Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

TDS on Dividends: शेअर्स आणि म्युच्युअल फंड लाभांशावरील TDS कसा वाचवायचा?

avoid TDS on dividends

इक्विटी शेअर्स आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर जर तुम्हाला डिव्हिडंड म्हणजेच लाभांश मिळत असेल तर त्यावरील TDS तुम्ही वाचवू शकता. लाभांशाची रक्कम 5 हजारांच्या पुढे असेल तर त्यावर 10 टक्के रक्कम कापून जाते. जर पॅनकार्ड नसेल तर 20% रक्कम वजा होते. या लेखात पाहूया डिव्हिडंडवरील TDS वाचवण्याचे पर्याय कोणते.

TDS on Dividends: शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडामध्ये जर तुमची गुंतवणूक असेल त्यावरील लाभांश (डिव्हिडंड) करपात्र असतो. या दोन्ही गुंतवणुकीवरील टीडीएस वजा होऊन परतावा तुमच्या हातात येईल. 2021 पूर्वी डिव्हिडंड करमुक्त होता. मात्र 1 एप्रिल 2021 पासून डिव्हिडंड म्हणजेच लाभांश करपात्र झाले. तुमच्या हातात परतावा येण्याआधीच TDS कापून घेतला जातो. नव्या आर्थिक वर्षात तुम्ही म्युच्युअल फंड आणि शेअर्सवरील TDS कर वाचवू शकता. कसे ते पाहू. 

डिव्हिडंडवर TDS कापून जाण्याची मर्यादा किती?

आयकर कायद्यानुसार एका आर्थिक वर्षात डिव्हिडंडची रक्कम 5 हजारांपेक्षा जास्त असेल तर 10% दराने TDS कापला जाईल. (How to avoid TDS on dividends) मात्र, जर गुंतवणूक संस्थेकडे गुंतवणूकदाराचे पॅन कार्ड नसेल तर लाभांश 20% दराने कापला जातो. 

उदाहरणार्थ. तुमच्या XYZ कंपनीचे 10 हजार शेअर्स आहेत. कंपनीने त्यावर 4 रुपये प्रति शेअरने लाभांश जाहीर केला. त्यामुळे तुम्हाला 40 हजार रुपये लाभांश मिळायला पाहिजे. (How to avoid TDS on shares) आयकर कायद्यानुसार 5 हजार रुपयांपेक्षा जास्त डिव्हिडंडवर TDS कापून जाईल. त्यामुळे 40 हजारावर 10 टक्क्यांनी तुमचा 4 हजार रुपये टीडीएस कापून जाईल. तुमच्या बँक खात्यावर फक्त 36 हजार रुपये येतील.मात्र, त्या आर्थिक वर्षात तुमचे उत्पन्न करपात्र नसेल किंवा करसूट मिळवून तुमचा त्या वर्षातील कर शून्य असेल तर तुम्ही लाभांशावर कापून गेलेला TDS रिफंड मिळवू शकता. 

लाभांशावरील TDS वाचवण्याचे पर्याय कोणते?

TDS वाचवायचा असेल तर Form 15G/H जमा करा

आयकर कायद्यानुसार लाभांशावरील टीडीएस वाचवण्यासाठी तुम्ही फॉर्म 15G किंवा 15H भरू शकता. तुम्ही शेअर्स किंवा म्युच्युअल फंड ज्या अॅसेट मॅनेजमेंट कंपनीकडून घेतला आहे, त्यांच्याकडे फॉर्म भरू शकता. मात्र, त्यासाठी काही अटी आणि पात्रता गुंतवणूकदाराला पूर्ण कराव्या लागतात. (Save TDS on dividends) जेव्हा लाभांश मिळतो, तेव्हा जर तुम्हाला मेल आला तर त्या मेलमध्येच फॉर्म 15G/H भरण्याबाबत माहिती असते. ती तुम्ही बारकाईने वाचायला हवी. ही प्रक्रिया थोडी किचकट असू शकते. या दोन्हीही फॉर्मद्वारे गुंतवणुकदाराला उत्पन्नाबाबत डिक्लरेशन द्यावे लागले.

Form 15G/15H कोण भरू शकतो? (Who can fill Form 15G and 15H)

ज्या व्यक्तीचे वय 60 वर्षांपेक्षा कमी आहे ती व्यक्ती 15G फॉर्म भरू शकते. तर ज्यांचे वय 60 पेक्षा जास्त आहे ते फॉर्म 15H भरू शकतात. फक्त भारतीय नागरिकांनाच हा फॉर्म भरता येतो. अनिवासी भारतीयांना हा फॉर्म भरता येणार नाही. तसेच त्या आर्थिक वर्षात कोणतेही करदायित्व नसावे. अशा परिस्थितीत Form 15G/15H भरता येईल.

15G फॉर्म भरण्याची अट काय

  • व्यक्ती भारताची नागरिक असावी.
  • वय 60 वर्षांपेक्षा कमी असावे.
  • इक्विटी शेअर्स आणि म्युच्युअल फंड योजनांतून मिळणारा डिव्हिडंड बेसिक करमुक्त मर्यादेपेक्षा कमी असावे.
  • आर्थिक वर्षात कोणतेही करदायित्व नसावे.

15H फॉर्म भरण्याची अट काय?

  • ज्येष्ठ नागरिकाचे वय 
  • वय 60 वर्षांपेक्षा कमी असावे. 
  • इक्विटी शेअर्स आणि म्युच्युअल फंड योजनांतून मिळणारा डिव्हिडंड बेसिक करमुक्त मर्यादेपेक्षा कमी असावे. 
  • आर्थिक वर्षात कोणतेही करदायित्व नसावे. 

ज्या आर्थिक वर्षात फॉर्म भरत आहे त्या वर्षात उत्पन्न करमुक्त असल्याचे किंवा करवजावटींचा लाभ घेऊन कर दायित्व नसल्याचे या फॉर्मद्वारे स्पष्ट करावे लागेल. त्यानंतरच TDS वरील करवजावट मिळेल. चालू आर्थिक वर्षात करदाता कोणती कर प्रणाली निवडतो त्यावर करमुक्त उत्पन्नाची मर्यादा किती आहे हे ठरेल. जुन्या कर प्रणालीनुसार 2.5 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. तर नव्या कर प्रणालीनुसार 3 लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. कर दायित्व Nil असणे म्हणजे त्या आर्थिक वर्षात शून्य कर भरावा लागणे.

tax-free-limit-as-per-new-tax-system-2.jpg

87A अतर्गंत टॅक्स रिबेट मिळवूनही तुम्ही 15G/H फॉर्म भरू शकता. सेक्शन 87A अतर्गंत जुन्या करप्रणालीनुसार 5 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर करवजावट मिळवता येईल. तर नव्या कर प्रणालीनुसार 7 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर करवजावट मिळवता येईल. टॅक्स रिबेटचा फायदा घेऊन करपात्र उत्पन्न शून्य म्हणजेच Nil असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येईल.

हिंदू अविभक्त कुटुंब 15G फॉर्म भरुन TDS वाचवू शकतात का? 

हो. हिंदू अविभक्त कुटुंब 15G फॉर्म भरुन TDS वाचवू शकतात.

TDS वाचवण्याचे इतर पर्याय काय आहेत? 

लाभांशावरील TDS वाचवण्यासाठी फॉर्म 15G/H शिवाय इतरही काही पर्याय आहेत. जसे की, तुम्ही पुनर्गुंतवणूक (रिइन्व्हेस्टमेंट) म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करायला हवी. ज्यामध्ये तुम्हाला डिव्हिडंड मिळणार नाही. तर हे लाभांशाचे पैसे पुन्हा गुंतवले जातील. मग TDS ही कापून जाणार नाही. डायरेक्ट ग्रोथ प्लॅनमध्येही तुम्ही गुंतवणूक करू शकता. कुटुंबातील ज्या व्यक्तीचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी आहे. त्या व्यक्तीच्या नावे तुम्ही म्युच्युअल फंड किंवा शेअर्स खरेदी करू शकता. मात्र, हे व्यवहार त्या व्यक्तीच्या खात्यातून व्हायला हवेत. त्याच व्यक्तीला हा लाभ घेता येईल.