Tax Benefit On HRA: बहुतेक लोकांच्या वेतन स्लिपमध्ये घरभाडे भत्ता (HRA) समाविष्ट केला जातो. यावर इन्कम टॅक्स मध्ये कपातीची सुविधा उपलब्ध आहे. तसेच,इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याच्या वेळी HRA (House Rent Allowance)शी संबंधित काही कर सूट दिली आहे, ज्यामुळे करदात्यांना कर सूट मिळते. त्यामुळे आयटीआर फाइलिंगमध्ये एचआरएचा दावा करताना काळजी घेणे आवश्यक आहे. तो दावा करताना तुम्ही कोणती काळजी घ्यावी याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
दावा कसा कराल?
- जर तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये भाडे करार किंवा भाड्याच्या पावत्या सबमिट केल्या असतील, तर अशावेळी तुम्हाला प्राप्त झालेला HRA कर-सवलत भाग Form-16 मध्ये पाहता येईल. तुमच्या कंपनीमध्ये भाडे करार किंवा भाड्याच्या पावत्या सबमिट करताना, तुमचे वार्षिक भाडे 1 लाख रुपयांपेक्षा जास्त होत असल्यास, तुम्हाला तुमच्या घरमालकाचा पॅन देखील सबमिट करणे आवश्यक आहे.
- जर तुम्ही ई-फायलिंग वेबसाइटवर आयटीआर-1 वापरून तुमचे कर रिटर्न भरत असाल,तर करातून सूट दिलेली एचआरएची रक्कम आधीच भरली जाण्याची शक्यता आहे. Form-16 च्या भाग-बी मध्ये नमूद केल्याप्रमाणे, व्यक्तींनी उपलब्ध कागदपत्रांसह पूर्व-भरलेल्या माहितीची पडताळणी करावी असा सल्ला दिला जातो.
- समजा, HRA हा तुमच्या सध्याच्या पगाराच्या पॅकेजचा भाग नाही आहे. तरीही तुम्ही प्रत्येक महिन्यात भरत असलेल्या घरभाड्यावर आयकर कपातीसाठी पात्र आहात.
- तुमच्या पगाराच्या पॅकेजमध्ये HRA (घर भाडे भत्ता) समाविष्ट नसला तरीही, तुम्ही प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80GG अंतर्गत प्रत्येक महिन्यात भरत असलेल्या घरभाड्यावर कर कपातीचा (Tax Deduction Claim) दावा करण्यास पात्र आहात. जर HRA तुमच्या पगाराच्या पॅकेजचा भाग असेल, तर तुम्ही कलम 10 (13A) अंतर्गत देत असलेल्या भाड्यावर कर लाभाचा दावा करू शकता.
पुरावे सुरक्षित ठेवा
इन्कम टॅक्स रिटर्न भरताना तुम्हाला कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही. परंतु, तुम्ही भाड्याची पावती आणि भाडे करार तुमच्याकडे सुरक्षित ठेवला पाहिजे. जर तुमचे भाडे दरमहा 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर घरमालकाला भाडे देण्यापूर्वी तुम्हाला कर कापावा लागेल. तसेच, दर महिन्याला ही कपात करण्यापेक्षा तुम्ही ती थेट मार्चमध्ये एकाच वेळी करू शकता.
स्वयंरोजगार करणाऱ्यास कराचे लाभ
जर तुम्ही स्वयंरोजगार (Self Employed) सांभाळत असाल किंवा HRA तुमच्या वेतन रचनेचा भाग नसेल, तर तुम्हाला कलम 10(13A) अंतर्गत HRA सूट मिळणार नाही. परंतु, तुम्हाला कलम 80GG अंतर्गत दिलासा मिळेल. तुम्ही तुमच्या एकूण उत्पन्नाच्या 25% वजावटीचा दावा करू शकता किंवा एकूण उत्पन्नाच्या वजा 10% भरलेल्या वास्तविक भाड्यावर, दरमहा 5,000 रुपये पर्यंत सूट मिळेल. यात जे कमी असेल ते लागू होईल.