Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

किती भारतीयांचे वर्षाला 10 लाखापर्यंत उत्पन्न आहे?

Indian's Income up to 10 lac

साधारणत: ठराविक वर्षाने प्रत्येकाच्या उत्पन्नामध्ये वाढ होत असते. पण कोणाच्या उत्पन्नात नेमकी किती वाढ झाली, हे सांगणे थोडे अवघड आहे. पण नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार भारतात गेल्या 6 वर्षात वर्षाला 10 लाखांपर्यंत उत्पन्न घेणाऱ्यांच्या संख्येत 4 पटीने वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

साधारणत: ठराविक वर्षाने प्रत्येकाच्या उत्पन्नामध्ये वाढ होत असते. पण कोणाच्या उत्पन्नात नेमकी किती वाढ झाली, हे सांगणे थोडे अवघड आहे. पण नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार भारतात 5 लाखापर्यंत, तसेच 5 ते 10 लाख आणि 10 लाखाच्या पुढे किती जणांचे उत्पन्न आहे, याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून संसदेत देण्यात आली. त्यानुसार गेल्या 6 वर्षात वर्षाला 10 लाखांपर्यंत उत्पन्न घेणाऱ्यांच्या संख्येत 4 पटीने वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

करदात्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ

2015-16 मध्ये 0 ते 5, 5 ते 10 आणि 10 लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांची एकूण संख्या 3 कोटी 99 लाख 60 हजार 738 इतकी होती. ती आता  2021-22 (असेसमेंट वर्ष)मध्ये  6 कोटी 33 लाख 38 हजार 212 इतकी झाली आहे. म्हणजे गेल्या 6 वर्षात यात दुपटीने वाढ झाली आहे.

2014-15 मध्ये वैयक्तिक टॅक्स भरणाऱ्यांची संख्या 4,35,09,915 इतकी तर कॉर्पोरेट टॅक्स भरणाऱ्यांची संख्या 7,29,363 इतकी होती. यात 2020-21 मध्ये अनुक्रमे 6,84,40,784 आणि 9,67,054 इतकी वाढ झाली आहे. केंद्र सरकारला 2014-15 मध्ये कॉर्पोरेट टॅक्समधून 4,28,924.74 कोटी रुपये मिळत होते. तेच आता 2021-22 मध्ये 7,12,037.33 कोटी रुपये मिळत आहेत. त्याचप्रमाणे वैयक्तिक करदात्यांकडून सरकारच्या तिजोरीत 2014-15 मध्ये 2,58,371.12 कोटी रुपये जमा होत होते. त्यात वाढ होऊन आता 2021-22 मध्ये 6,73,413.5 कोटी रुपये जमा झाले होते.

प्रत्येक टॅक्स स्लॅबद्वारे किती लोक टॅक्स भरतात? 

2015-16 पासून 2021-22 पर्यंत व्यक्तिगत करदात्यांच्या संख्येत झालेली वाढ

वैयक्तिक इन्कम टॅक्स

2015-16 ( AY)    

2019-20 (AY)    

2020-21 (AY)    

2021-22 (AY)    

ते 5 लाख

3,23,71,825

4,98,79,348

4,63,27,410

4,11,60,543

5 ते 10 लाख

53,34,381

1,06,26,410

1,12,28,574

1,40,74,602

10 लाखापेक्षा जास्त

22,54,532

48,54,198

54,11,934

81,03,067

एकूण

3,99,60,738

6,53,59,956

6,29,67,918

6,33,38,212

स्त्रोतलोकसभा प्रश्नोत्तरे दि. 13 फेब्रुवारी, 2023

2015-16 मूल्यांकन वर्षामध्ये साधारणपणे वर नमूद केलेल्या तिन्ही प्रकारच्या स्लॅबमध्ये मिळून 3,99,60,738 व्यक्ती टॅक्स भरत होत्या. त्यात वाढ होऊन 2021-22 मध्ये 6,33,38,212 व्यक्ती टॅक्स भरत आहेत.

व्यक्तिगत आणि कॉर्पोरेट करदात्यांच्या संख्येत झालेली वाढ

2015-16 पासून 2021-22 पर्यंत व्यक्तिगत आणि कॉर्पोरेट करदात्यांच्या संख्येत झालेली वाढ

टॅक्स पेअर्स

2015-16 ( FY)    

2019-20 (FY)    

2020-21 (FY)    

कॉर्पोरेट टॅक्स पेअर्स

7,71,802

9,20,523    

9,67,054    

वैयक्तिक टॅक्स पेअर्स

5,10,33,832

6,61,86,940    

6,84,40,784    

एकूण टॅक्स पेअर्स

5,18,05,634

6 , 71,07,463    

6,94,07,838    

स्त्रोतलोकसभा प्रश्नोत्तरे दि. 13 फेब्रुवारी, 2023

2015-16 या आर्थिक वर्षात भारतात एकूण करदात्यांची संख्या 5 लाख 18 हजार इतकी होती. त्यात वैयक्तिक टॅक्स पेअर्सची संख्या 5 लाख 10 हजार या दरम्यान होती. त्याता आता 2020-21 या आर्थिक वर्षात वाढ होऊन वैयक्तिक टॅक्स पेअर्सची संख्या 6 लाख 84 हजार इतकी झाली; तर कॉर्पोरेट टॅक्स पेअर्सची संख्या 9 लाख 67 हजार झाली.