• 08 Jun, 2023 01:24

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gram Panchayat Fund: ग्रामपंचायतीला एका वर्षात किती निधी मिळू शकतो?

Gram Panchayat

Image Source : http://www.quora.com/

Gram Panchayat Fund: ग्रामपंचायत गावाचा विकास घडवून आणते. त्यासाठी लागणारा निधी कुठून आणि कसा येतो? किती येतो? याबाबत अनेकांना माहित नसते. त्याचबरोबर तो निधी पूर्ण वापरला गेला नाही तर काय करावे? याबाबत माहित करून घेऊया...

Gram Panchayat Fund: नुकतीच गावातील ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. आणि विरोधकांची आरडाओरड सुरू झाली. गावातील सांडपाणी जागीच साचत असल्याने त्याचा दुर्गंध पसरतोय, आमच्या मुलाबाळांना त्याच्या त्रास होतोय. ग्रामपंचायतीला वर्षभरात अनेक निधी येतात पण गटार लाइन अजूनही बांधली नाही. गावाचे आरोग्य धोक्यात आहे तरी सुद्धा ग्रामपंचायत झोपेतच का? असे प्रश्न निर्माण झाले. तेव्हा अनेकांनी चर्चा केली की ग्रामपंचायतीला नेमकावर्षभरात किती निधी येत असावा? तर जाणून घेऊया ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीबाबत.. 

स्थानिक स्वराज्य संस्था हा भारताच्या राज्यघटनेतील अविभाज्य घटक आहे. फार पूर्वीपासून गावातील भांडण तंटे मिटवण्यासाठी, गावचा विकास साधण्यासाठी समिती नेमली जाते, त्याला पंचायत म्हटले जाते. त्याचबरोबर त्यातील सदस्यांना पंच असेही म्हणतात. ग्रामपंचायतीचा प्रमुख असलेल्या सरपंचाला जिल्ह्या परिषदच्या अध्यक्षापेक्षा वरचढ अधिकार प्राप्त झाले आहेत. 

त्यामुळे सरपंचाने ठरवले तर ग्रामविकासासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये गावात आणू शकतो. त्यासाठी त्याला कोणत्याही पूर्वपरवानगीची गरज भासत नाही. हा निधी थेट ग्रामपंचयातीचा खात्यात जमा होत असतो. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या कारभाराला अतिशय महत्त्व आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या एकूण 1440 योजना आहे. त्या गरजेनुसार गावात राबवल्या जातात. या सगळ्याच योजना सर्व गावांसाठी लागू असतात असे नाही. 

grampanchayat.jpg

ग्रामपंचायतीचे मुख्य निधी स्रोत कोणते असू शकतात? 

मनुष्याच्या मुख्य गरजा जसे अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, आरोग्य, शिक्षण आहेत त्याचप्रमाणे गावातील मूलभूत गरजा म्हणजेच वीज, रस्ते, पाणी आणि इतर नागरी सुविधा आहेत. या पूर्ण करण्यासाठी निधीची आवश्यकता असते. तो निधी जमा करण्यासाठी ग्रामपंचायत गावात विविध कर व फीची आकारणी करते. गावातील कारभार सुव्यवस्थित चालावा आणि नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून हा निधी वापरला जातो. याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाकडून गावातील विकासकामांसाठी विविध निधी ग्रामपंचायतीला पुरवला जातो. 

यांसारखे कर ग्रामपंचायतीला आकारण्याचा अधिकार असतो. या करांचे दर शासनाने निश्चित केलेल्या दरांवर आकारले जातात. सामान्यतः हे कर आकारमान, क्षेत्रफळ आणि भांडवली मूल्यांकावर ठरवले जातात. गावातील एका घरामागे वर्षामधून कमीत कमी हजार रुपये करप्राप्ती ग्रामपंचायतीला नक्कीच होत असते. त्या निधीला 'ग्रामनिधी' असेही म्हणतात.

शासनाकडून ग्रामपंचायतीला प्राप्त होणारे विविध निधी कोणते?

राज्य वित्त आयोगाचा निधी

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल अभियान निधी

 महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना निधी

जिल्ह्या परिषदचा निधी

 स्वच्छता अभियान योजनेअंतर्गत निधी

आपले सरकार केंद्र निधी

घरकुल योजनेअंतर्गत प्राप्त होणार निधी

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती निधी

सर्व शिक्षा अभियान निधी

ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत निधी 

बाल विकास योजना निधी

पंचायत समितीचा निधी

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान निधी

आमदार व खासदार निधी

पंतप्रधान विकास योजना निधी

यांसारख्या योजनेअंतर्गत अनके निधी ग्रामपंचायतीला गावातील विकासकामे करण्यासाठी मिळत असतात. यापैकी दरवर्षी प्रत्येक निधी मिळेलच असे नाही. यातील काही निधी मिळू शकतात. 

निधी उरला तर काय?

ग्रामपंचायतींनी खर्च न केलेला निधी सरकारला परत जातो आणि जर निधी परत जात असेल तर ती ग्रामपंचायत अकार्यक्षम असते असं समजलं जाते. पैसे नेमके कुठे खर्च करायचे? हे त्याला सरपंचाला सुचले पाहिजे. पैसै परत गेले तर त्याचा अर्थ त्यांना गावाच्या विकासासाठी आलेला निधी वापरता आलेला नसतो. याचाच अर्थ ग्रामपंचायत गावाचा प्रॉपर विकास आराखडा तयार करू शकली नाही, असा होतो. असे ग्रामीण अर्थकारणाचे अभ्यासक डॉ. कैलास बवले सांगतात. (सोर्स - BBC News) 

(source - https://www.majhagaav.com/2021/01/how-much-fund-get-gram-panchayat-in-every-year.html)