SIP of 1 crore: म्युच्युअल फंड एसआयपी (SIP) मध्ये गुंतवणूक करून तुम्ही 1 कोटी रुपये मिळवू शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला योग्य नियोजनाची गरज आहे. अल्प कालावधीत तुम्हाला म्युच्युअल फंड परताव्यात चढउतार दिसू शकतात. मात्र, दीर्घकाळात चांगला परतावा मिळण्याची शक्यता जास्त असते. शिस्तीने दरमहा गुंतवणूक केल्यानंतर भविष्यात चांगला फायदा मिळू शकतो. अर्थात म्युच्युअल फंड योजनांमध्येही जोखीम असते. त्यामुळे अधिकृत आर्थिक सल्लागाकडून माहिती घेऊनच गुंतवणूक करायला हवी.
अनेक म्युच्युअल फंड्सने 5-10 वर्षांच्या कालावधीत चांगला परतावा दिला आहे. एकरकमी गुंतवणूक करण्यापेक्षा एसआयपीद्वारे केलेल्या गुंतवणुकीतून शिस्त लागते. विविध योजनांमध्ये तुम्ही दरमहा, दोन, तीन, सहा महिने किंवा वर्ष अशा ठराविक अंतराने गुंतवणूक करू शकता.
या लेखात पाहूया एक कोटी रुपये राशी जमा होण्यासाठी दरमहा एसआयपीमध्ये किती रुपये गुंतवणूक करावी लागेल. त्यासाठी आपण 12% वार्षिक परताव्याचा दर गृहित धरू. Wealth Conversations Report नुसार 12 टक्के दर गृहित धरू. कारण, अनेक योजनांतून मागील काही वर्षात 12% दराने परतावा मिळाला आहे.
1 कोटी रुपये राशी जमा होण्यास किती वर्ष दहमहा गुंतवणूक करावी लागेल
- दरमहा 10 हजार रुपये SIP मध्ये गुंतवणूक करून 20 वर्ष 1 महिन्यानंतर 12% व्याजदराने 1 कोटी रुपये मिळतील.
- दरमहा 20 हजार रुपये SIP मध्ये गुंतवणूक करून 15 वर्षानंतर 12% व्याजदराने 1 कोटी रुपये राशी जमा होईल.
- दरमहा 25 हजार रुपये SIP मध्ये गुंतवणूक करून 13 वर्ष 5 महिन्यानंतर 12% व्याजदराने 1 कोटी रुपये राशी जमा होईल.
- दरमहा 30 हजार रुपये SIP मध्ये गुंतवणूक करून 12 वर्ष 4 महिन्यानंतर 12% व्याजदराने 1 कोटी रुपये राशी जमा होईल.
- दरमहा 40 हजार रुपये SIP मध्ये गुंतवणूक करून 10 वर्ष 6 महिन्यानंतर 12% व्याजदराने 1 कोटी रुपये राशी जमा होईल.
- दरमहा 50 हजार रुपये SIP मध्ये गुंतवणूक करून 9 वर्ष 2 महिन्यानंतर 12% व्याजदराने 1 कोटी रुपये राशी जमा होईल.
- दरमहा 75 हजार रुपये SIP मध्ये गुंतवणूक करून 7 वर्ष 1 महिन्यानंतर 12% व्याजदराने 1 कोटी रुपये राशी जमा होईल.
- दरमहा 1 लाख रुपये SIP मध्ये गुंतवणूक करून 5 वर्ष 10 महिन्यानंतर 12% व्याजदराने 1 कोटी रुपये राशी जमा होईल.
(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)