Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Saving Goal at Age 30: वयाच्या तिशीपर्यंत बचत आणि गुंतवणूक किती असावी? भविष्याचे नियोजन आतापासूनच करा

Saving Goal at 30

Saving Goal at Age 30: गुंतवणूक आणि बचत जितक्या कमी वयात सुरू कराल तेवढे चांगले. सर्वसाधारणपणे 23-24 व्या वर्षी शिक्षण पूर्ण होते. त्यानंतर नोकरी, व्यवसाय करण्यास व्यक्ती सुरुवात करते. (How to save in young age) अनेकांनी तीस वर्ष पूर्ण होण्याआधी साधारणपणे पाच ते सहा वर्ष नोकरी किंवा व्यवसाय केलेली असते. या काळात किती रक्कम बचत किंवा गुंतवणूक झालेली असावी याचा अंदाज आपण या लेखात पाहू.

Saving Goal at Age 30: गुंतवणूक आणि बचत जितक्या कमी वयात सुरू कराल तेवढे चांगले. प्रसिद्ध गुंतवणुकदार वॉरेन बफेट यांनी अवघ्या 11 व्या वर्षी शेअर्स खरेदी केले होते. तर 14 व्या वर्षी स्थावर मालमत्ता घेतली होती, असे बोलले जाते. (Money Saving at age of 30) प्रत्येकजण काही वॉरेन बफेट होऊ शकत नाही. मात्र, मिळणाऱ्या उत्पन्नातून स्मार्ट पद्धतीने बचत आणि गुंतवणूक तर नक्की करू शकतो. भविष्याचे योग्य नियोजन तरूणपणात होऊ शकते. नाहीतर भविष्यात आर्थिक पेच उभा राहण्याची दाट शक्यता असते.

सर्वसाधारणपणे 23-24 व्या वर्षी शिक्षण पूर्ण होते. त्यानंतर नोकरी, व्यवसाय करण्यास व्यक्ती सुरुवात करते. (How to save in young age) अनेकांनी तीस वर्ष पूर्ण होण्याआधी साधारणपणे पाच ते सहा वर्ष नोकरी किंवा व्यवसाय सुरू केलेला असतो. या दिवसांत किती रक्कम बचत किंवा गुंतवणूक झालेली असावी याचा अंदाज आपण या लेखात पाहू.

तीस वर्षांचे होईपर्यंत किती बचत असावी हे अनेक गोष्टींवर तसेच जीवनातील घडामोडींवर अवलंबून असते. जसे की, तुमचे उत्पन्न, खर्च, दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट, लाइफस्टाइल. (Money planning at age of 30) मात्र, या सर्वांमध्ये काही मुद्दे समान आहेत. जसे की, निवृत्तीचे नियोजन, आरोग्य जीवन विमा, आणीबाणीसाठी पैशांची तरतूद. प्रत्येकाने आपल्या गरजा ओळखून त्यानुसार पैशांची बचत करायला हवी.

आणीबाणीच्या काळासाठी निधी (Emergency Fund Saving)

जीवनामध्ये अचानक येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी आणीबाणी निधी (एमर्जन्सी फंड) प्रत्येकाने साठवला पाहिजे. पैशांची अचानक गरज लागल्यास तुम्हाला ते उपलब्ध व्हायला हवेत. कोणापुढे हात पसरण्याची वेळ आली नाही पाहिजे. अशा गुंतवणूक पर्यायांमध्ये तुम्ही पैसे ठेवले पाहिजे. जसे की, अपघात, नोकरी जाणे, कुटुंबियांवर आलेल्या वैद्यकीय आणीबाणी अशा गोष्टींसाठी तुम्ही आधीच सावध असायला हवे. 6 ते 12 महिने पुरेल इतकी मासिक खर्चाची रक्कम आणीबाणी वेगळी ठेवली पाहिजे. म्हणजे या काळात तुमच्याकडे उत्पन्नाचा कोणताही मार्ग नसेल तर एमर्जन्सी फंड कामाला येईल. आणीबाणीसाठी आधीच तरतूद म्हणून तुम्ही आरोग्य विमा, जीवन विमा, कार विमा काढून ठेवायला हवा. यामध्ये केलेली गुंतवणूक तुम्हाला ऐनवेळी खिशातून पैसे खर्च करण्यापासून वाचवेल.

निवृत्तीकाळासाठी बचत (retirement planning)

नोकरीला लागल्यानंतर पहिल्या वर्षापासून निवृत्तीकाळासाठी बचत सुरू करावी, असा सल्ला आर्थिक तज्ज्ञ देतात. मात्र, तुमचे उत्पन्न पाहून काही रक्कम तुम्ही निवृत्ती योजनांमध्ये गुंतवायला हवी. नॅशनल पेन्शन स्कीम, पीएफ योजनांमध्ये तुम्ही काही रक्कम गुंतवू शकता. वयाच्या तिशीपर्यंत तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या दुप्पट रक्कम निवृत्ती निधीमध्ये जमा झाली पाहिजे. म्हणजे जर तुमचे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपये असेल तर सुमारे 12 लाख रुपये 30 वयापर्यंत रिटायरमेंट फंडात साठायला हवेत. यापेक्षा जास्त रक्कम तुम्ही गुंतवू शकत असाल तर अती उत्तम. तरुण वयात निवृत्तीचा विचार सहसा कोणी करत नाही. आणखी खूप वर्ष शिल्लक आहेत. नंतर बचत करता येईल, असा विचार अनेक जण करतात. मात्र, तसे न करता तिशीपर्यंतच काही ठराविक रक्कम तुम्ही साठवायला हवी.

Financial planning till age 30

कर्जाची परतफेड (Debt Repayment Plan)

जर तुम्ही जास्त व्याजदरावर एखाद्या कारणासाठी कर्ज घेतले असेल तर हे कर्ज कसे फेडायचे याचे नियोजन करा. शिक्षण, विवाह किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही कर्ज घेतले असेल तर हे सर्व कर्ज तिशीच्या आतच फेडण्याचे नियोजन करा. गुंतवणूक करण्यापेक्षा कर्जाचे हप्ते फेडण्याकडे तुम्ही लक्ष द्यायला हवे. अर्थात तुमच्या गरजा आणि आर्थिक स्थिती पाहून तुम्ही योग्य निर्णय घ्या.

दीर्घकालीन उद्दिष्टासाठी बचत (Long Term Financial Goal)

तरुण वयात स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे किंवा घर घेण्याचे स्वप्न अनेक जण पाहतात. मात्र, या गोष्टींसाठी जास्त पैशांची गरज लागते. योग्य नियोजनाशिवाय तुम्ही मोठे निर्णय न घेतलेले बरे. जर तुम्ही एखादा व्यवसाय करू इच्छित असाल तर त्यासाठी किती रक्कम लागू शकते, याचा अंदाज बांधून तिशीपासूनच बचत सुरू करा. इतर सर्व आवश्यक बाबी, जसे विमा, निवृत्ती निधी, आणीबाणी फंडासाठी केलेली बचत सोडून तुम्ही दीर्घकालीन उद्दिष्टासाठी पैसे बचत करायला हवे.