सध्याचा काळ इतका अनिश्चित झाला आहे की, कोणावर कोणते संकट येईल. हे सांगू शकत नाही. पण या संकटाला आपण मात्र तोंड देण्याची तयारी ठेवली पाहिजे. त्यामुळेच आपल्या घरातील वडिलधारी मंडळी गाठीला चार पैसे जोडून ठेवावेत असे सतत सांगत असतात. फक्त त्याला Emergency Fund म्हणतात हे त्यांना ठाऊक नसेल. पण साठवलेल्या पैशांचा कशाप्रकारे उपयोग होऊ शकतो. हे त्यांना नेमके माहित असते.
अनेक जण आर्थिक नियोजन करताना सर्व खर्चांची तरतूद कशी करता येईल, यावर भर देतात. जसे की, घर घेण्यासाठी नियोजन करतात. मुलांच्या शिक्षणासाठी प्लॅनिंग करतात. अगदी कुठे सहलीला जायचे असेल तरीही त्याचे काटेकोरपणे नियोजन केले जाते. पण एखादे अचानक संकट आले की, जमा केलेली पुंजी त्या संकटावर मात करण्यासाठी वापरली जाते. पण तज्ज्ञांच्या मते इथेच तुमचे नियोजन फसते. कारण अशाप्रकारे मध्येच एखादी गुंतवणूक तोडली तर त्याचे फायदे आपल्याला मिळत नाही. त्यामुळे आपत्कालीन संकटासाठी वेगळा फंड निर्माण करून त्याचा वापर केला पाहिजे. चला तर माग जाणून घेऊयात Emergency Fund कसा तयार करायचा.
Emergency Fund म्हणजे काय?
आपत्कालीन निधी म्हणजे कोणत्याही संकटाच्या काळात तुमचा 3 ते 6 महिन्यांचा खर्च ज्याच्याद्वारे भागवला जातो, त्याला आपत्कालीन निधी म्हणतात. काही खर्च आपण ठरवूनही टाळू शकत नाही. अशा वेळी आपला नेहमीचा आर्थिक स्त्रोत बंद झाल्यावर आपण जो साठवून ठेवलेला निधी वापरतो, त्याला आपत्कालीन निधी (Emergency Fund) म्हटले जाते.
गुंतवणूक सल्लागारांच्या मते, लाईफ इन्शुरन्स आणि मेडिक्लेम असला तरी एक असा रिझर्व्ह फंड असला पाहिजे. ज्यातून तुम्ही रोख रक्कम काढू शकता आणि जेव्हा यातील पैशांचा वापर होणार नाही. तेव्हा त्यातून चांगला परतावा देखील मिळाला पाहिजे.
इमर्जन्सी फंडसाठी म्युच्युअल फंडची कशी मदत होऊ शकते?
इनर्जन्सी फंड तयार करण्यासाठी आपल्याला असा गुंतवणुकीचा पर्याय निवडावा लागेल. ज्यामध्ये जोखीम नसेल. कारण आपण हा फंड आपल्यावरील आर्थिक जोखीम कमी करण्यासाठीच तयार करत आहोत. त्यामुळे या निधीवर कोणतीही जोखीम नसावी. यासाठी तुम्ही बचत खात्यात पैसे ठेवू शकता किंवा दीर्घकालीन मुदत ठेवींमध्ये पैसे गुंतवू शकता. पण हा पर्याय पण तितकासा योग्य वाटत नाही. कारण या गुंतवणुकीतून तुमचा निधी सुरक्षित राहील. पण त्यातून चांगला परतावा मिळेल याची शाश्चती नाही.
मुदत ठेवी मुदतीपूर्वी मोडली तर त्यातून अपेक्षित परतावा मिळणार नाही. त्यामुळे जर इमर्जन्सीसाठी राखून ठेवलेला निधी हा जर लिक्विड फंड, अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड, लो ड्युरेशन फंड किंवा शॉर्ट ड्युरेशन फंडमध्ये गुंतवू शकता. हे फंड सुरक्षित फंड मानले जातात. तसेच यातून लगेच पैसेसुद्धा काढता येतात आणि या फंडमधून मिळणारे रिटर्न हे मुदत ठेवी किंवा बचत खात्यावर मिळणाऱ्या रिटर्नस् पेक्षा जास्त असतात. तर म्युच्युअल फंडमधील अशा फंडमध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचा Emergency Fund तयार करू शकता.