Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Digital Gold Tax: डिजिटल गोल्डवर किती टॅक्स द्यावा लागतो?

Digital Gold Tax

Digital Gold Tax: डिजिटल सोनं खरेदी करणं आता इतकं सोपं झालं आहे की लोक ते मोबाईल ॲपद्वारेही खरेदी करू शकतात. डिजिटल गोल्ड (Digital Gold) आल्यापासून अनेकांची काळजी मिटली आहे. आजकाल डिजिटल सोने खूप चर्चेत आहे. अनेक लोक यात गुंतवणूक करत आहेत, त्यावर कोणकोणता टॅक्स आणि चार्ज द्यावा लागतो जाणून घ्या.

Digital Gold Tax: डिजिटल सोनं खरेदी करणं आता इतकं सोपं झालं आहे की लोक ते मोबाईल ॲपद्वारेही खरेदी करू शकतात. डिजिटल गोल्ड आल्यापासून अनेकांची काळजी मिटली आहे. आजकाल डिजिटल सोने खूप चर्चेत आहे. अनेक लोक यात गुंतवणूक करत आहेत. यासोबतच शेअर बाजारातील अनिश्चितता आणि महागाईमुळे लोक याकडे आकर्षित होत आहेत. डिजीटल गोल्ड (Digital Gold) म्हणजे तुमच्या खिशात नसलेल्या डिजिटल वॉलेटमध्ये (Digital wallet) असलेला पैसा. तुम्ही फक्त 1 रुपयानेही यात गुंतवणूक सुरू करू शकता. यावर किती कर (Digital Gold Tax) आकारला जातो? हे माहित करून घेऊया.

GST किती लागतो? (How much does GST cost?)

डिजिटल गोल्डवर 3 टक्के जीएसटी(GST)भरावा लागतो. समजा तुम्ही 1000 रुपयांचे डिजिटल सोने (Digital Gold)खरेदी केले असेल तर तुमचे 30 रुपये GST मध्ये जातील. तिथे तुम्हाला 970 रुपये किमतीचे सोने मिळेल.

कोणकोणते चार्जेस द्यावे लागतात (Some charges have to be paid)

डिजिटल सोने खरेदी करताना, तुम्हाला काही चार्जेस द्यावे लागतात. यामध्ये ट्रस्टी चार्ज  आणि व्यवहाराच्या खर्चापासून देखभाल, प्रक्रिया, विमा आणि स्टोरेज चार्जपर्यंत सर्वकाही समाविष्ट आहे. याशिवाय, डिजिटल सोन्याची डिलिव्हरी घेण्यासाठी तुम्हाला डिलिव्हरी चार्जेस देखील भरावे लागतील. 

कर दायित्व देखील आहे (There is also a tax liability)

डिजिटल सोन्याच्या विक्रीच्या बाबतीत, दीर्घकालीन भांडवली नफ्यावर (Long term capital gains) कर(Tax) दायित्व फिजिकल गोल्डप्रमाणेच असते. डिजीटल सोने 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी ग्राहकाकडे राहिल्यास, त्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या परताव्यावर थेट कर आकारला जात नाही.

पाच वर्षांहून अधिक काळ स्टोरेजवर चार्ज (Charges on storage for more than five years)

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही डिजिटल सोने तुमच्याकडे 5 वर्षांपेक्षा जास्त काळ ठेवू शकत नाही. जर तुम्ही असे केले तर तुम्हाला यासाठी चार्ज  देखील द्यावे लागेल.

कोणतेही नियामक नाही

डिजिटल सोन्यावर देखरेख करण्यासाठी कोणतेही नियामक नाही. सेबी आणि आरबीआय सारख्या (SEBI and RBI) सरकारी संस्था देखील सध्या त्याचे नियमन करत नाहीत.

सरकार निर्णय घेतील? 

क्रिप्टोकरन्सीप्रमाणेच डिजिटल सोन्याबाबत गुंतवणूकदारांना सर्व प्रकारची आश्वासने दिली जात आहेत. या सर्वांवर सरकार लक्ष ठेवून आहे आणि आता यावर लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो.