भारतात तीन प्रकारचे पारपत्र (Passport) मिळतात. या तिघांचंही वेगळं असं महत्त्व आहे. पासपोर्टशिवाय तुम्ही परदेशात (Foreign) जाऊ शकत नाही. जगातल्या सर्वात कठोर आणि मजबूत पासपोर्टच्या यादीत भारतीय पासपोर्टचा समावेश आहे. पासपोर्ट तयार केल्यानंतर तुम्ही व्हिसाशिवाय 59 देशांमध्ये जाऊ शकता. हा पासपोर्ट तीन प्रकारचा आहे.
- निळा पासपोर्ट
- पांढरा पासपोर्ट
- मरून पासपोर्ट
Table of contents [Show]
निळा पासपोर्ट -
हा नियमित आणि तत्काल पासपोर्ट आहे. हा भारतातल्या सामान्य लोकांसाठी बनवला आहे. म्हणजेच निळ्या रंगाचा पासपोर्ट भारतातल्या सामान्य लोकांना दर्शवतो.
पांढरा पासपोर्ट -
पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट हा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बनवला जातो. जे सरकारी नोकरीत आहेत किंवा सरकारी कामासाठी परदेशात जाणार आहेत, त्यांच्यासाठी पांढरा पासपोर्ट बनवला जातो. म्हणजेच पांढरा पासपोर्ट लहान वर्गातला सरकारी कर्मचारी दर्शवतो.
मरून पासपोर्ट -
मरून रंगाचा पासपोर्ट भारतीय मुत्सद्दी आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांसाठी बनवला जातो. जसं की आयएएस, आयपीएस रँक ऑफिसरसाठी हा पासपोर्ट जारी केला जातो. यामुळे त्यांना परदेशात कोणतीही सुविधा सहज मिळते. यासोबतच इमिग्रेशन देखील सामान्य लोकांच्या तुलनेत खूप जलद आणि सोपं होतं.
भारतीय पासपोर्टनं तुम्ही विविध 60 देशांमध्ये जाऊ शकता -
भूतान, कूक बेटे, बार्बाडोस, कंबोडिया, फिजी, डॉमिनिका, इंडोनेशिया, मायक्रोनेशिया, हैती, लाओस, मार्शल बेटे, मोन्सेरात, मकाओ (एसएआर चीन), नियू, सेंट लुसिया, मालदीव, पलाऊ बेटे, त्रिनिदाद आणि टोबॅगो, म्यानमार, तुवालू, ब्रिटिश व्हर्जिन बेटे, नेपाळ, सामोआ, ग्रेनेडा, श्रीलंका, वानुआतु, जमैका, थायलंड, सेंट किट्स आणि नेव्हिस, तिमोर-लेस्टे, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स, इराण, अल्बानिया, बोलिव्हिया, कतार, सर्बिया, एल साल्वाडोर, जॉर्डन, ओमान, बोत्सवाना, बुरुंडी, केप वर्दे बेटे, कोमोरो बेटे, इथिओपिया, गॅबॉन, गिनी-बिसाऊ, मादागास्कर, मॉरिटानिया, मॉरिशस, मोझांबिक, रवांडा, सेनेगल, सेशेल्स, सिएरा लिओन, सोमालिया, टांझानिया, टोगो, ट्युनिशिया, युगांडा, झिम्बाब्वे.
किती दिवसात मिळतो पासपोर्ट?
सामान्य पासपोर्ट बनवण्यासाठी 10-20 दिवस लागतात, तर तत्काळ पासपोर्ट 3 ते 7 दिवसांत बनवता येतो.
शुल्क किती?
ऑनलाइन पासपोर्ट अर्ज शुल्क 3500 रुपये आहे. याशिवाय 60 पानांच्या पासपोर्ट बुकलेटसाठी 4000 रुपये शुल्क आहे.
कोणती कागदपत्रे?
- वयाचा पुरावा
- पत्ता पुरावा
- ओळख पुरावा
- पॅन कार्ड
- आधार कार्ड
- पासबुक
- लेटेस्ट फोटो
घरबसल्या पासपोर्टसाठी कसा करावा अर्ज?
- सर्वात आधी तुमच्या मोबाइलमध्ये mPassport सेवा अॅप डाउनलोड करा.
- अॅपवर रजिस्ट्रेशन करा.
- तुमच्या जवळचं पासपोर्ट ऑफिस निवडा.
- यानंतर फॉर्मचा पर्याय दिसेल.
- त्यात सर्व डिटेल्स भरा.
- यानंतर तुमच्या ई-मेल अॅड्रेसवर एक व्हेरिफिकेशन लिंक येईल.
- त्या लिंकवर जा आणि तुम्ही तयार केलेल्या पासवर्डनं लॉग इन करा.
- यानंतर पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाका.
- यानंतर होम पेजवर तुम्हाला Apply For Fresh Passportचा पर्याय दिसेल, तिथं क्लिक करा.
- आता अपॉइंटमेंटची तारीख फिक्स करा.
- त्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाईल.