते. आयकर विभागाने या प्रक्रियेमध्ये चांगले बदल केले असून ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे. तर पाहुयात विवरण पत्र कसं भरावं.

आवश्यक कागदपत्रांची जमवाजमव करणे

विवरण पत्रामध्ये आपल्याला आपला वार्षिक जमाखर्च दाखवायचा असतो. यासाठी फॉर्म 16, सॅलरी स्लीप, टीडीएस सर्टिफिकेट, एआयएस/ टीआयएस, बँकेचे वर्षभराचं स्टेटमेंट, गुंतवणूक केली असल्यास त्यासंदर्भातील कागदपत्रं आणि भाडेतत्वावर राहत असू तर त्याची बिलं आदि आवशक्य कागदपत्रे आपल्याकडे सादर करण्यासाठी तयार असावीत. त्यामुळे योग्य वेळी या सर्व आवश्यक कागदपत्रांची आपल्याकडे जमवाजमव करून ठेवायला हवी.

आपल्या मिळकतीची स्पष्टता असणे

आपण जरी पगारदार व्यक्ती असलो तरी फक्त पगार हाच आपला एकमेव मिळकतीचा मार्ग आहे की अन्य कोणत्या मार्गाने सुद्धा आपल्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात याची स्पष्टता आपल्याला असायला हवी. जर आपण भाडे घेत असू,  आपल्या गुंतवणूकीवर मिळणारे व्याज किंवा आपण पार्ट टाइम सुद्धा काही काम करत असू व त्याचे पैसे आपल्याला बँक खात्यात थेट मिळत असतील तर हे सर्व आपल्याला आयकर विभागाला दाखवावे लागते. मुळात या आपल्या मिळकतीच्या स्त्रोतानुसारच आपण कोणता फॉर्म भरला पाहिजे हे ठरते. जर आपण चूकीचा फॉर्म भरला तर आयकर विभागाकडून तो नाकारला जातो. त्यामुळे आपल्याला आपल्या मिळकतीच्या स्त्रोताविषयी स्पष्टता असायला हवी. व त्यासंदर्भात पूरावे सुद्धा असले पाहिजेत.

अचूक फॉर्मची निवड करणे

आयकर विभागाकडून विविध प्रकारच्या उत्पन्नांसाठी व वर्गासाठी विविध प्रकारचे फॉर्म असतात. सर्वच करदाते एकच फॉर्म भरून आपला कर भरू शकत नाहीत. त्यामुळए आपला मिळकतीचा स्त्रोत काय आहे, आपल्या कामाचे स्वरूप काय या सर्व गोष्टीचा विचार करून योग्य तो फॉर्म निवडायचा असतो.

करपात्र रक्कम तपासणे

केंद्र सरकार कडून दोन प्रकारची करप्रणाली सादर करण्यात आली आहे. करदात्याला आता हवी ती सोयीची करप्रणाली निवडण्याचा पर्याय सरकारकडून देण्यात आला आहे. तेव्हा आपली मिळकत किती आहे, त्यावर आपल्याला कर बसू शकतो का, कर परताव्यासाठी काय काय मार्ग आहेत, आपण केलेली गुंतवणूक कर सूट साठी पात्र आहे का या सर्व बाबी तपासून आपण करप्रणाली ठरवून आपलं विवरण पत्र सादर करू शकतो.

कर सूटसाठी दावा करणे

विवरण पत्र भरल्यावर आपण कर भरण्यासाठी पात्र असू तर अशा वेळी 80 सी व 80 डी अंतर्गत आपण ज्या ज्या ठिकाणी गुंतवणूक केली आहे वा काही कर्ज असेल तर त्यासंबंधित माहिती देऊन कर सूट साठी दावा करणे आवश्यक आहे.

या सर्व प्रक्रियेनंतर विहित वेळेत आपण सादर केलेले विवरण पत्र पुन्हा एकदा तपासून दिलेली सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करावी. जर काही माहिती द्यायची राहून गेली असेल तर त्यामध्ये दुरूस्ती करण्याचा पर्याय सुद्धा आयकर विभागाकडून दिलेला असतो. तेव्हा निश्चित होऊन एकदा तरी स्वत:हून विवरण पत्र भरण्याचा प्रयत्न करून ही प्रक्रिया समजून घेऊन नवीन अनुभव घेऊ शकतो.