Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

जीएसटी रिटर्न कसे भरायचे? त्याचे प्रकार, तारखा आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

जीएसटी रिटर्न कसे भरायचे? त्याचे प्रकार, तारखा आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Image Source : www.ebizfiling.com

करदात्यांचे अनेक प्रकार आहेत. ज्यात सामान्य करदात्यापासून ई-कॉमर्स ऑपरेटर, करपात्र व्यक्ती, अनिवासी करदाता अशा सर्वांना विविध प्रकारचे जीएसटी रिटर्न भरणे आवश्यक आहे. त्याबद्द्ल आपण अधिक माहिती समजून घेणार आहोत.

जीएसटी (Goods & Services Tax) अंतर्गत नोंदणीकृत व्यवसायिकांना सरकारच्या जीएसटी पोर्टलद्वारे व्यवसायाच्या प्रकारानुसार मासिक, त्रैमासिक आणि वार्षिक रिटर्न भरावे लागते. त्यांनी या कालावधीत खरेदी व विक्री केलेल्या वस्तुंचा टॅक्ससह तपशील द्यावा लागतो.

भारतात जीएसटी सारख्या सर्वसमावेशक आणि एकत्रित कर प्रणाली लागू झाल्यामुळे नोंदणी, रिटर्न आणि मान्यता या सेवा पारदर्शक झाल्या आहेत. वैयक्तिक करदाते त्यांचे जीएसटी रिटर्न भरण्यासाठी पुरवठा रिटर्न, खरेदी रिटर्न, मासिक रिटर्न आणि वार्षिक रिटर्न असे 4 प्रकारचे फॉर्म वापरू शकतात. त्यात ज्या लहान व्यावसायिकांना कंपोझिशन स्कीमची (composition scheme) निवड केली आहे; त्यांना 3 महिन्यांनी रिटर्न भरावे लागते. सर्व प्रकारचे रिटर्न ऑनलाईन भरले जातात.

जीएसटी रिटर्न म्हणजे काय?

जीएसटी रिटर्न ही एक अशी सरकारी प्रणाली आहे, जिथे सर्व खरेदी, विक्री आणि खरेदी-विक्रीवर भरलेला टॅक्स जमा होतो. जीएसटी रिटर्न भरणे आवश्यक आहे.

जीएसटी रिटर्न कोणी भरावे?

ज्या व्यावसायिकांनी जीएसटी अंतर्गत नोंदणी केली आहे, अशा सर्व व्यावसायिक संस्थांना जीएसटी रिटर्न भरावा लागतो. रिटर्न फायलिंगची प्रक्रिया प्रत्येक व्यवसायाच्या स्वरूपानुसार बदलते. जे नोंदणीकृत डीलर विक्री (sales), खरेदी (purchase), आऊटपुट वस्तू आणि सेवा कर (विक्रीवर) (Output Goods and services tax (on Sales)), खरेदीवर GST सह इनपुट टॅक्स क्रेडिट (Input Tax Credit with GST paid on the purchase) या घटकांचा भाग आहेत त्यांनी जीएसटी रिटर्न भरणे आवश्यक आहे.

जीएसटी रिटर्न ऑनलाईन कसे भरायचे?

उत्पादक आणि पुरवठादारांपासून डीलर्स ते ग्राहक असे सर्व करदात्यांना दरवर्षी जीएसटी विभागाकडे कर विवरणपत्र (Tax Return) भरावे लागते. नवीन जीएसटी प्रणाली अंतर्गत, टॅक्स रिटर्न भरणे स्वयंचलित झाले आहे. वस्तू/माल आणि सेवा कर नेटवर्कद्वारे (GSTN) किंवा अॅप्सचा वापर करून जीएसटी रिटर्न ऑनलाईन भरता येऊ शकते. जीएसटी रिटर्न ऑनलाईन भरण्याचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत.

  • जीएसटी पोर्टलला www.gst.gov.in भेट द्या.
  • राज्याचा कोड क्रमांक आणि तुमचा पॅन क्रमांक यावर आधारित 15 अंकांचा जीएसटी क्रमांक तुम्हाला दिला जातो.
  • जीएसटी पोर्टल किंवा सॉफ्टवेअरवर बिलं अपलोड करा. प्रत्येक बिलासाठी एक बिल क्रमांक तयार होईल.
  • बिलं अपलोड केल्यानंतर, जावक रिटर्न, इनवर्ड रिटर्न आणि एकत्रित महिन्याचे रिटर्न ऑनलाईन भरावे लागते. माहिती भरताना काही चुका झाल्यास तुम्ही त्या दुरुस्त करून पुन्हा भरू शकता.
  • प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला किंवा त्यापूर्वी जीएसटी कॉमन पोर्टल (GSTN) वर GSTR-1 या फॉर्ममध्ये जावक पुरवठ्याचे रिटर्न फाईल करा.
  • पुरवठादाराने दिलेल्या पुरवठ्याचे तपशील GSTR-2A मध्ये प्राप्तकर्त्याला उपलब्ध करून दिले जातात.
  • प्राप्तकर्त्याला जावक पुरवठ्याचे तपशील सत्यापित करणे (verify), प्रमाणित करणे (validate) आणि सुधारित (modify) करणे तसेच क्रेडिट किंवा डेबिट नोट्सचे तपशील फाईल करावे लागतात.
  • प्राप्तकर्त्याला GSTR-2 फॉर्ममध्ये करपात्र वस्तू आणि सेवांच्या आवक पुरवठ्याचे तपशील द्यावे लागतात.
  • त्यानंतर पुरवठादार GSTR-1A मध्ये प्राप्तकर्त्याने दिलेल्या आवक पुरवठ्याच्या तपशिलांमधील बदल स्वीकारू शकतो किंवा नाकारू शकतो.

नवीन जीएसटी कायद्यांतर्गत जीएसटी रिटर्नचे प्रकार

भारतातील सर्व प्रकारच्या जीएसटी रिटर्नची फ्रिक्वेन्सी (frequency) आणि रिटर्न भरण्याची अंतिम तारीख.

रिटर्न फॉर्मविवरणपत्र कोणी भरावे आणि काय दाखल करावे?फ्रिक्वेन्सी (Fequency)दाखल करण्याची अंतिम तारीख
GSTR-1नोंदणीकृत करपात्र पुरवठादाराने करपात्र वस्तू आणि सेवांच्या बाह्य पुरवठ्याचे तपशील दाखल केले पाहिजेत.मासिकपुढील महिन्याची 11 तारीख
GSTR-2नोंदणीकृत करपात्र प्राप्तकर्त्याने इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करणार्‍या करपात्र वस्तू आणि सेवांच्या आवक पुरवठ्याचे तपशील दाखल करावेत.मासिकपुढील महिन्याची 15 तारीख
GSTR-3नोंदणीकृत करपात्र व्यक्तीने जावक पुरवठा आणि आवक पुरवठा तसेच कराच्या रकमेच्या देयकाच्या तपशिलांच्या अंतिमीकरणाच्या आधारे मासिक विवरणपत्र भरावे.मासिकपुढील महिन्याची 20 तारीख
GSTR-4रचना पुरवठादाराने त्रैमासिक विवरणपत्र भरावे.त्रैमासिकतिमाही संपल्यानंतरची 18 तारीख
GSTR-5अनिवासी करपात्र व्यक्तीसाठी परतावा.मासिकपुढील महिन्याची 20 तारीख
GSTR-6इनपुट सेवा वितरकासाठीमासिकपुढील महिन्याची 13 तारीख
GSTR-7स्त्रोतावर कर कपात करणार्‍या अधिकाऱ्यांसाठी परतावा.मासिकपुढील महिन्याची 10 तारीख
GSTR-8ई-कॉमर्स ऑपरेटर किंवा कर संग्राहकाने प्रभावित झालेल्या पुरवठा आणि जमा केलेल्या कराच्या रकमेचा तपशील दाखल करावा.मासिकपुढील महिन्याची 10 तारीख
GSTR-9नोंदणीकृत करपात्र व्यक्तीने वार्षिक विवरणपत्र भरावे.वार्षिकपुढच्या वर्षातील 31 डिसेंबर
GSTR-10ज्या करपात्र व्यक्तीची नोंदणी रद्द झाली आहे किंवा समर्पण केले आहे त्यांनी अंतिम विवरणपत्र भरावे.एकदा, जीएसटीची नोंदणी रद्द झाल्यानंतररद्द केल्‍याच्‍या तारखेच्‍या 3 महिन्‍याच्‍या आत 
GSTR-11परताव्याचा दावा करणारी UIN असणार्‍या व्यक्तीने आवक पुरवठ्याचे तपशील दाखल करावेत.मासिकज्या महिन्यासाठी स्टेटमेंट दाखल केले होते त्या महिन्याच्या 28 तारखेला