कर (टॅक्स) म्हणजे सरकारला सेवा पुरवल्याबद्दल दिला जाणारा एक प्रकारचा मोबदला आहे. या टॅक्सच्या मोबदल्यात सरकारकडून त्या प्रमाणात सेवा किंवा वस्तू मिळतेच, असे नाही. कायदेशीरदृष्ट्या टॅक्स गोळा करणं हा सरकारचा अधिकार आहे. तो कोणही नाकारू शकत नाही. तसेच विविध प्रकारचे टॅक्स हे सरकारचे उत्पन्नाचे साधन आहे. टॅक्सचे दोन महत्त्वाचे प्रकारचे आहेत, अप्रत्यक्ष कर आणि प्रत्यक्ष कर. याबद्दल आपण अधिक विस्ताराने जाणून घेणार आहोत.
प्रत्यक्ष कर म्हणजे काय? What is Direct Tax?
ज्या व्यक्तीवर प्रत्यक्ष कर लावलेला असतो तीच व्यक्ती तो कर भरत असते म्हणजे कराचे ओझे त्या व्यक्तीलाच सहन करावे लागते, अशा कराला प्रत्यक्ष कर (Direct Tax) असे म्हणतात. उदा. आयकर, संपत्ती कर, व्यवसाय कर, महामंडळ कर इत्यादी.
अप्रत्यक्ष कर म्हणजे काय? What is Indirect Tax?
जेव्हा कराघात (Impact of Tax) आणि कर भरण्याची जबाबदारी (Incidence of Tax) वेगवेगळ्या व्यक्तींवर पडते, तेव्हा त्याला अप्रत्यक्ष कर (Indirect Tax) असे म्हणतात. अप्रत्यक्ष करांचा अंतिम भार ग्राहकावर पडतो. उदा. अबकारी कर, सीमाशुल्क, विक्रीकर, सेवा कर इत्यादी.
प्रत्यक्ष कराचे प्रकार | Types of Direct Tax?
वैयक्तिक आयकर /प्राप्तिकर (Personal Income Tax)
नागरिकांनी कमावलेल्या उत्पन्नावर लावल्या जाणाऱ्या कराला वैयक्तिक आयकर किंवा प्राप्तिकर असे म्हणतात. भारतीय घटनेतील सातव्या परिशिष्टातील केंद्र सूचीतील विषय क्रमांक 82 नुसार कृषी उत्पन्न वगळता इतर उत्पन्नावर केंद्र आयकर आकारते. आयकर हा सर्व व्यक्तीवर बसवला जात नाही तर व्यक्तींच्या कर भरण्याच्या क्षमतेवर आकारला जातो. कोणत्याही व्यक्तीने एका वर्षात कमावलेल्या उत्पन्नावर चालू आर्थिक वर्षात कर बसवला जातो.
कॉर्पोरेशन टॅक्स (Corporation Tax)
कंपन्या, उत्पादन संस्था, महामंडळ, प्रमंडळ यांच्यावरती जो कर आकारला जातो त्याला निगम कर असे म्हणतात. निगम करासाठी आयकर कायदा 1961 हा लागू आहे. भारतीय कंपन्यांनी संपूर्ण जगात कमावलेल्या उत्पन्नावर तर परदेशी कंपन्यांनी भारतात कमावलेल्या उत्पन्नावर निगम कर आकारला जातो. याशिवाय अधिभार, आरोग्य उपकर, शिक्षण उपकर यासारखे उपकर ही सर्वच कंपन्या व महामंडळांना द्यावे लागतात.
संपत्ती कर (Wealth Tax)
व्यक्ती कुटुंबे आणि कंपन्या यांच्या साठवलेल्या संपत्ती वर हा कर आकारला जातो तो दरवर्षी भरावाच लागतो. संपत्तीवर उत्पन्न मिळत असो किंवा नसो.
व्यवसाय कर (Professional Tax)
राज्य सरकार आकारत असलेला हा कर आहे. व्यवसाय व्यापार आणि रोजगारावर व्यवसाय कर आकारण्याचा अधिकार राज्यांना देण्यात आलेला आहे. 7500 ते 10000 रुपयापर्यंत मासिक उत्पन्न असणाऱ्यांना वार्षिक 175 रुपये तर 10 हजारांपेक्षा जास्त मासिक उत्पन्न असणाऱ्यांना वार्षिक 2500 रुपये व्यवसाय कर द्यावा लागतो.
अप्रत्यक्ष कराचे प्रकार
अबकारी कर /उत्पादन शुल्क (Excise Tax)
देशांतर्गत उत्पादन झालेल्या वस्तूवर अबकारी कर आकारण्यात येतो. हा कर उत्पादनावर ती लावला जातो वस्तूची विक्री विचारात घेतली जात नाही.यामध्ये केंद्रीय अबकारी कर आणि राज्य अबकारी कर असे दोन प्रकार आहेत. राज्यांचा अबकारी कर मादक द्रव्य, सौंदर्यप्रसाधने अशा उत्पादनावर आकारण्यात येतो इतर अबकारी कर केंद्राद्वारे आकारले जातात.
सीमा कर / कस्टम ड्युटी (Customs Duty)
सीमा कराला कस्टम ड्युटी देखील म्हटले जाते. आयात व निर्यात मालावरती सीमा कर आकारला जातो. आयात करायला टेरिफ(Tariff) असेही म्हणतात. कस्टम कायदा 1962 नुसार या कराची कार्यवाही केली जाते.
विक्री कर (Sales Tax)
वस्तूंच्या विक्री वरती जो कर लावला जातो त्याला विक्रीकर असे म्हणतात. विक्रीकराची सुद्धा दोन प्रकार आहेत केंद्रीय विक्री कर आणि राज्यांचा विक्री कर. वस्तूंची विक्री एका राज्यातून दुसऱ्या राज्यात झाल्यास केंद्रीय विक्री कर आकारला जातो. वस्तूची विक्री जर राज्यात झाली असेल तर राज्यांचा विक्री कर आकारला जातो. विक्री करा च्या जागी मूल्यवर्धित कर प्रणाली लागू आहे.
सेवा कर (Service Tax)
सेवा कराची आकारणी केंद्रसरकार मार्फत केले जाते. वसुली मात्र केंद्र व राज्य सरकार मार्फत होते.
image source - https://bit.ly/3PndvaQ