Tax on Liquor: भारतात विविध गोष्टींवर टॅक्स (Tax) लावले जातात. कपडे असो, खाणे असो...जवळजवळ सर्वच गोष्टींवर टॅक्स लावले जाते असे म्हणण्यास हरकत नाही. पण सर्वात महत्वाचे म्हणजे देशात मद्याचा स्वाद घेणाऱ्यांची कमी नाही. मोठया प्रमाणात लोक दारूचे व्यसन करतात. मात्र त्यांना दारूवर किती टॅक्स घेतात, हे माहिती आहे का? चला, तर पाहुयात कोणते राज्य, 1000 रूपयाच्या दारूवर किती टॅक्स लावतात?
Table of contents [Show]
1000 रुपयांवर किती टॅक्स
समजा, जर एखादया व्यक्तीने 1000 रूपयांचे मद्य खरेदी केले आहे, तर त्यावर कमीत कमी सरकारकडून 35 ते 50 टक्के टॅक्स आकारला जातो. म्हणजेच जर तुम्ही 1000 रुपयांची दारू खरेदी केली असेल, तर त्यातून साधारण 350 ते 500 रूपये सरकारच्या खात्यात जमा होते.
कोणती राज्ये, किती टॅक्स भरतात
भारतात काही राज्यात दारूबंदी करण्यात आली आहे. मात्र काही राज्यात दारूची विक्री करण्यास परवानगी आहे. अशा राज्यांकडून सरकार 1000 रूपयांवर किती टॅक्स वसूल करतात हे माहिती आहे का? जसे की, कर्नाटक आपल्या राज्याच्या उत्पन्नाचा जवळपास 15 टक्के हिस्सा हा दारू विक्रीतून टॅक्सच्या स्वरूपात सरकारला देते, तर दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, तेलंगणा ही राज्येदेखील मद्यविक्रीतून जवळपास 10 टक्के हिस्सा टॅक्सच्या स्वरूपात सरकारच्या तिजोरीत जमा करते.
केरळ राज्य देते 25 टक्के टॅक्स
भारतात केरळ सरकार दारू विक्रीवर मोठया प्रमाणात टॅक्स (कर) वसूल करते. कारण येथे मोठया प्रमाणात दारूची विक्री होते. या राज्यात सरकारच्या माध्यमातून जवळजवळ 250 टक्के टॅक्स आकारला जातो. तसेच तामिळनाडू सरकारदेखील मदयाची विक्री करून मोठया प्रमाणात टॅक्सच्या स्वरूपात बक्कळ पैसा कमविते. या राज्यात विदेशी मद्यावर वॅट, उत्पादन शुल्क आणि विशेष शुल्कदेखील आकारले जाते.
गुजरातमध्ये दारू बंदी
भारतातील विविध राज्यांत दारू विक्रीवर विविध स्वरूपात कर आकारला जातो. मात्र गुजरातमध्ये 1961 पासूनच मद्याच्या सेवनावर बंदी करण्यात आली आहे. परंतु विशेष लायसन्सच्या माध्यमातून परराज्य व परदेशातील लोक येथे मद्य खरेदी करू शकतात.