Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cash Deposit Limit in Saving Account: सेव्हिंग खात्यात किती पैसे ठेवू शकतो?

Cash Deposit Limit in Saving Account

Image Source : www.bankofindia.co.in

Cash Deposit Limit in Saving Account: प्रत्येकवेळी आपण पैसे घरात साठवून ठेवू शकत नाही. पैसे सुरक्षित राहण्यासाठी आपण ते बँकेत ठेवतो. बँकेत पैसे ठेवण्याचे किंवा साठवण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात. पण बँकेतील सेव्हिंग खात्यामध्ये पैसे ठेवण्याचे लिमिट आहे. त्याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने वेगवेगळ्या प्रकारच्या खात्यामध्ये किती रक्कम भरून शकतो, याचे काही नियम केले आहेत. या नियमानुसार प्रत्येक खात्यामध्ये पैसे भरण्यासाठी काही लिमिट सेट केले आहेत. तर यावर इन्कम टॅक्स विभाग देखरेख ठेवून असते. त्यामुळे तुमचे जर बचत खाते (Saving Account) आहे आणि त्यात तुम्ही नेहमी पैसे भरता. तर त्याचे लिमिट किती आहे, हे माहिती असणे तुमच्यासाठी गरजेचे आहे.

प्रत्येकवेळी आपण पैसे घरात साठवून ठेवू शकत नाही. पैसे सुरक्षित राहण्यासाठी आपण ते बँकेत ठेवतो. बँकेत पैसे ठेवण्याचे किंवा साठवण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात. जसे की, बचत खाते (Saving Account), चालू खाते (Current Account), मुदत ठेवी (Fixed Deposit) किंवा आवर्ती ठेवी (Recurring Deposit) मध्ये पैसे ठेवू शकतो. या सर्व खात्यांसाठी आरबीआयने काही नियम घालून दिले आहेत. त्या नियमानुसार बँका ग्राहकांना या खात्यांची सुविधा उपलब्ध करून देत असते. आज आपण तुर्तास सेव्हिंग म्हणजेच बचत खात्यामध्ये किती पैसे ठेवू शकतो याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत.

बचत खात्यात दिवसाला किती रक्कम भरू शकतो?

बचत खात्यामध्ये एका दिवसाला एकावेळी 1 लाख रुपये भरू शकतो. याव्यतिरिक्त दिवसभरात थोड्याथोड्या अंतराने खातेदार अकाउंटमध्ये 2.50 लाख रुपये भरू शकतो. त्याचप्रमाणे वर्षभरात सेव्हिंग अकाउंटमध्ये 10 लाखापेक्षा जास्त रक्कम भरू शकत नाही. हे लिमीट जर तुम्ही क्रॉस केले तर आयटी विभागाची तुम्हाला नोटीस येऊ शकते.    

बचत खात्यावर इन्कम टॅक्स लागतो का?

साधारणपणे बचत खात्यात आपण पैसे ठेवले की, बँकंच खातेधारकाला त्यावर व्याज देते. म्हणून आपण त्यात कितीही पैसे ठेवू शकत नाही. बँकेने खातेदाराला व्याज देण्याचं लिमिट सेट केलं आहे. वर्षभरात खातेदार 10 हजारापर्यंत बचत खात्यावर व्याज मिळवू शकतो. त्यानंतर मात्र त्याच्यावर टॅक्स आकारला जातो.

कॅश भरण्यासाठी ओळखपत्र दाखवावे लागते का?

आरबीआयच्या नियमानुसार, 50 हजारांपर्यंतची रक्कम भरण्यासाठी बँकेला कोणताही ओळखीचा पुरावा दाखवावा लागत नाही. पण 50 हजारांवरील रक्कम भरताना अधिकाऱ्यांना पॅनकार्ड दाखवावे लागते.