Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

TCS on Foreign Tour: पुढच्या महिन्यापासून परदेश दौऱ्यांवर 20 टक्के टीसीएस, अतिरिक्त शुल्क कसं टाळावं?

TCS on Foreign Tour: पुढच्या महिन्यापासून परदेश दौऱ्यांवर 20 टक्के टीसीएस, अतिरिक्त शुल्क कसं टाळावं?

TCS on Foreign Tour: परदेश दौऱ्यावर जाऊ इच्छिणाऱ्यांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. पुढच्या महिन्यापासून म्हणजेच 1 जुलैपासून परदेश दौऱ्यासाठीच्या टूर पॅकेजेसवर लावण्यात येणारा टॅक्स कलेक्टेड अ‍ॅट सोर्स म्हणजेच टीसीएस 20 टक्के आकारला जाणार आहे.

परदेश दौऱ्यावर (Foreign Tour) जाणाऱ्यांसाठी टीसीएस (Tax Collected At Source) आकारला जात असतो. आता तो 20 टक्के इतका असणार आहे. जर तुमचं परदेशी टूर पॅकेज 3 लाखांचं असेल तर तुम्हाला 60 हजार रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. सध्या परदेश टूर पॅकेज बुक केल्यास तुम्हाला फक्त 5 टक्के टीसीएस भरावा लागतो. इन्कम टॅक्स रिटर्न (Income tax return) भरताना टीसीएसवर रिफंडचा दावा करता येवू शकतो. मात्र तुम्ही पुढच्या आर्थिक वर्षासाठी आटीआर दाखल करेपर्यंत तुमचे पैसे अडकून राहणार आहेत. अशा स्थितीत तुम्हाला हा कर वाचवायचा असेल तर त्यासाठीदेखील पर्याय आहेत. कोणकोणते, ते जाणून घेऊ...

टूर बुकिंगचे दोन पर्याय

परदेशात जाण्यासाठी टूर बुकिंग करण्यासाठीचे दोन पर्याय आहेत. पहिला म्हणजे देशांतर्गत ट्रॅव्हल एजंटसोबत टूर बुक करणं आणि दुसरं म्हणजे परदेशी ट्रॅव्हल एजंटसोबत टूर बुक करणं. समजा तुम्ही घरगुती ट्रॅव्हल एजंटद्वारे तिकीट बुक केलं तर तुम्हाला 20 टक्के टीसीएस भरावा लागेल. तर समजा तुम्ही ट्रॅव्हल पॅकेजेस देणार्‍या आंतरराष्ट्रीय वेबसाइटवरून तिकीट बुक केलं तर काही बाबतीत तुम्हाला फायदा होऊ शकतो.

आंतरराष्ट्रीय डेबिट, क्रेडिट कार्डचा वापर

जे लोक त्यांच्या आंतरराष्ट्रीय डेबिट किंवा क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून 7 लाख रुपयांपर्यंतचं पेमेंट करतात, त्यांना टीसीएस शुल्क आकारलं जाणार नाही, असं 19 मे 2023 रोजी वित्त मंत्रालयानं सांगितलं होतं. त्यामुळे परदेश टूर पॅकेज घेताना, बुक करताना तुम्ही फक्त 7 लाख रुपयांची मर्यादा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते आंतरराष्ट्रीय वेबसाइटवरून बुक केल्यास फायदा आहे.

स्वतंत्रपणे टूर बुक करणं फायद्याचं

परदेश दौऱ्यावर जाण्याचं तुमचं नियोजन असेल तर संपूर्ण टूर एकत्र बुक करण्याऐवजी वेगवेगळं बुकिंग करून टीसीएस वाचवता येवू शकेल. हवाई तिकीट तुम्ही स्वतः खरेदी करा आणि नंतर हॉटेलदेखील स्वतःच बुक करा. जर तुमचा ग्रुप मोठा असेल तर 7 लाख रुपयांची मर्यादा लक्षात घेऊन तुमच्या कोणत्याही मित्राचे किंवा कुटुंबातील सदस्यांचं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरता येईल. या माध्यमातून जेव्हा तुम्ही स्वतंत्रपणे बुक करता तेव्हा ते टूर पॅकेजच्या प्रकारात येणार नाही आणि तुम्हाला त्यावर 20 टक्के टीसीएसदेखील भरण्याची गरज उरणार नाही.

फॉरेन एक्स्चेंजचा पर्याय

अनेक लोक जेव्हा परदेश दौऱ्यावर असतात, तेव्हा ते परकीय चलन विकत घेतात आणि ते वापरतात किंवा आपल्या फॉरेक्स कार्डचा वापर करतात. तुम्हालाही जर परदेश दौऱ्यावर जायचं असेल तर या पर्यायाचा विचार करू शकता. तुम्ही 30 जूनपूर्वी परकीय चलन घेऊ शकता किंवा फॉरेक्स कार्ड तयार करू शकता. 

रिझर्व्ह बँकेचा नियम

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, कोणतीही व्यक्ती त्याच्या परदेश दौऱ्याच्या तारखेच्या 60 दिवस आधी परकीय चलन किंवा विदेशी मुद्रा कार्ड घेऊ शकतं. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत तुम्ही परदेश दौऱ्यावर जाण्याचा विचार करत असाल, तर आतापासूनच नियोजन करून विदेशी चलन घेऊन किंवा फॉरेक्स कार्ड मिळवून 20 टक्के टीसीएसपासून सुटका करू शकता.