Summer Heat Stroke : महाराष्ट्रात उष्मघाताने 11 जणांचा बळी गेला. सध्या कडाक्याचं उन्ह तापत आहे आणि त्याचा परिणाम अनेकांच्या तब्येतीवर होतो आहे. मात्र, अश्याही परिस्थितीत आपण डॉक्टरांकडे पैश्यांचा होणारा अतिरिक्त खर्च टाळून जर का त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय केले तर, कमी खर्चामध्ये आपण आपण स्वत:ला सुरक्षित ठेऊ शकतो.
उष्माघात टाळण्यासाठी कमी खर्चातील उपाय कोणते
- उन्हाळ्यात सुती कपडे घालावे.
- शरीर पूर्ण झाकुन ठेवावे.
- शक्यतोवर उन्हात अजिबात जाऊ नये.
- गरज पडल्यास डोक्याला बांधूनच बाहेर पडावे.
- डोळ्यावर सनग्लास लावावा.
- उन्हात घराबाहेर निघतांना शरीराला ताजेपणा आणि एनर्जी वाटावी.यासाठी आंब्याचे पन्हं, ताक, लिंबूपाणी पिऊनच बाहेर पडावे.
- अचानक थंड वातावरणातून खूप गरम वातावरणात जाऊ नये. विशेषत: एसीमध्ये बसल्यानंतर लगेच उन्हात बाहर पडू नका.
- रोज कच्चा कांदा खा. उन्हात बाहेर जातांना खिशात छोटा कांदा ठेवावा.
- उन्हाळ्यात तहान शमविण्यासाठी मातीच्या भांड्यात किंवा भांड्यातील पाणी लिंबाच्या रसात मिसळवुन प्यावे.
उष्माघात झाल्यास कमी खर्चाचे उपाय
- समजा तुम्ही कडक उन्हात गेले आणि उष्माघाताचा त्रास तुम्हाला जाणवू लागला तर, अश्यावेळी तुम्ही हंगामी फळे, फळांचा रस, दही, ताक, जिरे ताक, जलजीरा, इत्यादी तात्काळ एनर्जी देणारे पेय प्यावे.
- 104 अंशापेक्षा जास्त ताप असल्यास डोक्यावर बर्फाचा थंड पॅक ठेवावा. रुगणाला कांद्याचा रस मधात मिसळून लगेच द्यावा. रुग्णाचे दिवसातून 4 ते 5 वेळा ओल्या टॉवेलने अंग पुसावे.
- कच्च्या कांद्याचा तुकडा रुग्णाच्या तळहातावर आणि तळपायावर घासावा, यामुळे शरीरातील उष्णता त्वरित बाहेर पडते आणि उष्णतेचा त्रास कमी होतो. तसेच रुग्णाच्या शरीरातील अशक्तपणा दूर व्हावा,यासाठी ग्लुकोजचे पाणी पिण्यास द्यावे.
- अनेक घरगूती उपाय करुन जर का रुग्णाचा त्रास कमी झाला नाही, तर डॉक्टर कडे जावे. जर का तुमचा आरोग्य विमा असेल, तर डॉक्टरचा खर्च त्यातुनच होऊ शकतो. आणि जर का नसेल आणि तुमची परिस्थिती फार पैसे खर्च करण्याची नसेल तर, तुम्ही जवळच्या सरकारी रुग्णालयात देखील रुगणाला दाखल करु शकता.