Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

How is Life Insurance Premium Calculated? इन्शुरन्स प्रीमियम कसा मोजतात ?

Life Insurance Premium, Life Insurance, Insurance Premium

How is Life Insurance Premium Calculated? : लाईफ इन्शुरन्स हवा, अगदी प्रत्येकाला हवा आणि जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर हवा. इन्शुरन्स पॉलिसी खरेदी म्हटली की पॉलिसी कार्यरत ठेवण्यासाठीचे हप्ते देणे ओघाने आलेच. या इन्शुरन्स पॉलिसीच्या कव्हरसाठी व्यक्ती जी रक्कम नियमितपणे भरत असते, त्या रक्कमेलाच “प्रीमियम” म्हणतात.

अस म्हणतात कि “लाईफ इन्सुरन्स खरेदी करणं म्हणजे गळणारे छप्पर दुरुस्त करण्यासारखं आहे. जेवढा विलंब अधिक, तेवढा त्यावरचा खर्च देखील अधिक”. हा एक विचार म्हणून बहुतांश लोकांना पटतो देखील पण प्रत्यक्ष कृतीमधून कागदावर यायला लागणारा विलंबच आर्थिक गणित गुंतागुंतीचे करतो आणि त्यातूनच विमा-कवचासाठीचा (insurance-cover) कधीही राखून “न ठेवलेला” निधी नेहमीच अपुरा पडत असतो. इन्शुरन्स घ्यायला पैसे नाहीत पेक्षा, इन्शुरन्स कव्हर खरेदी करण्यास तात्काळ प्राधान्य न देण्याची मानसिकता बहुतांश व्यक्तींना विमा-रहित (Non-insured) ठेवत असते.

लाईफ इन्शुरन्स हवा, अगदी प्रत्येकाला हवा आणि जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर हवा. इन्शुरन्स पॉलिसी खरेदी म्हटली की पॉलिसी कार्यरत ठेवण्यासाठीचे हप्ते देणे ओघाने आलेच. या इन्शुरन्स पॉलिसीच्या कव्हरसाठी व्यक्ती जी रक्कम नियमितपणे भरत असते, त्या रक्कमेलाच “प्रीमियम” म्हणतात. आणि ही प्रीमियमची देय असणारी रक्कम व्यक्तीचे वय, त्याने निवडलेला कव्हरेज (विमा-कवचाचा) प्रकार, इन्शुरन्स पॉलिसीच्या कव्हरेजची रक्कम, त्याची वैयक्तिक जीवनशैली, इतकेच काय पण  त्याच्या “पिन कोड” वर देखील आधारित असते.

पॉलिसीधारकाची जीवनशैली प्रीमियम ठरवताना निर्णायक ठरते (Lifestyle of Policyholder)

लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमियम किती असावा हे इन्शुरन्स कंपनी काही तथ्यांच्या (Facts) आधारे निश्चित करते. इच्छुक पॉलिसीधारकाचे पॉलिसीचा प्रस्ताव सादरकर्ते वेळेचं वय, लिंग, त्याच्या वैयक्तिक सवयी म्हणजे जीवनशैली (स्मोकिंग / ड्रिंकिंग - tobacco-alcohol हॅबिट) यांचा प्रामुख्याने तपशील प्रीमियमची रक्कम निश्चित करतो. या व्यतिरिक्त  त्या व्यक्तीची फॅमिली हिस्ट्री, त्याचे स्वतःचे मेडिकल स्टेटस, त्याचे शिक्षण,  त्याचे आर्थिक उत्पन्न (फायनान्शिअल स्टेटस), त्याच्या व्यवसाय / नोकरीचे स्वरूप आणि संभाव्य व्यावसायिक धोके (पोलीस, सशस्त्र सेवादल सारखे तुलनात्मकदृष्ट्या जास्त जोखीम इत्यादी), आणि याचबरोबर त्याचे वैयक्तिक छंद आणि त्यामुळे असणारे संभाव्य धोके (उदाहरणार्थ - गिर्यारोहण, पॅराग्लायडिंग इत्यादी धोकादायक खेळ), यांचा विचार करता, जर इन्शुरन्स कंपनीला इच्छुक पॉलिसीधारकाला पॉलिसी देण्याची जोखीम जास्त वाटली, तर कंपनी पॉलिसीधारकाला अधिकचे प्रीमियम आकारून (म्हणजे “rate-up”) पॉलिसी देऊ शकते.

जास्त रक्कमेचे लाईफ कव्हर तर प्रीमियम देखील जास्त (Large Cover High Premium) 

प्रीमियमची रक्कम निश्चित करताना पॉलिसीधारकाची कव्हरेजची म्हणजे इन्शुरन्स कव्हरची प्रस्तावित रक्कम (Proposal) किती आहे ? आणि प्रीमियम भरण्याचा प्रत्यक्ष कालावधी (म्हणजे “Premium Payment Term”) तसेच प्रीमियमचा भरणा करण्याचा प्रकार (म्हणजे मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक) यावरही अवलंबून असतो. साहजिकच जास्त रक्कमेचे लाईफ कव्हर आवश्यक असल्यास त्याचा प्रीमियम देखील जास्त असतो. काही वेळा हा प्रीमियम इन्शुरन्स कव्हरच्या संपूर्ण कालावधीकरीता न भरता काही विशिष्ट कालावधीकरिता भरायचा असल्यास प्रीमियमची रक्कम अधिक भरावी लागते.

भौगोलिक घटक देखील कारणीभूत ठरतात (Geographical Factor's)

इच्छुक पॉलिसीधारकाचा वैयक्तिक इतिहास जसा प्रीमियमची रक्कम निश्चित करण्यास कारणीभूत ठरतो, तसाच त्याचा भूगोल अर्थात त्याचे राज्य, त्याचे निवासस्थान, त्याचा अधिवासाचा विभाग (Rural / Urban) देखील प्रीमियमवर परिणाम करत असतो. उदाहरणार्थ ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये असणारे प्रदूषणाचे प्रमाण, लोकसंख्या घनता, गुन्हेगारीचे प्रमाण, जीवनमानाचा दर्जा, अपघातांची शक्याशक्यता (possibility) सारखे घटक निश्चितच वेगवेगळे असतात. त्यामुळे इतर फॅक्ट्स सोबतच इन्शुरन्स कंपनी भौगोलिक क्षेत्रानुसार होऊ शकणाऱ्या  संभाव्य आर्थिक नुकसान आणि जोखमीचे प्रमाण लक्षात घेत असते. इन्शुरन्स कंपनीमधील अंडररायटर्स सारखे निष्णात आकडेवारी-तज्ज्ञ या सर्व बाबी लक्षात घेऊन मगच प्रीमियमची रक्कम निश्चित करत असतात.