Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

How to Choose Right Insurance: टर्म प्लॅन कसा निवडावा? त्याचे महत्त्वाचे घटक कोणते, जाणून घ्या!

Term Insurance Plan

Financial Literacy: आर्थिक संरक्षण देण्याचे काम मुदत विमा म्हणजेच टर्म इन्शुरन्स प्लॅन करतो. पण इन्शुरन्स मार्केटमध्ये तर असंख्य टर्म प्लॅन्स आहेत. पण मग त्यामधील आपल्यासाठी suitable, सुयोग्य आणि आपल्याला अपेक्षित असणारे आयुष्याविषयीचे प्लॅन्स fulfill करणारा प्लॅन कसा निवडायचा! त्याचे काही निकष आपण (Parameters) समजून घेणार आहोत.

Financial Literacy: "Life is what happens to you when you are busy making other plans" अर्थात आयुष्याविषयीचे आपण केलेले सर्वच प्लॅन्स नेहमीच आपल्याला हवे तसेच आकार घेतील, याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. पण म्हणून आपण प्लॅन्स करायचे थांबवत नाही. जास्तीत जास्त शक्यता-अशक्यतांचा विचार करून आपण आपले प्लॅन्स ठरवत असतो. या सर्व प्लॅन्सना थोड्या प्रमाणात का होईना, आर्थिक संरक्षण देण्याचे काम मुदत विमा योजना अर्थात टर्म इन्शुरन्स प्लॅन (Term Insurance Plan) करतो. पण इन्शुरन्स मार्केटमध्ये तर असंख्य टर्म प्लॅन्स आहेत. पण मग त्यामधील आपल्यासाठी suitable, सुयोग्य आणि आपल्याला अपेक्षित असणारे आयुष्याविषयीचे प्लॅन्स fulfill करणारा प्लॅन कसा निवडायचा ! यासाठी आपण यासंबंधीचे काही निकष विचारात घेणार आहोत. (Good Financial Behavior to Choose the Right Insurance Product)

इन्शुरन्स कंपनीचा “क्लेम सेटलमेंट रेशो”

इन्शुरन्स कंपनी एका आर्थिक वर्षामध्ये तिच्याकडे आलेल्या एकूण क्लेम्सच्या तुलनेमध्ये किती क्लेम्स मान्य करून सेटल करते, याचे गुणोत्तर (टक्केवारीचे प्रमाण) म्हणजे “त्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो”. जेव्हा आपण ऐकतो, की एखाद्या इन्शुरन्स कंपनीचा “क्लेम सेटलमेंट रेशो” 95 % इतका आहे, त्याचा अर्थ, त्या कंपनीने तिच्याकडे त्या आर्थिक वर्षांमध्ये आलेल्या एकूण क्लेम्सपैकी 95 % क्लेम्स (दावे) सेटल केलेले आहेत.

“उच्च क्लेम सेटलमेंट रेशो” हा कंपनीच्या आर्थिक सुरक्षितता देण्याचे त्यांचे वचन पाळण्याचा हेतू आणि इन्शुरन्स कंपनीची क्षमता उत्तम असल्याचे लक्षण मानले जाते. LIC, HDFC Life, TATA AIA, ICICI सारखे इन्सुरर्स “क्लेम सेटलमेंट रेशो” उच्च राहील, याची नेहमी काळजी घेत असतात. तो कंपनीच्या इमेजसाठी महत्वाचा पॅरामीटर मानला जातो.

सॉल्व्हेंसी रेशो (Solvency Ratio) 

कोणत्याही इन्शुरन्स कंपनीचा “सॉल्व्हेंसी रेशो” त्या कंपनीची आर्थिक स्थिती, थोडक्यात विम्याचे पैसे देण्याची वेळ आल्यास त्या ती कंपनी पैसे देण्यास किती सक्षम आहे, हे दर्शवितो.अलीकडेच CoviD कालावधीमध्ये, बहुतेक लाईफ इन्शुरन्स कंपन्यांकडे अल्प कालावधीत मोठ्या संख्येने क्लेम्स प्राप्त झाले होते. अचानक आलेल्या क्लेम्सची सेटलमेंट करण्यासाठी, इन्शुररचा “सॉल्व्हेंसी रेशो” उत्तम असणे, केव्हाही  महत्त्वाचे ठरते.  आपल्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षा आपण ज्या इन्शुरन्स कंपनीच्या हातात सोपवली आहे, त्या कंपनीची आर्थिक स्थिरता देखील तेवढीच मजबूत असणे आवश्यक आहे.

व्यापक रिस्क-एलेमेंट्स कव्हर करणारे रायडर्स 

लाईफ कव्हर घेत असताना केवळ “मृत्यू” ह्याच गोष्टीचा विचार न करता, अपघात, गंभीर आजार अथवा गुंतागुंतीची शत्रक्रियेसारख्या घटनांमुळे आपल्या आर्थिक स्थितीवर, आपल्या उत्पन्नाच्या स्रोतांवर होणाऱ्या परिणामांचा देखील विचार करणे, आवश्यक आहे. आपल्याला कधी कोणतीही समस्याच येणार नाही, अशा समजुतीमध्ये (खरे तर गैर-समजुतीमध्ये !!!) न राहता अचानक उद्दभवलेल्या समस्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई करणारे किंवा आपला उत्पन्नाचा स्रोत थांबलाच तर आपले भविष्यातील प्रीमियमस् माफ करणारे रायडर्स देखील टर्म इन्शुरन्स पॉलिसीसोबत “ॲड-ऑन” करणे, सयुक्तिक ठरते. शिवाय, गंभीर आजार संरक्षणासाठी भरलेले प्रीमियम देखील प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80D अंतर्गत कर-कपातीसाठी पात्र असणार आहेच.

प्रीमियम किंमत (Premium Amount)

बरेचदा आपण “प्रिमिअम किती भरावा लागेल ?” हा विचार पॉलिसी घेत असताना प्राधान्यक्रमामध्ये (preference) सर्वांत वरती ठेवतो. मात्र आपल्या कुटुंबासाठी आपण घेत असलेल्या इतक्या महत्वाच्या आणि बहुतेक “once in a life” निर्णयाच्या वेळी केवळ किंमतीमुळे तडजोड करणार नाही, याची निश्चिती केलेली बरी. आणि तसे देखील, टर्म इन्शुरन्स प्रीमियम भारतीय प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर वजावटीसाठी (Tax Deduction) पात्र आहेत. आणि जर खर्च हा चिंतेचा विषय असेल, तर आपण मासिक (monthly) पेमेंट मोड देखील निवडू शकतो. जेणेकरून आपल्या व्हॉलिट वर एकदम भार येणार नाही.

आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आयुष्याच्या खालोखाल सर्वात मौल्यवान गोष्ट, त्यांची “सन्मानजनक आर्थिक सुरक्षितता” खरेदी करीत असताना, वरील पॅरामीटर्ससोबत कोणतीही तडजोड न करता “सर्वोत्तम टर्म इन्शुरन्स”ची निवड केलेली उत्तम.