Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

एका सामन्यासाठी IPL Cheerleaders ला मिळते इतके मानधन; सोबतच मिळतात या सुविधा

IPL Cheerleaders Income

Image Source : www.livemint.com

IPL Cheerleaders Income: कोविड महामारीनंतर पुन्हा एकदा 'IPL 2023' मध्ये खच्च भरलेले स्टेडियम आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी चीअरलीडर्स पाहायला मिळत आहेत. क्रिकेट पाहायला येणाऱ्यांचे मनोरंजन करणाऱ्या या चीअरलीडर्सना एका सामन्यासाठी किती मानधन मिळते, माहितीये का तुम्हाला?

बहुचर्चित आणि सर्वात जास्त पाहिला जाणारा स्पोर्ट्स शो म्ह्णून 'आयपीएल'ला (IPL)ओळखले जाते. 31 मार्चपासून आयपीएलच्या 16 व्या सिझनची (Season) सुरुवात झाली. या पर्वामध्ये खेळाडू, नवीन व्यावसायिक प्रायोजक (New commercial sponsor), चीअरलीडर्सही आणि प्रेक्षकांनी खच्च भरलेले स्टेडियम पाहायला मिळत आहे.

कोविडच्या महामारीदरम्यान सरकारी नियमांमुळे हे वातावरण प्रेक्षकांना अनुभवता आले नव्हते. मात्र यावर्षीच्या टाटा आयपीएल 2023 (Tata IPL 2023) मध्ये हा जोश पुन्हा एकदा अनुभवता येत आहे. स्टेडियमवरील खेळाडुंचे आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा चीअरलीडर्स क्रिकेट सामन्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. तुमचे मनोरंजन करणाऱ्या या चीअरलीडर्सना एका सामन्यासाठी किती मानधन मिळते, याबाबत जाणून घेऊयात.

एका सामन्यासाठी मिळते 'इतके' मानधन

आयपीएलमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी चीअरलीडर्स जवळपास प्रत्येक सामन्यात पाहायला मिळतात. या चीअरलीडर्स मुख्यतः परदेशातील असतात. त्यातील एखाददुसराच चेहरा भारतीय असतो. चीअरलीडर्सना जे मानधन दिले जाते. ते प्रत्येक क्रिकेट सामन्यानुसार आणि संघानुसार बदलत असते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार आयपीएलमधील चीअरलीडर्सना अंदाजे 14 ते 17 हजार रुपये मानधन देण्यात येते. Cric Facts च्या रिपोर्टनुसार CSK, पंजाब, सनरायझर्स हैद्राबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांच्या सामन्यांसाठी चीअरलीडर्सना 12,000 रुपये मानधन दिले जाते. तर मुंबई आणि आरसीबी या संघाच्या सामन्यासाठी 20,000 रुपये मानधन देण्यात येते. याशिवाय KKR मधील चीअरलीडर्सना सर्वात जास्त मानधन दिले जाते. त्यांना एका सामन्यासाठी अंदाजे 24,000 रुपये मिळतात.

'या' सुविधाही पुरविल्या जातात

आयपीएल चीअरलीडर्स (IPL Cheerleaders Job) होणे वाटते तितके सोपे नाही. त्यांची निवड ही मुलाखत, डान्स, मॉडेलिंग आणि प्रचंड गर्दीसमोरील परफॉर्मन्सवर आधारित करण्यात येते. त्यासाठी त्यांना तसा अनुभव असणे गरजेचे आहे. त्यांना नोकरी मिळाल्यानंतर मानधनासोबत परफॉर्मन्सवर पैसे देखील मिळतात. तसेच त्या ज्या संघाला चिअर्स करत असतात. तो संघ जिंकल्यानंतर त्यांना बोनस (Bonus) म्ह्णून ठराविक रक्कम ही देण्यात येते. याशिवाय चीअरलीडर्सना ब्रँडेड लग्झरी सामान, महागडे फूड आणि विशिष्ट सुरक्षाही पुरवण्यात येते. 

Source: www.livemint.com