Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Term Life Insurance: एक वर्षाचा टर्म इन्शुरन्स प्लॅन काय असतो? जाणून घ्या प्लॅनची वैशिष्ट्ये

Term Life Insurance

Term Life Insurance: एक वर्षाचा टर्म इन्शुरन्स प्लॅन PhonePe या भारतामधील लोकप्रिय डिजिटल प्लॅटफॉर्मकडून दिला जाणारा आणि सर्वांत कमी कालावधीचा टर्म इन्शुरन्स (मुदत विमा) प्रकारचा प्लॅन आहे. हा प्लॅनचा प्रीमिअम 149 रुपये प्रतिवर्षापासून सुरु होतो.

‘Big Things Come in Small Packages’, असे म्हटले जाते. अगदी छोट्याशा गोष्टींमध्ये देखील खूप फायद्याच्या गोष्टींची बीजे लपलेली असतात, असाच काहीसा प्रकार आपल्याला 1-Year टर्म इन्शुरन्स प्लॅनबाबत दिसून येतो. अगदी नॅनो-इन्शुरन्स म्हणता येण्यासारखा हा टर्म प्लॅन पॉलिसीधारकांना 1 वर्षाच्या पॉलिसी-टर्मसाठी लाईफ इन्शुरन्स कव्हर देतो आणि ते ही अगदी किफायतशीर प्रिमिअममध्ये. 

हा टर्म इन्शुरन्स प्लॅन PhonePe या भारतामधील लोकप्रिय डिजिटल प्लॅटफॉर्मकडून दिला जाणारा आणि सर्वांत कमी कालावधीचा टर्म इन्शुरन्स (मुदत विमा) प्रकारचा प्लॅन आहे. स्वतः PhonePe ही कंपनी भारतीय विमा नियमन आणि विकास प्राधिकरणाकडे (IRDAI) रजिस्टर्ड इन्शुरन्स कंपनी नसल्याने तिने ICICI प्रुडेन्शिअल या खाजगी क्षेत्रातील अग्रगण्य इन्शुरन्स कंपनीसोबत पार्टनरशिप करार केलेला आहे. आणि त्याच माध्यमातून PhonePe ही कंपनी हा टर्म इन्शुरन्स  “केवळ स्वतःच्या ग्राहकांसाठी” देते. अगदी 149 रुपये प्रतिवर्ष इतक्या अल्प दरापासून या प्लॅनचा प्रिमिअम सुरु होतो. 

1 वर्षाचा टर्म इन्शुरन्स प्लॅन कोणासाठी?

1 वर्षाच्या पॉलिसी टर्ममध्ये पॉलिसीधारकाचे दुर्दैवी निधन झाल्यास नॉमिनीला डेथ-क्लेम म्हणून एकरकमी (Lump Sum) पॉलिसीची रक्कम मिळते. असा एक वर्ग जो पॉलिसी-इच्छुक आहे आणि ज्याला दीर्घकालीन मुदतीसाठी प्रीमियम भरण्याच्या वचनबद्धतेपेक्षा लवचिक आणि परवडणारी (Flexible & Affordable) इन्शुरन्स पॉलिसी घेण्याची इच्छा आहे; त्या वर्गाला लक्ष्य ठेवून हा 1 वर्षाचा टर्म इन्शुरन्स प्लॅन (Term Insurance Plan) डिझाईन केला गेला.

रेग्युलर टर्म लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचा पर्याय उपलब्ध

रेग्युलर टर्म इन्शुरन्स सोबत तुलना करायची झाल्यास, मुख्य फरक हा की, 1 वर्ष टर्म लाईफ इन्शुरन्स प्लॅन (1 Year Term Life Insurance Plan) फक्त एक वर्षासाठी लाईफ कव्हर पुरवितो. पॉलिसीधारक पॉलिसीच्या टर्मच्या अखेरीस पॉलिसीचे नुतनीकरण (Renewal) करण्यासाठीचा निर्णय घेऊ शकतो. ज्यामध्ये पॉलिसी सक्रिय ठेवण्यासाठी पॉलिसीचे वार्षिक नूतनीकरण करणे, अनिवार्य आहे. दुसरीकडे, रेग्युलर टर्म लाईफ इन्शुरन्स पॉलिसी (Regular Term Life Insurance Policy) अगदी 10 वर्षांपासून 40 वर्षापर्यंत दीर्घकालीन लाईफ कव्हरेज मिळतो. 

1 Year टर्म इन्शुरन्स प्लॅनची काही प्रमुख वैशिष्ट्ये

  • इन्शुरन्स पॉलिसीसाठीचा प्रीमियम प्रतिवर्ष 149 रुपयांपासून सुरु  
  • पॉलिसीधारक PhonePe चे ग्राहक असल्याने रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जलद, झटपट आणि पेपरलेस होते.
  • 18 ते 50 वयोगटातील PhonePe वापरकर्त्यांसाठी हा प्लॅन उपलब्ध
  • 1 वर्षाच्या मुदत इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत लाईफ कव्हरेज टर्म 1 वर्ष
  • इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम 1 लाखापासून 20 लाखापर्यंत मिळू शकते.
  • पॉलिसीत नैसर्गिक मृत्यू, अपघात, आणि नैसर्गिक आपत्ती यांचा समावेश होतो
  • कोणत्याही गंभीर आजारामुळे होणारा मृत्यू या टर्म प्लॅन अंतर्गत समाविष्ट
  • HIV/AIDS सारख्या लैंगिक संक्रमित रोगांचा (STD - sexually transmitted diseases) पॉलिसीत समावेश
  • प्रीमियम फक्त एका वर्षासाठी भरावा लागतो. दरवर्षी समान रक्कम भरण्याची गरज नाही. परिस्थितीनुसार प्लॅनची निवड करता येते.
  • रेग्युलर टर्म लाईफ इन्शुरन्सप्रमाणे इन्कम टॅक्सच्या कलम 80C आणि कलम 10(10D) अनुसार टॅक्स-बेनिफिट्स उपलब्ध
  • PhonePe चे किमान तीन महिने रजिस्टर्ड ग्राहक असलेल्या व्यक्ती या टर्म प्लॅनसाठी रजिस्ट्रेशन करण्यास पात्र


1 Year टर्म इन्शुरन्स प्लॅनमध्ये पुढील गोष्टींचा समावेश नाही

  • कोणत्याही कारणामुळे / घटनेमुळे पॉलिसी लागू झाल्यापासूनच्या पहिल्या 45 दिवसात पॉलिसीधारकाचा झालेला मृत्यू
  • 1 वर्ष पॉलिसी कालावधीमध्ये पॉलिसीधारकाने केलेल्या आत्महत्येमुळे झालेला मृत्यू


एखाद्या दुर्दैवी घटनेमध्ये पॉलिसीधारकाचे पॉलिसी-टर्मच्या दरम्यान निधन झाल्यास नॉमिनी किंवा त्याचे कायदेशीर वारसदार इन्शुररकडे 1860-266 0997 या क्रमांकावर संपर्क साधू शकतो किंवा सर्व डिटेल्ससह ICICI Prudential कंपनीला todigiclaims@iciciprulife.com या इलेक्ट्रॉनिक ID वर ईमेल पाठवू शकतो.