Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Stock Broker Salary: स्टॉक ब्रोकर दरमहिन्याला किती कमाई करतात?

Stock Broker

Image Source : https://www.freepik.com/

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा कल वाढल्याने स्टॉक ब्रोकर्सला देखील याचा फायदा होत आहे. स्टॉक ब्रोकर्सच्या कमाईत प्रचंड वाढ झाली आहे.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे हे काहीसे गुंतागुंतीचे व जोखमीचे असते. याशिवाय, स्वतः थेट बाजारात गुंतवणूक करणे देखील शक्य नसते. अशावेळी स्टॉक ब्रोकरच्या माध्यमातून बाजारात गुंतवणूक करावी लागते. स्टॉक ब्रोकरला बाजारातील बारकावे माहित असतात. 

भारतातील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे स्टॉक ब्रोकरचे काम करणाऱ्यांसाठी अनेक चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत. याशिवाय, त्यांच्या कमाईमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. 

स्टॉक ब्रोकर्स म्हणजे नक्की कोण? 

स्टॉक ब्रोकर्स हे गुंतवणूकदार व स्टॉक एक्सचेंज यांच्या दरम्यानचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करत असतो. गुंतवणूकदाराला स्टॉक ब्रोकरकडे ट्रेडिंग खाते उघडावे लागते. या खात्यातून गुंतवणूकदारांनी केलेले शेअर्स खरेदी-विक्रीचे व्यवहार स्टॉक ब्रोकर्सद्वारे स्टॉक एक्सचेंजमध्ये पार पडतात.

स्टॉक ब्रोकर्सचे प्रमुख काम हे गुंतवणूकदाराच्या वतीने स्टॉक एक्सचेंजमध्ये स्टॉक्सची खरेदी-विक्री करणे हे असते. ब्रोकर गुंतवणूकदाराला सल्ला देण्याचे काम देखील करतो. मात्र, सर्वच स्टॉक ब्रोकर्स गुंतवणुकीबाबत सल्ला देत नाहीत. तसेच, गुंतवणूकदाराचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी स्टॉक ब्रोकरला कमिशन देखील मिळते. याच ब्रोकरेजच्या माध्यमातून त्याची कमाई होत असते. 

हे देखील वाचा - Stock Broker: स्टॉक ब्रोकरसाठी सेबीची नियमावली काय आहे? वाचा

स्टॉक ब्रोकरसाठी नोकरीच्या संधी

भारतीय बाजारात सध्या डिस्काउंट ब्रोकर्स कंपन्या लोकप्रिय झाल्या आहेत. झिरोधा, ग्रो, अपस्टॉक्स, अँजेल वनसह एचडीएफसी सिक्युरिटी, आससीआयसीआय डायरेक्ट सारख्या प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म आहेत. याशिवाय, स्वतंत्रपणे देखील सब-ब्रोकर आणि अधिकृत व्यक्ती (Authorised Person) म्हणून काम करता येते.

प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म व बँकांमध्ये स्टॉक ब्रोकर्ससाठी नोकरीच्या अनेक चांगल्या संधी असतात. स्टॉक ब्रोकर हे कंपनीमध्ये किंवा स्वतंत्रपणेही काम करू शकतात. कंपनीमध्ये काम करताना ब्रोकर्सला पगारासह कमिशनही मिळते. यामुळे त्यांच्या कमाईचा आकडा अनेकपटींनी वाढतो.

स्टॉक ब्रोकरची कमाई किती?

स्टॉक ब्रोकरच्या कमाईचा निश्चित असा आकडा नाही. त्यांचा पगार हा प्रामुख्याने ब्रोकरेजवर ठरतो. ब्रोकरेज फर्ममध्ये काम करताना वर्षाला सरासरी 4 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत पगार मिळतो. याशिवाय, गुंतवणुकदारांच्यावतीने पार पाडलेल्या व्यवहारांसाठी कमिशन देखील मिळते.

समजा, गुंतवणूकदाराने प्रत्येकी 100 रुपये किंमतीचे 20 शेअर्स खरेदी केले. अशाप्रकारे, एकूण 2000 रुपयांची गुंतवणूक केली. फी म्हणून या व्यवहारावर 0.5 टक्के ब्रोकरेज आकारले जात आहे. अशाप्रकारे, या व्यवहारातून ब्रोकरला 10 रुपये ब्रोकरेज मिळते. 

थोडक्यात, स्टॉक ब्रोकरचे प्रमुख उत्पन्न हे ब्रोकरेजवर अवलंबून असते. त्याच्याकडील गुंतवणूकदारांची संख्या जेवढी असेल, तेवढे उत्पन्न अधिक असते.