• 02 Oct, 2022 07:59

व्यवसाय सुरू करण्यासाठी किती कर्ज मिळू शकते?

व्यवसाय सुरू करण्यासाठी किती कर्ज मिळू शकते?

देशातील कोणत्याही नागरिकाला नव्याने किंवा त्याचा जुना व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून आत्मनिर्भर अभियानांतर्गत (Atmanirbhar Bharat Abhiyan) व्यवसाय कर्ज (Business Loan) उपलब्ध करून दिले जाते.

केंद्र सरकारत्या आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार 10 लाख रुपयांची मदत देते. आत्मनिर्भर योजनेचा मुख्य उद्देश समाजातील प्रत्येक घटक स्वत:च्या पायावर उभे करणे हा आहे. याच उद्देशाने नागरिकांना उद्योग-धंदा सुरू करण्यासाठी सरकार बिझनेस लोनच्या (Business Loan) माध्यमातून आर्थिक मदत करत आहे.

सराकारी योजनेचा लाभ घ्या

आत्मनिर्भर भारत अभिनायानंतर्गत (Atmanirbhar Bharat Abhiyan) देशातील कोणत्याही नागरिकाला नव्याने किंवा त्याचा जुना व्यवसाय पुन्हा एकदा सुरू करता येतो. या दोन्ही प्रकारच्या व्यवसायांसाठी केंद्र सरकारकडून आत्मनिर्भर अभियानांतर्गत व्यवसाय कर्ज उपलब्ध करून दिले जाते. 


पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना (PM Mudra Loan Yojana)

देशातील ज्या व्यक्तींकडे कर्ज घेण्यासाठी बॅंकेने ठरवून दिलेल्या अटी पूर्ण करण्याची क्षमता नाही. अशा लोकांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना सुरू केली. या योजने अंतर्गत देशातील कोणताही नागरिक, जो कुटीर उद्योग किंवा भागीदारीत व्यवसाय करतो, त्याला कर्ज (mudra loan) उपलब्ध करून दिले जाते.

मुद्रा कर्ज योजनेत तीन टप्प्यात कर्ज दिले जाते. सरकारने या कर्ज योजनेत शिशु लोन, किशोर लोन आणि तरुण लोन अशी विभागणी केली.

शिशु कर्ज योजना : या अंतर्गत संबंधित व्यक्तीला व्यवसाय सुरू करण्यासाठी 50,000 रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.

किशोर कर्ज योजना : किशोर योजने अंतर्गत 50 हजार रूपयांपासून ते 5 लाखांपर्यंत कर्ज दिले जाऊ शकते.

तरुण कर्ज योजना : तरुण कर्ज योजनेद्वारे लघु उद्योग सुरू करण्यासाठी 5 लाखापासून 10 लाखापर्यंत कर्ज दिले जाते.

पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेद्वारे फक्त लघु उद्योजक आणि लहान व्यावसायिकांना कर्ज दिले जाते. लघु उद्योजकांमध्ये, असेंबलिंग युनिट्स, सर्व्हिस सेक्टर, दुकानदार, फळ / भाजी विक्रेते, ट्रक ऑपरेटर, फूड सर्व्हिस युनिट्स, रिपेअर शॉप्स, मशीन ऑपरेटर, लघु उद्योग, कारागीर आणि फूड प्रोसेसिंग युनीट यांचा समावेश होतो. या व्यावसायिकांना पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेद्वारे कर्ज दिले जाते.

सरकारी व ग्रामीण बॅंकांद्वारे कर्ज मिळते

पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत सरकारी बँकांसोबतच ग्रामीण आणि सहकारी बँकांकडूनही कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. आरबीआयने अधिकृत केलेल्या 27 बँकांप्रमाणे खाजगी क्षेत्रातील 17 बँका, 31 ग्रामीण बँका, 4 सहकारी बँका, 36 मायक्रो-फायनान्स बँका आणि 25 बिगर-बँकिंग क्षेत्रातील फायनान्स कंपन्या आहेत. या योजनेविषयीची अधिक माहिती mudra.org.in वर मिळेल.