बाजाराच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर स्मॉल कॅप फंड केवळ परताव्यातच (Return) पुढे नाहीत, तर निधी संकलनाच्या बाबतीतदेखील आघाडीवर आहेत. 2023च्या पहिल्या सहा महिन्यांत, म्युच्युअल फंडांना (Mutual funds) मिळालेल्या एकूण नवीन गुंतवणुकीपैकी 25 टक्के वाटा स्मॉल कॅप फंडांचा आहे. या सहा महिन्यांत अशा निधीमध्ये 18,000 कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत.
बाजाराच्या तुलनेत परताव्याची नोंद
परताव्याच्या बाबतीत, बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीनं गेल्या एका वर्षात 21-22 टक्के परतावा दिला आहे. तर लार्ज कॅप आणि मिड कॅप फंडांनी याच कालावधीत अनुक्रमे 23 टक्के आणि 30 टक्के इतका परतावा दिला आहे. स्मॉल कॅप फंडानं 34 टक्के परतावा देऊन त्या सर्वांना मागे टाकलं आहे. बेस्ट फंडांनी तर 45 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे.
10 सर्वोत्तम स्मॉल कॅप फंड
फंडाचं नाव आणि मागच्या वर्षभरातला परतावा (टक्क्यांमध्ये)
- एचडीएफसी स्मॉल कॅप फंड (डायरेक्ट प्लॅन ग्रोथ) - 45.56
- क्वांट स्मॉल कॅप फंड - 41.06
- फ्रॅंकलिन इंडिया स्मॉलर कंपनीज फंड स्मॉल कॅप फंड - 40.75
- निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड - 39.47
- टाटा स्मॉल कॅप फंड - 39.41
- आयटीआय स्मॉल कॅप फंड - 35.60
- एचएसबीसी स्मॉल कॅप फंड - 34.29
- इन्वेस्को स्मॉल कॅप फंड - 33.92
- एडेलवाइज स्मॉल कॅप फंड - 33.40
- सुंदरम स्मॉल कॅप फंड - 33.21
'या' गोष्टी लक्षात ठेवा...
गुंतवणुकीसाठी सर्वात योग्य स्मॉल कॅप फंड कसे निवडायचे, हा एक महत्त्वाचा भाग आहे. फंडाचा पोर्टफोलिओ कसा आहे, हे सर्वात आधी पाहिलं पाहिजे. स्मॉल कॅप फंड चांगले परतावा देतात, मात्र ते तुलनेनं अधिक अस्थिरदेखील असतात. अशावेळी पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या समभागांचा अभ्यास गरजेचा आहे. याशिवाय फंड मॅनेजरची माहिती घेणंदेखील आवश्यक आहे. फंड कसा कामगिरी करेल हे फंड मॅनेजरच्या स्ट्रॅटेजीवर अवलंबून असतं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूतकाळातला रिटर्न म्हणजेच सध्याच्या रिटर्न्सच्या पॅटर्ननुसार येणाऱ्या काळातल्या कामगिरीचा अंदाज लावण्याची चूक करता कामा नये.
(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)